या वृक्षाचे शास्त्रीय नाव Pterospermum suberifolium आहे. याचा बंधू आहे कनीयार वृक्ष (Pterospermum acerifolium). दोघे Sterculiaceae (स्टर्कुलिएसी) या एकाच कुळातील आहेत. या दोन्ही वृक्षात नेहमी नावाची गफलत होते. कधीकधी दोन्ही वृक्ष 'मुचकुंद' या नावानेच संबोधले जातात.('देशी वृक्ष' या श्री. द. महाजन यांच्या पुस्तकात Pterospermum acerifolium म्हणजे मुचकुंद वृक्ष म्हटले आहे. तर म.वि. आपटे यांच्या 'वनश्रीसृष्टी' मध्ये Pterospermum suberifolium ला मुचकुंद म्हटले आहे) मग खरा 'मुचकुंद' कोणता?
इंग्रजीमध्ये या वृक्षाला बयूर, मॅपल लीव्ह्ड बयूर, मॅपल ट्वीस्ट, डिनर प्लेट ट्री असे म्हणतात.
सर्वप्रथम मी 'मुचकुंद' हे नाव ऐकले जी.एंच्या पत्रात. त्यांनी वि.ल. बर्वे यांच्या 'मुचकुंददरी'या कादंबरीचा उल्लेख केला आहे. वि.ल. बर्वे हे कोकणात चिपळूणमध्ये राहणारे. त्यांच्या या कादंबरीत 'मुचकुंददरी' नावाचा भाग आणि त्याठिकाणच्या लोकांवर आधारित कथा आहे. अशी 'मुचकुंद दरी' त्यांना चिपळूणमध्ये कुठे दिसली होती का? आणि त्या ठिकाणी मुचकुंदाचे वृक्ष असल्यानेच या जागेला 'मुचकुंददरी' नाव पडले असेल का ? असा विचार माझ्या मनात तरळून गेला. तसं पाहायला गेलं तर 'मुचकुंदी' नावाची एक नदी रत्नागिरीतून वाहते. या सगळ्याचा 'मुचकुंद' वृक्षाचा काहीतरी संबध असला पाहिजे. कारण कोकणात मुचकुंदाचे वृक्ष आढळत असल्याचे अनेक वनस्पती अभ्यासकांनी लिहून ठेवले आहे.
मुचकुंद वृक्षाला पावसाळा संपताना फुले येतात आणि तो मार्च-एप्रिल पर्यंत बहरात असतो. फुल पांढरे आणि सुवासिक असते. कळ्या लांबलचक असून त्यांना पाच धारा असतात. भोवताली तीन छेदे असून ती फुलापासून थोडी खाली उगवलेली असतात. फुल चार ते पाच सेमीचे असते तसेच फळही तीन ते पाच सेमीचे असते. पानेही मोठी आणि सुंदर असतात.
याच्या मोठ्या डेरेदार आकारामुळे याला 'छत्रवृक्ष' असेही म्हटले जाते. याच्या बुंध्याला जमिनीलगत नवीन धुमारे येतात आणि त्यातूनही मुचकुंद वृक्षाची वाढ होते, त्यामुळे हा वृक्ष खूप जुना असेल तर त्याचे एक बेटच तयार झालेले दिसेल. याचे प्रजातीय नाव 'टेरोस्पर्मम' यामागे देखील एक गमतीदार गोष्ट आहे. 'टेरोस्पर्मम' म्हणजे 'बियांना पंख असलेला'. या वृक्षाच्या बियांवर रुंद असा पंख असतो.
'मुचकुंद' किंवा 'कनीयार' या वृक्षाचे उल्लेख रामायणात केले गेले आहेत, असे म. वि. आपटे यांच्या 'वनश्रीसृष्टी' ग्रंथात त्यांनी म्हटले आहे.
मुचकुंद वृक्षाची रोपं त्याच्या बियांपासून तयार करता येऊ शकतात. एकदा लावला आणि उष्ण-दमट हवामान, पुरेसे पाणी असेल तर हा वृक्ष तीन-चार वर्षात फुलायलाही लागू शकतो.
Pterospermum acerifolium |
Pterospermum suberifolium (फोटो सौजन्य : फ़ूल ऑफ इंडिया संकेतस्थळ) |
मुचकुंद वृक्षाला पावसाळा संपताना फुले येतात आणि तो मार्च-एप्रिल पर्यंत बहरात असतो. फुल पांढरे आणि सुवासिक असते. कळ्या लांबलचक असून त्यांना पाच धारा असतात. भोवताली तीन छेदे असून ती फुलापासून थोडी खाली उगवलेली असतात. फुल चार ते पाच सेमीचे असते तसेच फळही तीन ते पाच सेमीचे असते. पानेही मोठी आणि सुंदर असतात.
मुचकुंदाची फळं (फोटो सौजन्य विकिपीडिया) |
याच्या मोठ्या डेरेदार आकारामुळे याला 'छत्रवृक्ष' असेही म्हटले जाते. याच्या बुंध्याला जमिनीलगत नवीन धुमारे येतात आणि त्यातूनही मुचकुंद वृक्षाची वाढ होते, त्यामुळे हा वृक्ष खूप जुना असेल तर त्याचे एक बेटच तयार झालेले दिसेल. याचे प्रजातीय नाव 'टेरोस्पर्मम' यामागे देखील एक गमतीदार गोष्ट आहे. 'टेरोस्पर्मम' म्हणजे 'बियांना पंख असलेला'. या वृक्षाच्या बियांवर रुंद असा पंख असतो.
'मुचकुंद' किंवा 'कनीयार' या वृक्षाचे उल्लेख रामायणात केले गेले आहेत, असे म. वि. आपटे यांच्या 'वनश्रीसृष्टी' ग्रंथात त्यांनी म्हटले आहे.
मुचकुंद वृक्षाची रोपं त्याच्या बियांपासून तयार करता येऊ शकतात. एकदा लावला आणि उष्ण-दमट हवामान, पुरेसे पाणी असेल तर हा वृक्ष तीन-चार वर्षात फुलायलाही लागू शकतो.
No comments:
Post a Comment