Wednesday, 19 September 2018
Monday, 21 May 2018
वृक्षप्रकल्पातील हिरवा सोबती १९:वारंग
शास्त्रीय नाव : Kydia calycina
Malvaceae म्हणजेच Cotton family तील हे झाड आहे.
याची पाने 'कापूस' च्या पानांसारखी असतात.
याची फुलं पांढरी असतात, पण काही दुर्मिळ variety मध्ये फुलांच्या पाकळ्यांवर लालसर छटा असतात. (splotched with scarlet at base). याची ताजी फुले किती काळ टिकतात? ते शोधले पाहिजे, पण याची वैशिष्ट्यपूर्ण फळे मात्र सूकूनही बराच काळ झाडावर राहतात. या सुकलेल्या फळांवरूनही हा 'वारंग' च आहे याची खात्री पटायला मदत होते. त्याची फळांच्या calyx च्या खाली लांब पाकळ्यांसारखे bracts असतात. हे bracts चार ते सहा असू शकतात. मी काही झाडांवर चार bracts चे फळ बघितले आहे आणि काही इतरांनी काढलेल्या फोटोत पाच bracts चे फळही पाहिले आहे. तुंगारेश्वर येथे याचे दोन वृक्ष मी पाहिले आहेत.
ऑगस्टच्या शेवटापासून हे झाड फुलते ते ऑक्टोबर पर्यंत फुलण्याचा मौसम टिकतो, त्यानंतर नोव्हेंबर- डिसेंबर मध्ये फळे येतात, ही परीपक्व फळे अनेक महिने झाडावरच राहतात.
Thursday, 17 May 2018
आबोली, रान आबोली आणि भावंडं
आबोलीचा एक प्रकार रतन आबोली माझ्याकडे आहे. अतिशय सुंदररंगाला काय म्हणावे? आबोली रंगच म्हणावे, कारण आबोलीचा रंग तसा सांगतच येणार नाही. घरीदारी लावली जाते ते रतन आबोली आणि एक पिशी आबोली पण असते. आबोलीचं शास्त्रीय नाव : Crossandra infundibuliformis
तर या आबोलीची इतर भावंडंही आहेत. रानातील भावंडं.
Eranthemum या कुळात काही आबोल्या आहेत.
Bracts white with green nerves........................
..........E. roseum (Vahl.) R. Br.
Bracts green, many nerved, white ciliate on margins...E. purpurascens Nees
Bracts green, few nerved, viscous hairy......................E. capens L. var. concanense (T. And. C. B. Cl.) Sant.
Ecbolium ligustrinum (Vahl) Vollesen/ धाकटा अडुळसा , एकबोली , रान आबोली
तर या आबोलीची इतर भावंडंही आहेत. रानातील भावंडं.
Eranthemum या कुळात काही आबोल्या आहेत.
Bracts white with green nerves........................
Bracts green, many nerved, white ciliate on margins...E. purpurascens Nees
Bracts green, few nerved, viscous hairy......................E. capens L. var. concanense (T. And. C. B. Cl.) Sant.
Ecbolium ligustrinum (Vahl) Vollesen/ धाकटा अडुळसा , एकबोली , रान आबोली
Sunday, 13 May 2018
प्रेरणा
काही दिवसांपासून मला सारखं असं वाटत होतं की झाडांचा अभ्यास करून आपण काय करत आहोत? कशासाठी करायचा हा अभ्यास? याने काय मिळणार? कुठच्याही रूढार्थाने मी वनस्पती संशोधक नाही, botanist नाही की त्या विषयाची पदवी माझ्याकडे नाही. मग हा अभ्यास कशासाठी करायचा? असा प्रश्न मला पडला होता. मनाला एकप्रकारची खिन्नता आली होती.
काल रविवारी सकाळी मी दत्ताजी साळवी उद्यानात गेले होते, झाडांची, निसर्गाची मनापासून आवड असलेल्या माझ्या एका मैत्रिणीबरोबर.
दत्ताजी साळवी उद्यान अतिशय सुंदर आहे, छोटेसेच आहे पण ही नेहमीची बाग नाही , खूप लोकं आली आहेत, मुलं खेळताहेत, आवाज, वर्दळ सुरु आहे असे तिथे काही नाही, कारण तिथे लोकांसाठी, तशी जागाच नाही. जी जागा आहे ती फक्त आणि फक्त झाडांसाठी आहे. या उद्यानाचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो स्वतः एक झाडांचा दर्दी चाहता आहे. त्याने कुठून कुठून ही झाडं तिथे आणली आहेत. त्यामुळे या उद्यानाचे रूप इतर उद्यानांसारखे नाही. खूप वेगेळे आहे. दाटीवाटीने इतक्या दुनियाभरच्या जातींची झाडं तिथे गुण्यागोविंदाने एकत्र नांदताहेत. आणि त्यांच्या गर्द झाडीत छोटे मुनिया, दयाळ , नाचणसारखे पक्षी निर्भयपणे बागडत असतात. 'नाचण' या पक्ष्याचे तर तिथे घरच आहे. ती छान झाडं आणि त्यात आनंदाने बागडणारे समाधानी पक्षी पाहून खूप आनंद झाला.
या आनंदांत भर घालायला आणखी एक कायम लक्षात राहील अशा व्यक्तीची गाठ तिथे पडली.
तिथे एक गृहस्थ बराच वेळ झाडांना न्याहाळताना दिसत होते. बराच वेळ ते तिथे होते. आमचे आणखी एक वनस्पती सहाध्यायीही तिथे आले होते. ते ठाण्याचे असल्याने बऱ्याचदा या उद्यानात येतात त्यामुळे ते त्या गृहस्थांना ओळखत होते. हळूहळू आमच्याशीही ते गृहस्थ बोलू लागले. आणि खरंच काय वनस्पतीचं ज्ञान होतं त्यांना. प्रत्येक झाडाची फुल, पाकळी, त्याच्या पानांपासून ते खोडांपर्यंत सगळं इतक्या बारकाईने त्यांना माहित होतं की आश्चर्य वाटलं. यांचे नाव होते श्री. रानडे, जवळपासच ते कुठेतरी राहतात. रोज इथे येतात आणि तासनतास त्या फुलापानांमध्ये हरवून गेलेले असतात. त्यांना निसर्गाची मनापासून असलेली आवड त्यांच्या बोलण्यातून दिसत होती, म्हणाले 'आता माझं वय शहात्तर आहे, त्यामुळे मी आता 'येऊर' वगैरेच्या जंगलात भटकायला जात नाही, दूर भटकायला आता जमत नाही, म्हणून मी इथे येतो.
आणि खरंच इथे येऊन त्यांनी रोज निरक्षण करून झाडांबद्दलचे जे ज्ञान संपादन केले आहे त्याला तोड नाही. त्यांना त्या गार्डनमधील जवळपास सगळीच झाडे माहित होती. कुठच्या झाडाला कधी फुल येणार तेही माहित होते. 'तुम्ही इतक्या दुरून आलात तर आता हे फुल बघूनच जा कारण ते परत दिसेल की नाही कोण जाणे' असे आम्हाला सांगून त्यांनी जी झाडं दाखवायला सुरवात केली ती जवळपास अर्धा-पाऊण तास झाला तरी संपेना. खरंतर त्यांना घरी जायचे होते, पण त्यांचा उत्साह एवढा होता आणि आपल्याला स्वतःला फुलं बघून जितका आनंद झाला तो दुसऱ्यालाही द्यावा अशी त्यांची एवढी प्रबळ इच्छा होती, की एकामागोमाग एक त्यांनी अशी फुलं, पानं दाखवली की आम्ही थक्कच झालो. बरं त्यांना झाडांविषयी जी माहिती होती ती नुसती वरवरची माहिती नव्हती. अगदी त्या फुलाचा विशिष्ट गंध, त्याचा आकार, अर्धवट उमललेल्या फुलातील न दिसणारा भाग, पानांचे निरनिराळे पृष्ठभाग आणि त्यांचे जाणवणारे स्पर्श, पानं चुरडल्यावर येणारे विशिष्ट गंध यांचे त्यांना अपरिमित ज्ञान होते, प्रत्येक झाडाचे नाव त्यांना माहित होते. ते प्रत्येक झाडाला नावानेच नव्हे ते अंतरंगांने ओळखत होते. या सर्वामुळे फुलापानांइतकेच टवटवीत आणि प्रफुल्लित होते हे रानडेकाका.
त्यांच्यामुळे मलाही एकदम छान वाटू लागले, त्यांची ऊर्जा त्यांनी नकळत आम्हाला दिली होती.
तेव्हा मला जाणवले की आपण जो झाडांचा अभ्यास करत आहोत, तो निरपेक्ष मनाने केला तर कधीतरी अनेक वर्षांनी आपणही कुठल्यातरी बागेत, जंगलात फिरत असू, तेव्हा असेच कुणीतरी झाडांची आवड असणारे तिथे येतील, तेव्हा आपणही याच रानडेकाकांच्या उत्साहाने त्यांना चार निसर्गाचे सुंदर विभ्रम दाखवू शकू आणि आपली ऊर्जा तिथे असलेल्या एखाद्या खिन्न झालेल्या , 'आपण हे का करत आहोत? याचा काय उपयोग?' असा प्रश्न मनोमन विचारणाऱ्या एखाद्या व्यक्तीला देऊ शकू. हेच त्या वनस्पतींच्या, झाडांच्या अभ्यासाचे सार्थक असेल.
'काय करतो? का करतो? त्याने काय मिळेल?' याचा विचार न करता, ध्यासाने झपाटून एखादं कार्य करत राहिलं की भले त्यातून काही व्यावहारिक लाभ होईल न होईल, पण मनापासून जेव्हा ते काम केले जाईल तेव्हा आपल्याकडे निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा नक्कीच आपण इतरांना देऊ शकू, किंबहुना आपण न देताच ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल.
इतके दिवस पडणारा प्रश्न 'काय या अभ्यास करण्याचा उपयोग?' या छोट्याशा अनुभवाने एकदम नाहीसा झाला. एखाद्या माणसालादेखील जे कार्य आपण करतो, जसे आपण आहोत त्यातून छोटीशी का होईना प्रेरणा मिळाली तरी खूप झाले असे मला वाटले. रानडेकाकांना माहितही नाही की त्यांच्यामूळे मला खूप प्रेरणाही मिळाली आणि खूप छानही वाटले.
Wednesday, 9 May 2018
वृक्षप्रकल्पातील हिरवा सोबती १८: तेंदू कुटुंबातील भावंडं : लोहारी , तेंदू , टेम्भूर्णी
आतापर्यंत मी तेंदू/टेम्भूर्णी कुटुंबातील (Diospyros genus मधील) तीन झाडं बघितली आहेत. यातल्या दोघांना मराठीत टेम्भूर्णी असंच नाव आहे. तिसऱ्याला 'लोहारी' असं नाव असल्याचं eflora india या ग्रुप वर कळलं.
Diospyros malabarica - टेम्भूर्णी
Diospyros melanoxylon - Coromandel ebony - तेंदू / टेम्भूर्णी
Diospyros montana - लोहारी
संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये Diospyros malabarica आणि Diospyros montana (शिलोंडा ट्रेल) ही झाडं आहेत. तुंगारेश्वर येथे Diospyros melanoxylon हे झाड मी पाहिले आहे. Diospyros montana हे झाड मी माथेरान येथे पाहिले आहे.
लोहारी/Diospyros montana
'लोहारी' Diospyros montana हे झाड Ebenaceae या कुटुंबातील Persimmon family तील आहे. Persimmon म्हणजे या झाडांचे विशिष्ट प्रकारचे फळ. हे फळ टोमॅटोसारखे मोठे असून खाण्यालायक असते, त्याचे sepals वैशिष्ट्यपूर्ण असतात. हे झाड शुष्क, खडबडी दगडांनी युक्त अशा जमिनीत वाढते. साधारणपणे डोंगराळ टेकड्या हे त्याचे स्थान. हे झाड जर बऱ्यापैकी मोठे असेल तर त्याच्या खोडावरून ते चटकन ओळखता येते. त्याचे खोड सालपटे निघालेले असते आणि या तपकिरी सालपटांच्या खालचा खंडाचा भाग हिरवट असतो.
हे झाड इतर Diospyros भावंडांप्रमाणेच dioecious आहे. म्हणजेच याची male आणि female फुले वेगळी असून ती वेगळ्या झाडांवर असतात. male आणि female झाडे जवळपास कुठेतरी असतात. फुलांचा रंग फिकट हिरवा असतो आणि ती एखाद्या रुंद सुरई सारखी असतात. या सुरईसारख्या खोलगट आकाराच्या टोकाला चार छोटे पाकळ्यांसारखे (पण पाकळ्या नव्हेत) भाग असतात. male फुलं झुबक्याने असतात आणि त्यांच्यात ८ stamens (पुंकेसर) च्या जोड्या असतात. female फुलं solitary असतात, आकाराने male फुलांपेक्षा मोठी असतात आणि त्यात ४ styles असतात. स्त्री फुलांत stamens अतिशय छोटे, staminoides च्या रूपात असतात.
फळ गोलसर असून ३cm व्यासाचे असते. फळाला टोकदार शंकूच्या आकाराचे टोक असते. त्याचे calyx lobes रुंद पसरट झालेले असतात. पिकलेल्या फळाचा रंग पिवळा होता आणि नंतर ते काळे पडते.
मला हे झाड माथेरानच्या मंकी पॉईंटच्या शेवटच्या टोकावर दिसले. जोरदार वाऱ्याने ते नुसते हेलकावे खात होते.
Diospyros melanoxylon - Coromandel ebony - तेंदू
Diospyros malabarica - टेम्भूर्णी
Friday, 27 April 2018
वृक्षप्रकल्पातील हिरवा सोबती १७: पेटारी
हा विशाल वृक्ष तसा दुर्मिळ आहे. पण जंगलात सापडू शकेल. मला तो पहिल्यांदा संजय गांधी नॅशनल पार्क इथे दिसला. त्याच्यावर लावलेल्या पाटीमूळे मला त्याचे नाव कळले. जूनच्या शेवटच्या आठवड्यात जेव्हा मी तो बघितला तेव्हा त्याला मऊ मखमली हृदयाकृती पाने होती. हा वृक्ष तीस-चाळीस फूट उंच होता.
त्यानंतर पुन्हा हा वृक्ष दिसला तुंगारेश्वरच्या जंगलात. इथे दिसलेला पेटारी वृक्ष मात्र छोटा होता, साधारण १५ फूट उंच. पण मार्चमध्ये तो फुलाला होता. याची फुले uni-sexual आहेत, म्हणजेच male flowers आणि female flowers वेगवेगळी असून वेगवेगळ्या झाडांवर असतात. मला दिसलेला वृक्ष male tree होता. female tree ची फुले कशी असतात हे माहित नसल्याने जवळपास मला स्त्री वृक्ष दिसला नाही. अशा वेगवेगळे Male , female झाडे असणाऱ्या tree species ना dioecious trees म्हटलं जातं. 'पेटारी' च्या स्त्री आणि पुरुष वृक्षांची फुले अतिशय वेगळी असतात.
![]() |
| नर पुष्पे आणि वृक्ष |
![]() |
| पेटारी वृक्षाची रोपटी |
नंतर पुन्हा काही दिवसांनी तुंगारेश्वर येथे गेले असताना एके ठिकाणी 'पेटारी' च्या स्त्री वृक्षाची गाठ पडली. स्त्री वृक्षालाच फळे धरतात. तेव्हा या छोट्याशा वृक्षाला फळे असल्यानेच त्याची ओळख पटली. हा वृक्ष अतिशय सुंदर आहे, मोहक, मखमली , गोलाकार आणि मोठी हृदयाकृती पाने असतात. हा पानगळ वृक्ष असल्याने, हिवाळ्याच्या दरम्यान पानगळ होऊन पूर्ण निष्पर्ण होतो. वसंताच्या सुरवातीला तुऱ्यांसारख्या(long pendulous racemes) स्वरूपात नरपुष्पे येतात. या तुऱ्यात लाल-किरमिजी रंगाचे कळे आणि पिवळसर सूक्ष्म केसरांची फुले एकत्रित असतात. अशा तुऱ्यांनी डवरलेला पेटारी नर वृक्ष फार सुंदर दिसतो.
![]() |
| स्त्रीवृक्ष आणि फळे |
स्त्रीपुष्पे मला अजून पाहायला मिळाली नाहीत. पुढच्या वर्षी नक्की स्त्रीपुष्पांच्या झाडाला फुलण्याच्या काळात भेट द्यायची आहे. स्त्रीपुष्पे अतिशय सुंदर असतात आणि तुऱ्यांच्या स्वरूपात नसून एकेकटी येतात किंवा दोन तीन जवळजवळ असतात.
याचे शास्त्रीय नाव 'Trewia Nudiflora var. polycarpa' असे आहे. याला इंग्रजीमध्ये 'Many Fruited Trewia' असे म्हणतात. हा वृक्ष Euphorbiaceae म्हणजे castor (एरंड) कुळातील आहे. खरंतर पेटारी वृक्षाचे दोन variations आहेत, Trewia Nudiflora आणि Trewia Nudiflora var. polycarpa. या दोन्ही variations मध्ये male flowers सारखीच असतात. यावर अतिशय मार्मिक टिप्पणी मला eflora india या ग्रुपवर मिळाली.
राधा वेच या तज्ज्ञ वनस्पतीअभ्यासक विदुषींनी ती दिली आहे आणि त्यांच्या म्हणण्यात तथ्य असावे. अशा दोन variations पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
There is some confusion about the Trewia spp.
T. nudiflora Linn.
has female flowers solitary or 2-3 together on long peduncles. The fruit
are up to 4cm in diameter. The leaves tend to be longer than broad.
Trewia polycarpa Benth. has numerous female flowers in short racemes with fruit usually 1cm or less. The leaves are often as broad as long. Male flowers of both spp look the same.
I haven't seen T nudiflora Linn at SGNP, but it is common in some other areas and quite distinctive. The common name Petari has been used for both species.
Trewia polycarpa Benth. has numerous female flowers in short racemes with fruit usually 1cm or less. The leaves are often as broad as long. Male flowers of both spp look the same.
I haven't seen T nudiflora Linn at SGNP, but it is common in some other areas and quite distinctive. The common name Petari has been used for both species.
पेटारी वृक्ष औषधी देखील आहे, पानांचा, खोडाचा, मुळांचा उपयोग अनेक पद्धतीने केला जातो.
Plant is used for the removal of bile and phlegm. Leaves and its
decoction are applied to swellings and in healing of wounds and
injuries. Bark is used for the treatment of enlarged thyroid. Decoction
of the root is stomachic and alterative; used in flatulence, gout and
rheumatism. Decoction of shoots is said to relive flatulence and
swellings.
Monday, 23 April 2018
ओंबळी (Joint Fir/Gnetum ula)
कर्नाळा पक्षी अभयारण्यात एक बोर्ड लावलेला आहे, 'भारतात सापडण्याऱ्या नेटूमच्या सहा प्रजातींपैकी एक म्हणून 'ओंबळी' ओळखली जाते. पश्चिम घाटांतील सदाहरित वनांमध्ये ओंबळी चांगल्या प्रमाणात आढळून येतात. ओंबळीमध्ये टॅनिन मोठ्या प्रमाणावर असते, त्यामुळे या झाडाची पाने जुनी झाल्यावर काळसर दिसू लागतात. ओंबळीची पाने जाड व खवलेदार असतात. जाडसर वेलीप्रमाणे दिसणारे हे झाड कर्नाळा, राधानगरी, भीमाशंकर याठिकाणी मोठ्या प्रमाणावर आढळून येते.' हा बोर्ड जिथे लावला आहे, त्याच्या बाजूलाच हे वेलीसारखे झाड उभे होते. या वेगळ्याच अशा झाडाबद्दल फार उत्सुकता वाटली. खरंतर ही वेलच आहे. सदाहरित आहे.
नाव: उंबळी , Joint Fir,
Family: Gnetaceae (Gnetum family)
पाने opposite असतात.
वरील फोटोत कोवळी पाने दिसत आहेत. याची जुनी पाने रंगाने खरंच थोडी गडद आहेत.
ही वेल खूपच मोठी होते आणि ती उंच झाडांचे आधार घेत खूप उंचावर चढत जाते. मार्च आणि एप्रिल त्याच्या फुलण्याचा काळ असतो. फुलं uni-sexual असतात. आणि एखाद्या कोन सारखी असतात.
नाव: उंबळी , Joint Fir,
Family: Gnetaceae (Gnetum family)
पाने opposite असतात.
वरील फोटोत कोवळी पाने दिसत आहेत. याची जुनी पाने रंगाने खरंच थोडी गडद आहेत.
ही वेल खूपच मोठी होते आणि ती उंच झाडांचे आधार घेत खूप उंचावर चढत जाते. मार्च आणि एप्रिल त्याच्या फुलण्याचा काळ असतो. फुलं uni-sexual असतात. आणि एखाद्या कोन सारखी असतात.
Subscribe to:
Posts (Atom)

















