एक डॉक्टर असून झाडापेडांविषयी इतकी जिज्ञासा बाळगणाऱ्या राणी बंग यांचे खरंच कौतुक वाटते. त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील जंगलातल्या असंख्य झाडांची माहिती तिथल्या आदिवासी स्त्रियांकडून गोळा केली. या स्त्रियांच्या जीवनाचाच भाग असलेली ही झाडं जणू मैत्रिणीच (मैत्रीण शब्दाला तिथल्या स्थानिक भाषेत 'गोईण' असा शब्द आहे )आहेत असे लेखिकेला वाटते. म्हणून पुस्तकाचे नाव 'गोईण'.
यातील माहिती अतिशय सुरस आणि उपयुक्त आहे. अशी पुस्तकं आणखी हवीत. आपल्या आजूबाजूला वाढणाऱ्या माणसापेक्षाही महत्वाचे असे निसर्गाचे घटक असलेल्या झाडांना अधिक जवळून समजण्यासाठी अशी पुस्तकं आणखी हवीत. माझ्या झाडांच्या शोधात या पुस्तकामुळे या झाडांना जाणून घेण्यासाठी खूप मदत होईल.
त्यांच्या पुस्तकातील हा आवडलेला भाग :
टेंभराचा डिंक आणि येल्या सरप (झाडावर आढळणारा बारीक़ हिरव्या रंगाचा साप) यावरची आदिवासींनी सांगितलेली माहिती फार वेगळी आहे.
रामायणाचा आणि त्यातूनही सीतेचा आदिवासींच्या आणि मुख्यत्वे आदिवासी स्त्रियांच्या जीवनाशी अनन्यसाधारण संबंध आहे. त्यामुळे निरनिराळ्या झाडांच्या गुणधर्मावरून त्यांच्या कल्पनेला असे धुमारे फुटतात आणि सीतेला अनुसरून किती सुरस गोष्टी ते रचू शकतात याचे हे पुढील उदाहरण.
येन (ऐन ) धावडा ही झाडे खूप उंच वाढतात. या fact वरून आदिवासी ने रचलेल्या ओळी : कोण्या वनात सोडलेस सीतेला ? वाघ दिसला तर येन धावडे स्वर्गाला जाती, पण माझी सीता काय करती?
रामजन्माच्या वेळेस पळस फुलतो . वनवासात लक्ष्मणाने सीतेसाठी पाणी आणले, तेव्हा सीतेने ते घेतले नाही कारण तो द्रोण पळसाच्या पानाचा होता. पळस म्हणजे सीतामायचा पुरुष राम.
सणावारांवरून, नात्यांवरून, दुःखावरून कितीतरी समर्पक अशा उपमा, ओळी झाडाला अनुसरून या आदिवासींनी रचल्या आहेत. त्यावरून वाटते यांचे झाडांशी, निसर्गाशी असेलेले बंध किती घट्ट आहेत.
अशाच काही पुढील रचना या पुस्तकात दिल्या आहेत.
आला पोळीयाचा सण कुडाचा पानांची पत्रावळ मांडते
काही बाया नवरा चांगला वागवत नसला तर पळसाच्या झाडाला उद्देशून दुःखने गातात 'वाटेवरचा परस (पळस ), शेंडीले कोवळा , लेकी देऊन सोयरा, पिताजी व SSS माझा ! वाटेवरचा परस , शेंडीले पिकला , लेकी देऊन चुकला पिताजी व SSS माझा । वाटेवरचा परस , वतुल्य पानांचा , सखा निष्ठुर मनाचा , बंधूजी व SSSमाझा
वनवासात सीता रामाला म्हणाली 'तुम्ही बिनफूल चे फळ आणा मगच मी तुम्हाला भाकर देईन. रामाने पुष्कळ शोध केला पण शेवटी 'हटून(थकून) गेला. राम हरला. मग सीतेने रामाला सांगितले की 'बिनफुलाचे फळ म्हणजे उंबर ! उंबराच्या झाडाला फुल येत नाही
नवरा बायकोची इच्छा कशी पूर्ण करतो हे कवठाच्या गाण्यात आहे. एका गरोदर बाईला डोहाळे लागले आहेत. तिची सखी म्हणते 'पहिल्याने गरवार , आवड झाली कवठाई , तुझ्या फिरतीचा(प्रेमाचा) शाई (नवरा), शोधलो आंबराई (जंगलात)
बहीण भावाच्या नात्याचे वर्णन , कोवा व त्याच्या बहिणीच्या उंबराच्या संबंधातील गोष्टीत आहे. कोवा नावाचा भाऊ रस्त्यात उंबराच्या झाडाखालून जाऊनही उंबराचे फळ खात नाही , आणि एकाच गावात सात श्रीमंत बहिणी असूनही त्याला जेवायला वाढत नाहीत. शेवटी कोवा भुकेने तडफडून उंबराच्या झाडाखाली मारतो. 'कोवा रे कोवा , कोवा पडला रानी , सात जणी बहिणी, नाही अवसला पाणी , सात बहिणींचा , या गोष्टीतील लोक निष्कर्ष काढतात की उंबराच्या झाडाखालून जाताना एकतारी उंबर खाल्लाचपाहिजे . उंबर फोडून खायचे नाही कारण फोडले तर आतून जे चिलटे उडतात त्या म्हणजे कोवच्या बहिणी !त्या कोवा कोवा करतात
बहिणींचे प्रेम सालई - मोवई या झाडातून व्यक्त होते. आमच्याकडे समाज आहे कि सालई -मोवई बहिणी आहेत. दिवसा त्या झाडांच्या रूपात असतात , रात्री स्त्रियांच्या . लक्ष्मणाने सीतेला रामाच्या आद्यनेवरून जंगलात नेऊन सोडले . तेव्हा जंगलात सीतामाईचे रक्षण करण्यासाठी लक्ष्मणाने सालई मोवई याना विनंती केली. सालया मोवाया , रात्रीच्या बायका, माझ्या सीतेचा गहिवर आयका। सालया-मोवाया आंदिच्या बायका , माझ्या सीताच रक्षण करा।
इंद्रजिताचा बाण लक्ष्मणाला लागला तेव्हा हनुमानाने जी औषधी वनस्पती आणली ती म्हणजे सलाई -मोवई असे समजतात.
नागवेल आणि सेहऱ्याचे झाड : दोन बहिणीत भांडण असेल तर . नागवेल स्वतःला श्रीमंत समजून गर्व करते. आणि सेहरा झाड गरीब.
मुलीवर आई-वडिलांचे प्रेम उंबराच्या झाडाच्या रूपात दाखवले आहे. मुलींसाठी वर बघताना मुलीचे आईवडील मुलाच्या दंडावर (शेतात) उंबराचे झाड आहे का नाही ते पाहतात. कारण आपली मुलगी नवऱ्यावर किंवा सासरच्या लोकांवररागवून शेतात गेली तर तिथे तीन चार दिवस तरी उपाशी राहू नये. उंबराची दोन तीन फळे खाली तरी भूक तहान लवकर लागत नाही.
कितीतरी झाडं शोधायची आहेत. अफाट निसर्गापुढे कुठे आपण पुरणार? तेव्हा साथ अशा 'गोईण' चीच वाटते.
dendrosicyous socotrana
socretia exorrhiza
Qundio wax palm
dragon tree
pando tree
guapuru or myrciaria cauliflora
tetamelaceae
croocked forest
rainbow tree
Abrus precatorious
foxglove
autumn crocus
sthropanthus
poison hemlock
water hemlock
deadly nightshade
manchineel little apple of death
rhododendron
corpse flower
bloodwood tree-dragon tree
venus flytrap
giant sequoia - general sherman
welwitschia mirabilis - worlds most resistant plant
belladona - deadly nightshade
rafflesia arnoldii - largest flower
the venda cycad
attenborough's pitcher plant
shy plant -lajri
the resurrection plant
the baseball plant
STRYCHNINE
wolfsbane - devils helmet
taxus baccata
rosary pea
doll's eye or white baneberry
वावळ - मंकी बिस्कीट वावळीच्या बिया माकडं खातात म्हणून त्यांना मंकी बिस्कीट म्हणतात
Podophyllum hexandrum in Sikkim
Brugmansia : Angles trumpet
belladonna: deadly nightshades
castor aka raisin
white snakeroot
Manchineel tree
devils helmet
oliendar
No comments:
Post a Comment