Thursday 15 March 2018

संध्याकाळ

एक झाड आहे बघत
स्वतःची लांबत जाणारी सावली
एकाच ठिकाणी उभे राहून

ती नदी, तुडुंब प्रवाही
पळत आहे सतत
संधीप्रकाशाचे गडद किनारे घेऊन

तो चिमणा
दिवसभराचा क्षीण विसरत 
बसला आहे उबदार पानांत गुडूप होऊन

म्लान राखी रंग 
फक्त सर्वदूर जाई पसरत
विरक्ती घेऊन

एक तारा लुकलुके
धूसर 
सांजदिवा होऊन

-२०१७



 


No comments:

Post a Comment