Friday, 30 March 2018

निर्गुंडी (Vitex negundo)

कर्नाळ्याच्या किल्ल्याच्या वाटेवर एक दोन ठिकाणी फार सुंदर बारीक निळ्या फुलांच्या मंजिऱ्यांचा छोटा झुडूपवजा वृक्ष दिसला. त्याची फुले अतिशय नाजूक असून फांद्यांच्या टोकांना फुलोऱ्याच्या स्वरूपात फुलली होती. पावसाचा जोर इतका वाढला होता की त्या सुंदर फुलांचा एकही फोटो घेता आला नाही. परंतु ती निळी फुलं मात्र लक्षात राहिली. त्या निळ्या रंगाच्या फुलांवरून आंतरजालावरील flowersofindia या अतिशय उपयुक्त संकेतस्थळावरून या वृक्षाचा पत्ता लागला. याचे नाव निर्गुंडी आहे असे कळले. निगडी, राननिगडी अशा स्वरूपाचे शब्द मी काही दिवसापूर्वीच 'गीर्वाणलघुकोशा'त वाचलेले मला आठवले. त्या ठिकाणी निर्गुंडी हे एक 'काळ्या फुलाचे झाड' असे लिहिलेले होते. त्याची 'निगडी' आणि 'राननिगडी' अशी नावे देखील दिली होती. मी पाहिलेला 'निर्गुंडी' वृक्ष तो हाच असावा का?
तशी निर्गुंडी ला अनेक नावं आहेत.

शास्त्रीय नाव आहे Vitex negundo.
  • VY-teks -- Latin name for the Grape genus
  • neg-UN-doh: -- Latinised form of the Sanskrit name for this plant


इंग्रजीत याला 'Chaste Tree' असे म्हणतात. याला 'शेफालिका' असेही म्हणतात. 
शेफालिका तु सुवहा निर्गुण्डी नीलिका च सा ।
सितासौ श्वेतसुरसा भूतवेशी ।   असे अमरकोशात (वनौषधी वर्ग ७०) सांगितलेले आहे. निर्गुंडीच्या मुख्य जाती दोन आहेत असे यात लिहिले आहे. कृष्ण आणि शुभ्र शेफालिका. शेफालिका, सुवहा, निर्गुण्डी , नालिका या सर्व काळ्या निर्गुंडीच्या जाती असून, श्वेतसुरसा व भूतवेशी या पांढऱ्या निर्गुंडीच्या जाती आहेत. अमरकोशात निर्गुंडीबद्दल आणखी एक वचन आहे. 
अथ सिन्दुक । सिन्दुवारेंद्र सुरसा निर्गुण्डान्द्राणित्यपि |
सिन्दुक, सिन्दुवार, इन्द्रसुरस , निर्गुण्डी व इन्द्राणिका अशी पाच नावे असून पहिली तीन पुल्लिंगी आहेत आणि उरलेली दोन स्त्रीलिंगी आहेत. 

'गीर्वाणलघुकोश' या ग्रंथात दिलेली निर्गुंडी ही काळी निर्गुंडी असून तिची फुले निळ्या रंगाची असतात. 
आदिवासी लोक निर्गुंडीला 'वणई' असे म्हणतात.
अमरकोशाच्या व्याख्यासुधा टीकेत (निर्णयसागर पृ. १७२)
सिन्दुवार श्वेतपुष्प सिन्दुक सिन्दुवारित |
नीलपुष्प शीतसहो निर्गुण्डी नीलसिन्धुक |
 हे वचन आहे.

निर्गुण्डी नीलशेफ़ाल्या सिन्दुवारद्रुमेSपि च |
हे मेदिनीकोशातील वचन आहे.


'गाथासप्तशती' या हालसातवाहनाच्या ग्रंथात निर्गुंडीचे उल्लेख दोन गाथांत आले आहेत. 
गाथा ४१२ 
सुप्पउ ! तइओ वि गओ जामोत्ति सहीओ ! कीस मं भणह ?
सेहालिआगन्धो ण देइ सोत्तुं, सुअह तुम्हे ? ||12||
 [ सुप्यतां तृतीयोSपि  गतो याम इति सख्य: किमिति मां भणथ |
शेफालिकाना गन्धो न ददाति स्वप्तुं स्वपित युयम् ||

-from संस्कृत गाथासप्तशती
स्वपिहि तृतीयोSपि गतो याम इति हि मां नु किमिति किल भणथ |
शेफ़ालिकासुगन्धः स्वप्तुं न ददाति मे , स्वपित युयम् || 12||

रात्रीचा तिसरा प्रहरही संपला; यापुढे प्रियकर येणे शक्य नाही, आता झोप, असे तुम्ही मला का सांगता? सख्यांनो , तुम्ही झोपा, शेफालिकेचा सुगंध दरवळत आहे, तो मला झोपू देत नाही. 
(शेफालिकेची फुले मध्यरात्रीनंतर दरवळू लागतात. त्यांचा सुंगंध मन्मथोद्दीपक असतो.)

गाथा ९५३ कंकणरव (Rhythm)
उच्चिणसु पडिअकुसुमं मा धुण सेंहलिअं, हलिसुण्हे |
एस अवणविरसो ससुरेण सुओ वलअसद्दो || 959||
[उच्चिनु पतितानि कुसुमानि मा धुनी: शेफ़ालिकां हालिकस्नुषे |
  ते विषंमविराव: श्वशुरेण श्रुतो वलयशब्दः ||]

शेतकऱ्याच्या सुने, फक्त (जमिनीवर पडलेली फुले गोळा कर; परसातल्या शेफालिकेकला हात लावू नको, कारण त्यामुळे तुझ्या काकणांचा आवाज होईल व तो विसंवादी स्वर तुझ्या सासऱ्याला ऐकू जाईल (आणि त्याचा परिणाम अनिष्ट होईल)


खरंतर शेफालिका म्हणजे 'पारिजातक' पण तरीही निर्गुण्डीला शेफालिका का म्हटले आहे ते कळत नाही.  निर्गुंडीची अशी पांढऱ्या फुलांची जात आहे का? तशा जातीची नोंद वनस्पतीशास्त्राच्या पुस्तकात सापडते का ते बघण्याचा मी प्रयत्न केला.

श्री. द.  महाजन यांच्या 'देशी वृक्ष' या ग्रंथात त्यांनी म्हटले आहे 'फुले लहान (१से.मी.) अनियमित रचनेची, पांढरी, निळसर किंवा जांभळट रंगाची असतात.
थीओडोर कुक यांच्या ग्रंथाच्या दुसऱ्या खंडात या वृक्षाच्या Genus चे चार प्रकार दिले आहेत. यातले तीन प्रकार कोकण आणि पश्चिम घाट/सह्याद्रीमध्ये आढळतात. त्यापैकी Vitex negundo, Vitex trifolia हे दोन्ही वृक्ष निळ्या फुलांच्या मंजिऱ्यांचे आहेत. Vitex trifolia मात्र दुर्मिळ असून मुर्डेश्वरच्या वाळूच्या किनाऱ्यांवर असल्याची नोंद कुक यांच्या ग्रंथात आहे.
Vitex altissima हा वृक्ष निळसर -पांढऱ्या फुलांचा असून त्याच्या फुलांची ठेवण बरीच वेगळी आहे.
मात्र Vitex leucoxylon हा वृक्ष पांढऱ्या फुलांचा आहे. मराठीत याला 'सोनगारबी' असे म्हणतात.
संस्कृत ग्रंथातला 'शेफालिका' हा Vitex leucoxylon असावा का? सांगणे कठीण आहे.

Vitex negundo is a food-plant of Death's Head Hawkmoth. This shrub attracts a lot of butterflies

निर्गुडीची पाने चहासोबत उकळून घेतल्यास ताप कमी होतो.
निर्गुडीचे तेलही sprains साठी उपयुक्त आहे.


Vitex trifolia, the leaflets are sessile. Apart from this, V.trifolia grows naturally along the coast - it is a littoral species.
This could be V.negundo or V.trifolia. The closer possibility is that of V.negundo. The identification key is on the leaves.
In case of Vitex trifolia, the leaflets are sessile.
Apart from this, V.trifolia grows naturally along the coast - it is a littoral species.    

No comments:

Post a Comment