Tuesday, 10 April 2018

वृक्षप्रकल्पातील हिरवा सोबती १६ : शिरीष

शास्त्रीय नाव : Albizia lebbeck , Fabaceae , pea of legume family
याला Parrot tree असेही म्हणतात, कारण हे पोपटाचे आवडते झाड आहे.
'ऋतुचक्र' या दुर्गा भागवत यांच्या पुस्तकात शिरीषचा उल्लेख आहे पण तो 'खोटा शिरीष' किंवा रेन ट्री आहे. रेन ट्री हे झाड मूळ आफ्रिकेतील असून Albizia lebbeck हा शिरीष वृक्ष भारतीय आहे.
याच्या  फुलाचे कालिदासाने अतिशय सुंदर वर्णन केले आहे , याच्या फुलाचा रंग शेवाळी असतो. श्री. द. महाजन यांच्या पुस्तकात ते या वृक्षाचे

al-BIZ-ee-uh -- named for Filipo del Albizzi, Florentine nobleman
LEB-ek -- named after a place in Egypt

 शिरिषाचे अनेक प्रकार आहेत.
१. शिरीष: Albizia lebbeck
२. काळा शिरीष (Albizia amara)
३. पांढरा शिरीष (Albizia procera ) याला 'किनई' असेदेखील म्हणतात. 

Tuesday, 3 April 2018

हळद्या

आजकाल सकाळी सकाळी
एक सुंदर आवाज कानावर पडतो
एका पक्ष्याचा
सुंदर पिवळा जर्द पक्षी
नावही शोधून झाले
'हळद्या'
तो काहीतरी बोलत असतो
ते कानाला सुंदर वाटते
पण त्याचे नाव माहित असले तरी,
त्याच्या बद्दल ज्ञानकोशात
कितीहि वाचले तरी,
कितीही बघितले त्याला
आणि कितीही ऐकले त्याला तरी,
तो काय बोलतो ते मला
कधीही कळणार नाही


- ४-एप्रिल-२०१८

मागच्या वर्षी

गाठता येत नाही उंची
खूप चढ आहेत भिंती

सापडतही  नाही तळ
काढता येत नाही पळ

लागतो का काही माग
येतेय का पेंगल्या डोळ्याला जाग

काही हरवलेच  नाही
तर मग कसला शोध 

विनातक्रार भोग
सापडेल केव्हातरी दुसरे टोक


वाट बघायचीच आहे तर
आनंदाने बघावी
इकडची गाठोडी
फक्त तिकडे करावी

- मागच्या वर्षी

Friday, 30 March 2018

निर्गुंडी (Vitex negundo)

कर्नाळ्याच्या किल्ल्याच्या वाटेवर एक दोन ठिकाणी फार सुंदर बारीक निळ्या फुलांच्या मंजिऱ्यांचा छोटा झुडूपवजा वृक्ष दिसला. त्याची फुले अतिशय नाजूक असून फांद्यांच्या टोकांना फुलोऱ्याच्या स्वरूपात फुलली होती. पावसाचा जोर इतका वाढला होता की त्या सुंदर फुलांचा एकही फोटो घेता आला नाही. परंतु ती निळी फुलं मात्र लक्षात राहिली. त्या निळ्या रंगाच्या फुलांवरून आंतरजालावरील flowersofindia या अतिशय उपयुक्त संकेतस्थळावरून या वृक्षाचा पत्ता लागला. याचे नाव निर्गुंडी आहे असे कळले. निगडी, राननिगडी अशा स्वरूपाचे शब्द मी काही दिवसापूर्वीच 'गीर्वाणलघुकोशा'त वाचलेले मला आठवले. त्या ठिकाणी निर्गुंडी हे एक 'काळ्या फुलाचे झाड' असे लिहिलेले होते. त्याची 'निगडी' आणि 'राननिगडी' अशी नावे देखील दिली होती. मी पाहिलेला 'निर्गुंडी' वृक्ष तो हाच असावा का?
तशी निर्गुंडी ला अनेक नावं आहेत.

शास्त्रीय नाव आहे Vitex negundo.
  • VY-teks -- Latin name for the Grape genus
  • neg-UN-doh: -- Latinised form of the Sanskrit name for this plant


इंग्रजीत याला 'Chaste Tree' असे म्हणतात. याला 'शेफालिका' असेही म्हणतात. 
शेफालिका तु सुवहा निर्गुण्डी नीलिका च सा ।
सितासौ श्वेतसुरसा भूतवेशी ।   असे अमरकोशात (वनौषधी वर्ग ७०) सांगितलेले आहे. निर्गुंडीच्या मुख्य जाती दोन आहेत असे यात लिहिले आहे. कृष्ण आणि शुभ्र शेफालिका. शेफालिका, सुवहा, निर्गुण्डी , नालिका या सर्व काळ्या निर्गुंडीच्या जाती असून, श्वेतसुरसा व भूतवेशी या पांढऱ्या निर्गुंडीच्या जाती आहेत. अमरकोशात निर्गुंडीबद्दल आणखी एक वचन आहे. 
अथ सिन्दुक । सिन्दुवारेंद्र सुरसा निर्गुण्डान्द्राणित्यपि |
सिन्दुक, सिन्दुवार, इन्द्रसुरस , निर्गुण्डी व इन्द्राणिका अशी पाच नावे असून पहिली तीन पुल्लिंगी आहेत आणि उरलेली दोन स्त्रीलिंगी आहेत. 

'गीर्वाणलघुकोश' या ग्रंथात दिलेली निर्गुंडी ही काळी निर्गुंडी असून तिची फुले निळ्या रंगाची असतात. 
आदिवासी लोक निर्गुंडीला 'वणई' असे म्हणतात.
अमरकोशाच्या व्याख्यासुधा टीकेत (निर्णयसागर पृ. १७२)
सिन्दुवार श्वेतपुष्प सिन्दुक सिन्दुवारित |
नीलपुष्प शीतसहो निर्गुण्डी नीलसिन्धुक |
 हे वचन आहे.

निर्गुण्डी नीलशेफ़ाल्या सिन्दुवारद्रुमेSपि च |
हे मेदिनीकोशातील वचन आहे.


'गाथासप्तशती' या हालसातवाहनाच्या ग्रंथात निर्गुंडीचे उल्लेख दोन गाथांत आले आहेत. 
गाथा ४१२ 
सुप्पउ ! तइओ वि गओ जामोत्ति सहीओ ! कीस मं भणह ?
सेहालिआगन्धो ण देइ सोत्तुं, सुअह तुम्हे ? ||12||
 [ सुप्यतां तृतीयोSपि  गतो याम इति सख्य: किमिति मां भणथ |
शेफालिकाना गन्धो न ददाति स्वप्तुं स्वपित युयम् ||

-from संस्कृत गाथासप्तशती
स्वपिहि तृतीयोSपि गतो याम इति हि मां नु किमिति किल भणथ |
शेफ़ालिकासुगन्धः स्वप्तुं न ददाति मे , स्वपित युयम् || 12||

रात्रीचा तिसरा प्रहरही संपला; यापुढे प्रियकर येणे शक्य नाही, आता झोप, असे तुम्ही मला का सांगता? सख्यांनो , तुम्ही झोपा, शेफालिकेचा सुगंध दरवळत आहे, तो मला झोपू देत नाही. 
(शेफालिकेची फुले मध्यरात्रीनंतर दरवळू लागतात. त्यांचा सुंगंध मन्मथोद्दीपक असतो.)

गाथा ९५३ कंकणरव (Rhythm)
उच्चिणसु पडिअकुसुमं मा धुण सेंहलिअं, हलिसुण्हे |
एस अवणविरसो ससुरेण सुओ वलअसद्दो || 959||
[उच्चिनु पतितानि कुसुमानि मा धुनी: शेफ़ालिकां हालिकस्नुषे |
  ते विषंमविराव: श्वशुरेण श्रुतो वलयशब्दः ||]

शेतकऱ्याच्या सुने, फक्त (जमिनीवर पडलेली फुले गोळा कर; परसातल्या शेफालिकेकला हात लावू नको, कारण त्यामुळे तुझ्या काकणांचा आवाज होईल व तो विसंवादी स्वर तुझ्या सासऱ्याला ऐकू जाईल (आणि त्याचा परिणाम अनिष्ट होईल)


खरंतर शेफालिका म्हणजे 'पारिजातक' पण तरीही निर्गुण्डीला शेफालिका का म्हटले आहे ते कळत नाही.  निर्गुंडीची अशी पांढऱ्या फुलांची जात आहे का? तशा जातीची नोंद वनस्पतीशास्त्राच्या पुस्तकात सापडते का ते बघण्याचा मी प्रयत्न केला.

श्री. द.  महाजन यांच्या 'देशी वृक्ष' या ग्रंथात त्यांनी म्हटले आहे 'फुले लहान (१से.मी.) अनियमित रचनेची, पांढरी, निळसर किंवा जांभळट रंगाची असतात.
थीओडोर कुक यांच्या ग्रंथाच्या दुसऱ्या खंडात या वृक्षाच्या Genus चे चार प्रकार दिले आहेत. यातले तीन प्रकार कोकण आणि पश्चिम घाट/सह्याद्रीमध्ये आढळतात. त्यापैकी Vitex negundo, Vitex trifolia हे दोन्ही वृक्ष निळ्या फुलांच्या मंजिऱ्यांचे आहेत. Vitex trifolia मात्र दुर्मिळ असून मुर्डेश्वरच्या वाळूच्या किनाऱ्यांवर असल्याची नोंद कुक यांच्या ग्रंथात आहे.
Vitex altissima हा वृक्ष निळसर -पांढऱ्या फुलांचा असून त्याच्या फुलांची ठेवण बरीच वेगळी आहे.
मात्र Vitex leucoxylon हा वृक्ष पांढऱ्या फुलांचा आहे. मराठीत याला 'सोनगारबी' असे म्हणतात.
संस्कृत ग्रंथातला 'शेफालिका' हा Vitex leucoxylon असावा का? सांगणे कठीण आहे.

Vitex negundo is a food-plant of Death's Head Hawkmoth. This shrub attracts a lot of butterflies

निर्गुडीची पाने चहासोबत उकळून घेतल्यास ताप कमी होतो.
निर्गुडीचे तेलही sprains साठी उपयुक्त आहे.


Vitex trifolia, the leaflets are sessile. Apart from this, V.trifolia grows naturally along the coast - it is a littoral species.
This could be V.negundo or V.trifolia. The closer possibility is that of V.negundo. The identification key is on the leaves.
In case of Vitex trifolia, the leaflets are sessile.
Apart from this, V.trifolia grows naturally along the coast - it is a littoral species.    

Friday, 16 March 2018

एमिली डिकिन्सनच्या कविता

काय अर्थ आहे या कवितांचा? या कविता म्हणजे नुसते शब्द आहेत का की त्या पलीकडे काहीतरी आहे. काल काका मला सांगत होते. ज्ञानेश्वरांचे काही शब्द म्हणजे फक्त शब्द नाहीत ते विलक्षण प्रतिभेतून, जाणिवेच्या पुढेही जाऊन नेणीवेपर्यंतच्या अशा तेजाळ चिंतनातून प्रकटले आहेत. ते सांगत होते की हे शब्द माझ्या मनात घर करून राहतात, ते जातच नाहीत. एवढे ते शब्द सामर्थ्यशाली आहेत. त्यांनीच मला 'परातत्व स्पर्श' हा शब्द सांगितला होता. हा 'परातत्व स्पर्श 'एमिली डिकिन्सन' च्या कवितेलाही झालेला आहे.  

एमिलीच्या काही कविता


I'm nobody! Who are you?
Are you nobody, too?
Then there's a pair of us -- don't tell!
They'd banish -- you know!

How dreary to be somebody!
How public like a frog
To tell one's name the livelong day
To an admiring bog!

 -----------------------------------------------------------------

“Hope” is the thing with feathers -
That perches in the soul -
And sings the tune without the words -
And never stops - at all -

And sweetest - in the Gale - is heard -
And sore must be the storm -
That could abash the little Bird
That kept so many warm -

I’ve heard it in the chillest land -
And on the strangest Sea -
Yet - never - in Extremity,
It asked a crumb - of me.

-------------------------------------------------------------------

I died for beauty, but was scarce
Adjusted in the tomb,
When one who died for truth was lain
In an adjoining room.

He questioned softly why I failed?
"For beauty," I replied.
"And I for truth - the two are one;
We brethren are," he said.

And so, as kinsmen met a-night,
We talked between the rooms,
Until the moss had reached our lips,
And covered up our names. 

-------------------------------------------------------------------

There is another sky,
Ever serene and fair,
And there is another sunshine,
Though it be darkness there;
Never mind faded forests, Austin,
Never mind silent fields—
Here is a little forest,
Whose leaf is ever green;
Here is a brighter garden,
Where not a frost has been;
In its unfading flowers
I hear the bright bee hum:
Prithee, my brother,
Into my garden come!

-------------------------------------------------------------------

If I can stop one heart from breaking,
I shall not live in vain;
If I can ease one life the aching,
Or cool one pain,
Or help one fainting robin
Unto his nest again,
I shall not live in vain.

--------------------------------------------------------------------





 

Thursday, 15 March 2018

संध्याकाळ

एक झाड आहे बघत
स्वतःची लांबत जाणारी सावली
एकाच ठिकाणी उभे राहून

ती नदी, तुडुंब प्रवाही
पळत आहे सतत
संधीप्रकाशाचे गडद किनारे घेऊन

तो चिमणा
दिवसभराचा क्षीण विसरत 
बसला आहे उबदार पानांत गुडूप होऊन

म्लान राखी रंग 
फक्त सर्वदूर जाई पसरत
विरक्ती घेऊन

एक तारा लुकलुके
धूसर 
सांजदिवा होऊन

-२०१७



 


Saturday, 10 March 2018

जाणाऱ्या क्षणाला

इथे खुर्चीत बसून आहे  
श्वास चालला आहे
त्याबरोबर चालले आहेत
विचार
तू कित्येकदा आलास 
कित्येकदा गेलास
न सांगता
दुर्लक्ष करून
दुर्लक्षित होऊन,
दार उघडून तू  आला नाहीस
मी तुला ना पाणी विचारले ना चहा
उन्हातून आलास  का?
कि थंडीवाऱ्यातून , पावसातून
इथे बस, बोल
असे काहीच म्हटले नाही तुला
मागे अनेक वर्षांपूर्वी
मीच होते का तिथे
चहा पाणी विचारयला
ती मीच का आणखी कोण
आज आहे इथे
त्यावेळची आणि आताची मी
एकच का?
आणखी काही वर्षांनंतरही
तू येतच राहशील 
येशील,  जाशील
मीही कधीतरी विचार करेन
मी आज आहे तशी
तेव्हा मला मी दिसेन ?
तुला हात दाखवला तरी
तुझ्याकडून प्रतिसाद नाही
बोलणार कसं
तुला वेळच नाही
थांबवून काय करायचे
सांगायला काहीच नाही
पण तुला
एक विचारायचे आहे
शेवटच्या क्षणी
येशील, भेटशील
तेव्हाही तू जाशील ?
की कायमचा माझ्याबरोबर
राहशील ?


-८- मार्च-२०१८