Monday 23 April 2018

ओंबळी (Joint Fir/Gnetum ula)

कर्नाळा पक्षी अभयारण्यात एक बोर्ड लावलेला आहे, 'भारतात सापडण्याऱ्या नेटूमच्या सहा प्रजातींपैकी एक म्हणून 'ओंबळी' ओळखली जाते. पश्चिम घाटांतील सदाहरित वनांमध्ये ओंबळी चांगल्या प्रमाणात आढळून येतात. ओंबळीमध्ये टॅनिन मोठ्या प्रमाणावर असते, त्यामुळे या झाडाची पाने जुनी झाल्यावर काळसर दिसू लागतात. ओंबळीची पाने जाड व खवलेदार असतात. जाडसर वेलीप्रमाणे दिसणारे हे झाड कर्नाळा, राधानगरी, भीमाशंकर याठिकाणी मोठ्या प्रमाणावर आढळून येते.'  हा बोर्ड जिथे लावला आहे, त्याच्या बाजूलाच हे वेलीसारखे झाड उभे होते. या वेगळ्याच अशा झाडाबद्दल फार उत्सुकता वाटली. खरंतर ही वेलच आहे. सदाहरित आहे.

नाव: उंबळी , Joint Fir,
Family: Gnetaceae (Gnetum family)
पाने opposite असतात.

वरील फोटोत कोवळी पाने दिसत आहेत. याची जुनी पाने रंगाने खरंच थोडी गडद आहेत.



ही वेल खूपच मोठी होते आणि ती उंच झाडांचे आधार घेत खूप उंचावर चढत जाते. मार्च आणि एप्रिल त्याच्या फुलण्याचा काळ असतो. फुलं uni-sexual असतात. आणि एखाद्या कोन सारखी असतात.



No comments:

Post a Comment