खजुराहो. मध्यप्रदेशातील अतिशय प्रसिद्ध ठिकाण. इथली इ. स. दहाव्या शतकातील मंदिरं बघण्यासाठी जगभरातून लोकं येतात. पंचवीसेक मंदिरं, त्यावरची अजोड शिल्पं आणि कलात्मकतेला आलेला पूर. या पुरात आपण वाहून जातो. शे-पाऊणशे फुटी मंदिरांकडे बघताना मुंगीसमान वाटायला लागते. शिल्पं तरी किती? जिथे पाहावं तिथे शिल्पं. डोळे गुंग होतात, मती बधिर होते. काही म्हणून काही सुचत नाही. या पूर्णतेच्या अविष्काराने स्वतःची अपूर्णता अधिकच अंगावर यायला लागते. मग पळून जावेसे वाटायला लागते. या सौन्दर्याच्या जादूने आपण बंदिस्तही होतो आणि मुक्तही. डोळ्यांना सुखही वाटते आणि उदासीही. मन स्थिरही होते आणि अस्थिरही. या दोन टोकातील ताण घेऊन मंदिरंही उभी आहेत. सौन्दर्याचाही, परिपूर्णतेचाही त्रास होऊ शकतो कारण ते पेलण्याचे सामर्थ्य असावे लागते. खजुराहोमध्ये परिपूर्णतेचा साक्षात्कार आहे, तो पेलवत नाही. निसर्गाच्या अश्या अनेक साक्षात्कारपुढे आपण नमते घेतो. इथे तर तो मानवनिर्मित. मग काही बोलायलाच नको.
मागच्या वर्षी मी खजुराहोची मंदिरं पहिली, तेव्हापासून त्याविषयी बरंच वाचण्याचा प्रयत्न केला. खजुराहोच्या मंदिरावर अनेक पुस्तकं आहेत, खूप लिहिलं गेलं आहे. तो सगळा गहिरा जलाशयच आहे. या जलाशयात थोडाफार विहार केला मग थोडं अधिक खोल पाण्यात उतरून या मंदिरांकडे बघावंसं वाटलं. म्हणून एक एक पायरी उतरू लागले. पण पायऱ्या जितक्या उतरत आहे तितक्या आणखी पायऱ्या दृश्यमान होत आहेत. बघू कुठपर्यंत उतरता येते ते.
या प्रत्येक पायरीवर मला काही गवसतं का ते बघण्याचा प्रयत्न आहे. काही पायऱ्याही लांबलचक, उंच, काही शेवाळाने आच्छादलेल्या, काही अंधाऱ्या. अशीच एक पायरी आहे चौसष्ट योगिनींची.
खजुराहो येथील चौसष्ट योगिनींचे मंदिर : ६४ रिकामी खोरणे (फोटो स्रोत: विकिपीडिया) |
खजुराहो मधे असलेल्या भव्य मंदिरांपासून वेगळे असे एक मंदिर दूर उभे आहे. ते आहे चौसष्ट योगिनी मंदिर.
एकटेच उभे असलेले हे मंदिर इतर मंदिरांपेक्षा अतिशय वेगळे. त्याचे स्वरूप इतर मंदिरांसारखे नाही. एका विस्तृत चौकोनात, त्या चौकोनाच्या बाह्य रेषेने अनेक छोट्या छोट्या देव्हाऱ्या किंवा खोरणासारख्या दगडी रचना रांगेत, एकाला एक लागून आहेत. छोटी छोटी मंदिरेच. पण मुख्य चौकानाला वर शिखर, गोपुरेंच काय पण साधे छप्परही नाही. ही अशी विचित्र रचना का केली असावी? या विचित्रतेमुळेच या मंदिराने माझे लक्ष वेधून घेतले आणि त्याच्याबद्धल अधिक जाणून घ्यावेसे वाटू लागले. म्हणून त्याबद्धल वाचायला सुरवात केली. जसं जसं वाचत गेले तसं तसं दमछाक व्हायला लागली. एक निबिड अरण्यातून किंवा थांग नसलेल्या समुद्रात पडल्यासारखे वाटले. या मंदिरामागची भूमिका, इतिहास, प्राचीन 'कल्ट' (पंथ), पुराणिक संदर्भ, मध्ययुगीन संदर्भ, यातून मार्ग काढत काढत चाललेली वाट न संपणारी वाटत आहे. या चौसष्ट योगिनींनी मला पुरते झपाटून टाकले आहे हे मात्र खरे.
कोण होत्या या चौसष्ट योगिनी? या मंदिरातल्या प्रत्येक छोट्या छोट्या चौकटी देव्हाऱ्यात एकही मूर्ती आता नाही. कुठे गेल्या त्या सर्व? या मूर्ती कशा होत्या? आणि थोड्या थोडक्या नव्हे तब्ब्ल ६४.
योगिनी या शब्द संस्कृत 'योग' या शब्दापासून तयार झाला आहे. 'योग' या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. म्हणजे एक होणं, एकत्र होणं. याबरोबरच संदर्भानुसार या शब्दाचे चाळीसेक वेगवेगळे अर्थ होतात. 'योग' या शब्दावरूनवरूनच 'योगीन' शब्द बनला आहे ज्याचेही अनेक अर्थ आहेत, जोडलेले असणे, बहाल असणे, जादुई शक्ती असणे, भक्त, साधक, ज्याला प्राप्ती झाली आहे असा, संन्यासी/संन्यासी स्त्री , जादूगार/जादूगारीण , मायाकार, मांत्रिक, इंद्रजालिक, 'योगा' ही तत्वज्ञानाची शाखा अनुसरणारा, चेटूक करणारा/करणारी, स्त्री साधक,शिव किंवा शक्ती (दुर्गा) यांचे गण/दास, योगी संप्रदायाची मुख्य(देवता).
या सर्व अर्थामधला नेमका या मंदिरातल्या योगिनींचा अर्थ कुठला? यासाठी आधी जाणून घेतले पाहिजे की हे मंदिर कश्या स्वरूपाचं होतं? इथे कशाप्रकारची साधना/पूजा होत होती, कोण होते हे लोक जे या प्रकारच्या मंदिरातील या देवतांचे उपासक होते? आणि या मंदिरातील आता अस्तित्वात नसलेल्या या मूर्तींचे स्वरूप नक्की काय होते? कुठे सापडतील या मूर्ती? खजुराहोमधील मंदिरात एकही मूर्ती अस्तित्वात नाही, या प्रकारची अन्य मंदिरं कुठे आहेत का?. तर अशी फार मोजकीच मंदिरं भारतात अस्तित्वात आहेत. त्यातली तीन चारच चांगल्या अवस्थेत आहेत.
योगिनींची मंदिरं मुख्यत्वे उत्तर भारतात आहेत. दक्षिण, पश्चिम भारतात ती फारशी आढळत नाहीत. नवव्या आणि दहाव्या शतकांत या मंदिरांची बांधणी झाली होती. त्या काळात शाक्त संप्रदाय आणि त्याचे अनुसरण खूप वाढले होते. हे प्रमाण उत्तर भारतात जास्त होते कारण, शाक्त संप्रदाय हा उत्तरेकडे, काश्मीर इ. भागातच उगम पावला होता. साहजिकच जवळपास त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला.
तर ही योगिनींची मंदिरे आजही आपले अस्तित्व टिकवून आहेत, आता तिथे उपासना होत नाही. ती निर्जन, abandoned अवस्थेत आहेत. मध्यप्रदेशात खजुराहो, दुधाई, बादोह, शहाडोल, जबलपूरचा भेडाघाट, बारातसादेरी, हिंगलाजगढ येथे ही मंदिरं आहेत. ओरिसा मध्ये हिरापूर, रानीपूर-झारियल येथे दोन मंदिरं आहेत. उत्तरप्रदेश मध्ये मितौली, लोखारी, नारेसर,रीखीयान येथे अत्यंत पडक्या अवस्थेतील मंदिर अवशेष सापडतात. इथेतर मंदिर किंवा मंदिरांचे अवशेष तरी उपलब्ध आहेत, पण उज्जैन, अजमेर, भरूच, वाराणसी, दिल्ली ही सुद्धा पूर्वी योगिनींच्या मंदिरांची ठाणी होती. आता तिथे त्याचा काहीही मागमूस सापडत नाही.
ही मंदिरं अत्यंत वेगळ्या स्वरूपाची आहेत. छप्पर नसलेली (hypaethral), आकाशाभिमुख, दगडाची, वर्तुळाकार, एखाद्या ग्रीक कोलोझियम (Colosseum) ची आठवण करून देणारी. असा आकार भारतातील इतर हिंदू मंदिरात कुठेही आढळणार नाही. या वर्तुळाकार भिंतीत कप्पे, आणि त्या प्रत्येक कप्प्यात एक एक योगिनीची मूर्ती. योगिनींची संख्या फक्त चौसष्ठच नाही. काही मंदिरात त्या एक्याऐंशी आहेत, काहींत त्या बेचाळीस आहेत. आणि सर्व मंदिरांची रचनाही वर्तुळाकारच नाही, काहींची रचना चौकोनीदेखील आहे. या मंदिरांच्या मध्यभागी 'भैरवाची' मूर्ती असते. खरंतर ही मंदिराची वैशिष्ठयपूर्ण रचना (वर्तुळाकार दगडी गोल आणि मध्यभागी भैरवमूर्ती ) म्हणजे Top View ने बघितले तर शिवपिंडीचा(गोलाकार योनीपट्ट आणी मध्यभागी शिवलिंग) आकार नव्हे का? मग काही मंदिरे चौकोनी का? तर शिवपिंडीची चौकोनी रचना सुद्धा अस्तित्वात आहे. मध्यप्रदेशातच भोजपूर येथील शिवमंदिरातील शंकराची पिंडी चौकोनी आहे. या मंदिरांच्या रचनेचा आणि शिवपिंडीच्या आकाराशी काही संबंध आहे का? योगिनींचा शैव आणि शाक्त पंथांशी घनिष्ठ संबंध आहे. भैरव हे तर शिवाचे रौद्र-संहारी रूप. मग या योगिनी संहाराच्या, रौद्रतेच्या आणि सामर्थ्याच्या भयकारी प्रतिमा आहेत का?
अतिशय वेगळ्या रचनेमूळे, आणि त्यातल्या अतिशय वेगळ्या योगिनींच्या मुर्तींमूळे अनेक अभ्यासकांचे याकडे लक्ष गेले. सर्वात प्रथम या योगिनींच्या मंदिरांचा अभ्यास केला 'विद्या देहेजिया' यांनी. १९८६ मध्ये त्यांचे एक पुस्तक प्रकाशित झाले होते, 'Yogini Cult And Temples: A Tantric Trandition'. या पुस्तकात त्यांनी सर्वप्रथम 'योगिनी' च्या कल्टबद्धल, या मंदिरांबद्धल, शिल्पांबद्धल विस्तृतपणे लिहिलं. त्यामुळे हे पुस्तक या संबंधीच्या अभ्यासातील 'अग्रगण्य' मानले जाते. त्यानंतर अनेक संशोधक, अभ्यासक, विद्वान यांनी या मंदिरांसंबंधी बरेच संशोधन, अभ्यास केला. अजूनही करत आहेत. कारण हा तसा न संपणारा विषय आहे. त्यांनी पुस्तकरूपाने, प्रबंधरूपाने अनेक शोधनिबंध लिहिले आहेत. या सर्वांचे वाचन म्हणजे एका अथांग समुद्रातील हिंदकळत जाणारा प्रवासच. बरं, प्रत्येकाने आपले तन, मन लावून आपल्या पद्धतीने, परीने या 'योगिनी मंदिरांच्या गूढाचे' संशोधन, अवलोकन , आकलन केले आहे. अनेक सिद्धांत मांडले आहेत, अनेक शक्यता दर्शविल्या आहेत. एवढे सगळे करून देखील 'योगिनीचे गूढ' पूर्णपणे आकळले आहे असे नाहीच.
सर्वात कोड्यात टाकणाऱ्या आहेत या योगिनींच्या मूर्ती, त्यांची शिल्पं, त्यातून दिसणारी त्यांची विविध रूपं, त्यामागच्या प्रेरणा. त्यामागची गूढता. गुह्यता. कुठल्याही मंदिरात त्यांची रूपं सारखी नाहीत हे आणखी एक गूढ. विद्या देहीजिया जेव्हा योगिनींच्या मंदिराचा शोध घेण्यासाठी त्या काळात (ऐंशीच्या दशकात) भारतभर फिरल्या तेव्हा त्यांना दिसले की ही देवळे अशीच मुद्दाम पडक्या अवस्थेत सोडून दिलेली नाहीत, कालांतराने हा संप्रदाय/कल्ट आणि त्याची उपासना या मंदिरात होणे बंद झाले, आणि सामान्य लोकही या मंदिरापासून दूरच राहिले. याला काही कारणं आहेत. मुख्य कारण म्हणजे 'भीती'. या मंदिरांबद्धल तिथले रहिवासी लोक मनात भय बाळगून आहेत. का बरे? असे काय आहे त्या मंदिरात? कुणी त्यांना ही भीती घातली आणि असे काय होत होते त्या मंदिरात ज्याची भीती वर्षानुवर्षे त्यांच्या मनावर पडून आहे? माणसाचे मन किती विचित्र आहे, जे दिसत नाही, जे कळत नाही त्याबद्धल भीती वाटते त्याला. पण कितीही गूढ आणि वैचित्र्यपूर्ण असली ही मंदिरं आणि त्यातल्या मूर्ती, तरीही हे समजून घेतलेच पाहिजे की त्यांची निर्मिती मानवी मनानेच केली आहे. जसे सात्विक सौन्दर्य मानवी मनाने कल्पिले, योजले आणि अस्तित्वात आणले तसे बीभत्स, भयकारी सौन्दर्य ही कल्पणारे मानवी मनच आहे. त्यामुळे या मंदिराबद्धल जाणून घेण्यात फक्त तो कल्ट काय होता, उपासना काय होती? कोण त्याचे आचरण करत होते? एवढेच समजत नाही, या प्रश्नांच्या बरोबरच हेही समजते की मानवी मन आणि त्याच्या संकल्पना, विचार आणि जडणघडण कशी अनंत लीला घडवणारी आहे. हा 'चौसष्ट योगिनींचा' शोध नसून मानवी मनाच्या अश्या गूढगर्भाचा शोध आहे ज्यातून त्याचे खोल कप्पे उलघडू शकतात. थेट तळघरापर्यंत.
योगिनींबद्धल एक अत्यंत महत्वाचे वैशिष्ट्य हे की त्या खेचरी होत्या (उडू शकणाऱ्या), आभाळात मुक्त संचार करणाऱ्या. (आणि म्हणूनच त्यांची मंदिरं आकाशाकडे उघडलेली, बिनछपराची होती). पण योगिनींची भरारी ही खरी मानवी मनाची भरारी नव्हे का?
योगिनी या शब्द संस्कृत 'योग' या शब्दापासून तयार झाला आहे. 'योग' या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. म्हणजे एक होणं, एकत्र होणं. याबरोबरच संदर्भानुसार या शब्दाचे चाळीसेक वेगवेगळे अर्थ होतात. 'योग' या शब्दावरूनवरूनच 'योगीन' शब्द बनला आहे ज्याचेही अनेक अर्थ आहेत, जोडलेले असणे, बहाल असणे, जादुई शक्ती असणे, भक्त, साधक, ज्याला प्राप्ती झाली आहे असा, संन्यासी/संन्यासी स्त्री , जादूगार/जादूगारीण , मायाकार, मांत्रिक, इंद्रजालिक, 'योगा' ही तत्वज्ञानाची शाखा अनुसरणारा, चेटूक करणारा/करणारी, स्त्री साधक,शिव किंवा शक्ती (दुर्गा) यांचे गण/दास, योगी संप्रदायाची मुख्य(देवता).
या सर्व अर्थामधला नेमका या मंदिरातल्या योगिनींचा अर्थ कुठला? यासाठी आधी जाणून घेतले पाहिजे की हे मंदिर कश्या स्वरूपाचं होतं? इथे कशाप्रकारची साधना/पूजा होत होती, कोण होते हे लोक जे या प्रकारच्या मंदिरातील या देवतांचे उपासक होते? आणि या मंदिरातील आता अस्तित्वात नसलेल्या या मूर्तींचे स्वरूप नक्की काय होते? कुठे सापडतील या मूर्ती? खजुराहोमधील मंदिरात एकही मूर्ती अस्तित्वात नाही, या प्रकारची अन्य मंदिरं कुठे आहेत का?. तर अशी फार मोजकीच मंदिरं भारतात अस्तित्वात आहेत. त्यातली तीन चारच चांगल्या अवस्थेत आहेत.
भेडाघाट, जबलपूर, मध्यप्रदेश येथील एक्याऐंशी योगिनींचे मंदिर (फोटो स्रोत: विकिपीडिया) |
योगिनींची मंदिरं मुख्यत्वे उत्तर भारतात आहेत. दक्षिण, पश्चिम भारतात ती फारशी आढळत नाहीत. नवव्या आणि दहाव्या शतकांत या मंदिरांची बांधणी झाली होती. त्या काळात शाक्त संप्रदाय आणि त्याचे अनुसरण खूप वाढले होते. हे प्रमाण उत्तर भारतात जास्त होते कारण, शाक्त संप्रदाय हा उत्तरेकडे, काश्मीर इ. भागातच उगम पावला होता. साहजिकच जवळपास त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला.
तर ही योगिनींची मंदिरे आजही आपले अस्तित्व टिकवून आहेत, आता तिथे उपासना होत नाही. ती निर्जन, abandoned अवस्थेत आहेत. मध्यप्रदेशात खजुराहो, दुधाई, बादोह, शहाडोल, जबलपूरचा भेडाघाट, बारातसादेरी, हिंगलाजगढ येथे ही मंदिरं आहेत. ओरिसा मध्ये हिरापूर, रानीपूर-झारियल येथे दोन मंदिरं आहेत. उत्तरप्रदेश मध्ये मितौली, लोखारी, नारेसर,रीखीयान येथे अत्यंत पडक्या अवस्थेतील मंदिर अवशेष सापडतात. इथेतर मंदिर किंवा मंदिरांचे अवशेष तरी उपलब्ध आहेत, पण उज्जैन, अजमेर, भरूच, वाराणसी, दिल्ली ही सुद्धा पूर्वी योगिनींच्या मंदिरांची ठाणी होती. आता तिथे त्याचा काहीही मागमूस सापडत नाही.
मितौली, उत्तर प्रदेश येथील योगिनी मंदिर (फोटो स्रोत: विकिपीडिया) |
अतिशय वेगळ्या रचनेमूळे, आणि त्यातल्या अतिशय वेगळ्या योगिनींच्या मुर्तींमूळे अनेक अभ्यासकांचे याकडे लक्ष गेले. सर्वात प्रथम या योगिनींच्या मंदिरांचा अभ्यास केला 'विद्या देहेजिया' यांनी. १९८६ मध्ये त्यांचे एक पुस्तक प्रकाशित झाले होते, 'Yogini Cult And Temples: A Tantric Trandition'. या पुस्तकात त्यांनी सर्वप्रथम 'योगिनी' च्या कल्टबद्धल, या मंदिरांबद्धल, शिल्पांबद्धल विस्तृतपणे लिहिलं. त्यामुळे हे पुस्तक या संबंधीच्या अभ्यासातील 'अग्रगण्य' मानले जाते. त्यानंतर अनेक संशोधक, अभ्यासक, विद्वान यांनी या मंदिरांसंबंधी बरेच संशोधन, अभ्यास केला. अजूनही करत आहेत. कारण हा तसा न संपणारा विषय आहे. त्यांनी पुस्तकरूपाने, प्रबंधरूपाने अनेक शोधनिबंध लिहिले आहेत. या सर्वांचे वाचन म्हणजे एका अथांग समुद्रातील हिंदकळत जाणारा प्रवासच. बरं, प्रत्येकाने आपले तन, मन लावून आपल्या पद्धतीने, परीने या 'योगिनी मंदिरांच्या गूढाचे' संशोधन, अवलोकन , आकलन केले आहे. अनेक सिद्धांत मांडले आहेत, अनेक शक्यता दर्शविल्या आहेत. एवढे सगळे करून देखील 'योगिनीचे गूढ' पूर्णपणे आकळले आहे असे नाहीच.
हिरापूर, ओरिसा येथील चौसष्ट योगिनींचे मंदिर (फोटो स्रोत:विकिपीडिया) |
योगिनींबद्धल एक अत्यंत महत्वाचे वैशिष्ट्य हे की त्या खेचरी होत्या (उडू शकणाऱ्या), आभाळात मुक्त संचार करणाऱ्या. (आणि म्हणूनच त्यांची मंदिरं आकाशाकडे उघडलेली, बिनछपराची होती). पण योगिनींची भरारी ही खरी मानवी मनाची भरारी नव्हे का?
क्रमश:
No comments:
Post a Comment