श्री. द. महाजन यांच्या 'आपले वृक्ष' या पुस्तकात एका वृक्षाने माझे लक्ष वेधून घेतले. तो काही भव्य, अतिसुंदर फुलांचा वृक्ष नाही. त्याचे नाव तर अगदी सामान्य 'गेळा'. पण पुस्तकात श्री. दंनी लिहिले आहे की फादर सांतापाऊ या थोर वनस्पती वर्गीकरण शास्त्रज्ञाने या वृक्षाचा उल्लेख उद्यानवानस म्हणून जरूर लावावा असा देशी वृक्ष म्हणून केलं आहे. हे खरं आहे की अनेक विदेशी, भराभर वाढणाऱ्या वृक्ष्यांच्या गर्दीत भारतीय वृक्ष दुर्मिळ झाले आहेत. ते कुठेतरी जंगलात वाढत असतात. त्यांना अधिकाधिक लावून त्यांचे संवर्धन केले पाहिजे.
सह्याद्रीमध्ये हा वृक्ष विपुल प्रमाणात आढळतो असे श्री. द. महाजन यांनी लिहिले आहे. तसा हा काही मोठा वृक्ष नव्हे. एक छोटेसे काटेरी झुडपासारखे झाड. पण हे अतिशय गुणी झाड आहे. सुंदर पांढरी सुगंधी फुलं आणि खाण्यायोग्य फळे या झाडाला येतात. याचे फळ आयुर्वेदात वाखाणलं गेलं आहे. या फळाला 'गेळफळ' किंवा 'रानपेरू' असे म्हटले जाते. याचे शास्त्रीय नाव Catunaregum spinosa आहे. याला 'रँडिया ड्युमेटोरम' असेही म्हणतात. हिंदीत 'मैनफळ', कन्नडमध्ये 'कारेकायी गिडा, केरिगिड, मांगरीकाई' , गुजरातीत 'मिंधोला', तमिळमध्ये माडकराई, मल्याळम मध्ये कराच्चूल्ली, तेलगूमध्ये मर्रगा, ओरिया मध्ये पाटोवा, संस्कृतमध्ये 'मदन' म्हणतात. इंग्रजीमध्ये 'माऊंटन पॉमोग्रेनेट',''स्पायनी रॅंडीया','फॉल्स ग्वावा', 'थॉर्नी बोन ऍपल', 'एमिटिक नट', 'बुशी गार्डेनिया' असे म्हणतात. या झाडाचे कुळ 'रूबिएसी'(Rubiaceae) असे आहे.
याला मे महिन्यामध्ये फुले येतात. याच्या फळात मत्स्य-विष आहे. परंतु आयुर्वेदात या फळाचे तसेच सालीचे औषधी गुणधर्म सांगितले गेले आहेत. लहान मुलांना तापावर, दात येण्याबद्धलच्या तक्रारीवर या फळाचे भरड चूर्ण देण्यात येते. सालीचेही हाडांच्या तक्रारींवर औषधी उपयोग आहेत. हे फळ पिकले की भाजून खाल्ले जाते. फुले सुंगधी आणि पांढरी, पिवळी मोहक अशी असतात.
अशाप्रकरचे हे बहुगुणी छोटे झाड एकतरी लावायला हवे.
गेळाचे फुल (फोटो सौजन्य : फ्लॉवर्स ऑफ इंडिया संकेतस्थळ ) |
गेळाचे फळ |
याला मे महिन्यामध्ये फुले येतात. याच्या फळात मत्स्य-विष आहे. परंतु आयुर्वेदात या फळाचे तसेच सालीचे औषधी गुणधर्म सांगितले गेले आहेत. लहान मुलांना तापावर, दात येण्याबद्धलच्या तक्रारीवर या फळाचे भरड चूर्ण देण्यात येते. सालीचेही हाडांच्या तक्रारींवर औषधी उपयोग आहेत. हे फळ पिकले की भाजून खाल्ले जाते. फुले सुंगधी आणि पांढरी, पिवळी मोहक अशी असतात.
अशाप्रकरचे हे बहुगुणी छोटे झाड एकतरी लावायला हवे.
No comments:
Post a Comment