Friday, 30 March 2018

निर्गुंडी (Vitex negundo)

कर्नाळ्याच्या किल्ल्याच्या वाटेवर एक दोन ठिकाणी फार सुंदर बारीक निळ्या फुलांच्या मंजिऱ्यांचा छोटा झुडूपवजा वृक्ष दिसला. त्याची फुले अतिशय नाजूक असून फांद्यांच्या टोकांना फुलोऱ्याच्या स्वरूपात फुलली होती. पावसाचा जोर इतका वाढला होता की त्या सुंदर फुलांचा एकही फोटो घेता आला नाही. परंतु ती निळी फुलं मात्र लक्षात राहिली. त्या निळ्या रंगाच्या फुलांवरून आंतरजालावरील flowersofindia या अतिशय उपयुक्त संकेतस्थळावरून या वृक्षाचा पत्ता लागला. याचे नाव निर्गुंडी आहे असे कळले. निगडी, राननिगडी अशा स्वरूपाचे शब्द मी काही दिवसापूर्वीच 'गीर्वाणलघुकोशा'त वाचलेले मला आठवले. त्या ठिकाणी निर्गुंडी हे एक 'काळ्या फुलाचे झाड' असे लिहिलेले होते. त्याची 'निगडी' आणि 'राननिगडी' अशी नावे देखील दिली होती. मी पाहिलेला 'निर्गुंडी' वृक्ष तो हाच असावा का?
तशी निर्गुंडी ला अनेक नावं आहेत.

शास्त्रीय नाव आहे Vitex negundo.
  • VY-teks -- Latin name for the Grape genus
  • neg-UN-doh: -- Latinised form of the Sanskrit name for this plant


इंग्रजीत याला 'Chaste Tree' असे म्हणतात. याला 'शेफालिका' असेही म्हणतात. 
शेफालिका तु सुवहा निर्गुण्डी नीलिका च सा ।
सितासौ श्वेतसुरसा भूतवेशी ।   असे अमरकोशात (वनौषधी वर्ग ७०) सांगितलेले आहे. निर्गुंडीच्या मुख्य जाती दोन आहेत असे यात लिहिले आहे. कृष्ण आणि शुभ्र शेफालिका. शेफालिका, सुवहा, निर्गुण्डी , नालिका या सर्व काळ्या निर्गुंडीच्या जाती असून, श्वेतसुरसा व भूतवेशी या पांढऱ्या निर्गुंडीच्या जाती आहेत. अमरकोशात निर्गुंडीबद्दल आणखी एक वचन आहे. 
अथ सिन्दुक । सिन्दुवारेंद्र सुरसा निर्गुण्डान्द्राणित्यपि |
सिन्दुक, सिन्दुवार, इन्द्रसुरस , निर्गुण्डी व इन्द्राणिका अशी पाच नावे असून पहिली तीन पुल्लिंगी आहेत आणि उरलेली दोन स्त्रीलिंगी आहेत. 

'गीर्वाणलघुकोश' या ग्रंथात दिलेली निर्गुंडी ही काळी निर्गुंडी असून तिची फुले निळ्या रंगाची असतात. 
आदिवासी लोक निर्गुंडीला 'वणई' असे म्हणतात.
अमरकोशाच्या व्याख्यासुधा टीकेत (निर्णयसागर पृ. १७२)
सिन्दुवार श्वेतपुष्प सिन्दुक सिन्दुवारित |
नीलपुष्प शीतसहो निर्गुण्डी नीलसिन्धुक |
 हे वचन आहे.

निर्गुण्डी नीलशेफ़ाल्या सिन्दुवारद्रुमेSपि च |
हे मेदिनीकोशातील वचन आहे.


'गाथासप्तशती' या हालसातवाहनाच्या ग्रंथात निर्गुंडीचे उल्लेख दोन गाथांत आले आहेत. 
गाथा ४१२ 
सुप्पउ ! तइओ वि गओ जामोत्ति सहीओ ! कीस मं भणह ?
सेहालिआगन्धो ण देइ सोत्तुं, सुअह तुम्हे ? ||12||
 [ सुप्यतां तृतीयोSपि  गतो याम इति सख्य: किमिति मां भणथ |
शेफालिकाना गन्धो न ददाति स्वप्तुं स्वपित युयम् ||

-from संस्कृत गाथासप्तशती
स्वपिहि तृतीयोSपि गतो याम इति हि मां नु किमिति किल भणथ |
शेफ़ालिकासुगन्धः स्वप्तुं न ददाति मे , स्वपित युयम् || 12||

रात्रीचा तिसरा प्रहरही संपला; यापुढे प्रियकर येणे शक्य नाही, आता झोप, असे तुम्ही मला का सांगता? सख्यांनो , तुम्ही झोपा, शेफालिकेचा सुगंध दरवळत आहे, तो मला झोपू देत नाही. 
(शेफालिकेची फुले मध्यरात्रीनंतर दरवळू लागतात. त्यांचा सुंगंध मन्मथोद्दीपक असतो.)

गाथा ९५३ कंकणरव (Rhythm)
उच्चिणसु पडिअकुसुमं मा धुण सेंहलिअं, हलिसुण्हे |
एस अवणविरसो ससुरेण सुओ वलअसद्दो || 959||
[उच्चिनु पतितानि कुसुमानि मा धुनी: शेफ़ालिकां हालिकस्नुषे |
  ते विषंमविराव: श्वशुरेण श्रुतो वलयशब्दः ||]

शेतकऱ्याच्या सुने, फक्त (जमिनीवर पडलेली फुले गोळा कर; परसातल्या शेफालिकेकला हात लावू नको, कारण त्यामुळे तुझ्या काकणांचा आवाज होईल व तो विसंवादी स्वर तुझ्या सासऱ्याला ऐकू जाईल (आणि त्याचा परिणाम अनिष्ट होईल)


खरंतर शेफालिका म्हणजे 'पारिजातक' पण तरीही निर्गुण्डीला शेफालिका का म्हटले आहे ते कळत नाही.  निर्गुंडीची अशी पांढऱ्या फुलांची जात आहे का? तशा जातीची नोंद वनस्पतीशास्त्राच्या पुस्तकात सापडते का ते बघण्याचा मी प्रयत्न केला.

श्री. द.  महाजन यांच्या 'देशी वृक्ष' या ग्रंथात त्यांनी म्हटले आहे 'फुले लहान (१से.मी.) अनियमित रचनेची, पांढरी, निळसर किंवा जांभळट रंगाची असतात.
थीओडोर कुक यांच्या ग्रंथाच्या दुसऱ्या खंडात या वृक्षाच्या Genus चे चार प्रकार दिले आहेत. यातले तीन प्रकार कोकण आणि पश्चिम घाट/सह्याद्रीमध्ये आढळतात. त्यापैकी Vitex negundo, Vitex trifolia हे दोन्ही वृक्ष निळ्या फुलांच्या मंजिऱ्यांचे आहेत. Vitex trifolia मात्र दुर्मिळ असून मुर्डेश्वरच्या वाळूच्या किनाऱ्यांवर असल्याची नोंद कुक यांच्या ग्रंथात आहे.
Vitex altissima हा वृक्ष निळसर -पांढऱ्या फुलांचा असून त्याच्या फुलांची ठेवण बरीच वेगळी आहे.
मात्र Vitex leucoxylon हा वृक्ष पांढऱ्या फुलांचा आहे. मराठीत याला 'सोनगारबी' असे म्हणतात.
संस्कृत ग्रंथातला 'शेफालिका' हा Vitex leucoxylon असावा का? सांगणे कठीण आहे.

Vitex negundo is a food-plant of Death's Head Hawkmoth. This shrub attracts a lot of butterflies

निर्गुडीची पाने चहासोबत उकळून घेतल्यास ताप कमी होतो.
निर्गुडीचे तेलही sprains साठी उपयुक्त आहे.


Vitex trifolia, the leaflets are sessile. Apart from this, V.trifolia grows naturally along the coast - it is a littoral species.
This could be V.negundo or V.trifolia. The closer possibility is that of V.negundo. The identification key is on the leaves.
In case of Vitex trifolia, the leaflets are sessile.
Apart from this, V.trifolia grows naturally along the coast - it is a littoral species.    

Friday, 16 March 2018

एमिली डिकिन्सनच्या कविता

काय अर्थ आहे या कवितांचा? या कविता म्हणजे नुसते शब्द आहेत का की त्या पलीकडे काहीतरी आहे. काल काका मला सांगत होते. ज्ञानेश्वरांचे काही शब्द म्हणजे फक्त शब्द नाहीत ते विलक्षण प्रतिभेतून, जाणिवेच्या पुढेही जाऊन नेणीवेपर्यंतच्या अशा तेजाळ चिंतनातून प्रकटले आहेत. ते सांगत होते की हे शब्द माझ्या मनात घर करून राहतात, ते जातच नाहीत. एवढे ते शब्द सामर्थ्यशाली आहेत. त्यांनीच मला 'परातत्व स्पर्श' हा शब्द सांगितला होता. हा 'परातत्व स्पर्श 'एमिली डिकिन्सन' च्या कवितेलाही झालेला आहे.  

एमिलीच्या काही कविता


I'm nobody! Who are you?
Are you nobody, too?
Then there's a pair of us -- don't tell!
They'd banish -- you know!

How dreary to be somebody!
How public like a frog
To tell one's name the livelong day
To an admiring bog!

 -----------------------------------------------------------------

“Hope” is the thing with feathers -
That perches in the soul -
And sings the tune without the words -
And never stops - at all -

And sweetest - in the Gale - is heard -
And sore must be the storm -
That could abash the little Bird
That kept so many warm -

I’ve heard it in the chillest land -
And on the strangest Sea -
Yet - never - in Extremity,
It asked a crumb - of me.

-------------------------------------------------------------------

I died for beauty, but was scarce
Adjusted in the tomb,
When one who died for truth was lain
In an adjoining room.

He questioned softly why I failed?
"For beauty," I replied.
"And I for truth - the two are one;
We brethren are," he said.

And so, as kinsmen met a-night,
We talked between the rooms,
Until the moss had reached our lips,
And covered up our names. 

-------------------------------------------------------------------

There is another sky,
Ever serene and fair,
And there is another sunshine,
Though it be darkness there;
Never mind faded forests, Austin,
Never mind silent fields—
Here is a little forest,
Whose leaf is ever green;
Here is a brighter garden,
Where not a frost has been;
In its unfading flowers
I hear the bright bee hum:
Prithee, my brother,
Into my garden come!

-------------------------------------------------------------------

If I can stop one heart from breaking,
I shall not live in vain;
If I can ease one life the aching,
Or cool one pain,
Or help one fainting robin
Unto his nest again,
I shall not live in vain.

--------------------------------------------------------------------





 

Thursday, 15 March 2018

संध्याकाळ

एक झाड आहे बघत
स्वतःची लांबत जाणारी सावली
एकाच ठिकाणी उभे राहून

ती नदी, तुडुंब प्रवाही
पळत आहे सतत
संधीप्रकाशाचे गडद किनारे घेऊन

तो चिमणा
दिवसभराचा क्षीण विसरत 
बसला आहे उबदार पानांत गुडूप होऊन

म्लान राखी रंग 
फक्त सर्वदूर जाई पसरत
विरक्ती घेऊन

एक तारा लुकलुके
धूसर 
सांजदिवा होऊन

-२०१७



 


Saturday, 10 March 2018

जाणाऱ्या क्षणाला

इथे खुर्चीत बसून आहे  
श्वास चालला आहे
त्याबरोबर चालले आहेत
विचार
तू कित्येकदा आलास 
कित्येकदा गेलास
न सांगता
दुर्लक्ष करून
दुर्लक्षित होऊन,
दार उघडून तू  आला नाहीस
मी तुला ना पाणी विचारले ना चहा
उन्हातून आलास  का?
कि थंडीवाऱ्यातून , पावसातून
इथे बस, बोल
असे काहीच म्हटले नाही तुला
मागे अनेक वर्षांपूर्वी
मीच होते का तिथे
चहा पाणी विचारयला
ती मीच का आणखी कोण
आज आहे इथे
त्यावेळची आणि आताची मी
एकच का?
आणखी काही वर्षांनंतरही
तू येतच राहशील 
येशील,  जाशील
मीही कधीतरी विचार करेन
मी आज आहे तशी
तेव्हा मला मी दिसेन ?
तुला हात दाखवला तरी
तुझ्याकडून प्रतिसाद नाही
बोलणार कसं
तुला वेळच नाही
थांबवून काय करायचे
सांगायला काहीच नाही
पण तुला
एक विचारायचे आहे
शेवटच्या क्षणी
येशील, भेटशील
तेव्हाही तू जाशील ?
की कायमचा माझ्याबरोबर
राहशील ?


-८- मार्च-२०१८




Thursday, 8 March 2018

उलमा आणि इतर पक्षी ज्यांना भेटायचे आहे जाण्यापूर्वी

बिक्रम ग्रेवाल या पक्षीअभ्यासकाचे काही लेख सप्टेंबर २०१७ पासून येत होते. त्या क्रमश: लेखमालेचे नाव होते 'Fifty birds to see before you die'. रविवारच्या 'Times Mirror'  या वृत्तपत्रात १७ सप्टेंबर पासून दर पंधरा दिवसांच्या अंतराने (fortnightly) हे लेख येत होते, त्यांची कात्रणे मी शक्य तेवढी मिळवून जमवली. 
या पन्नास च्या यादीत दिलेला एकही पक्षी मी बघितलेला नाही. हे पक्षी दुर्मिळ तरी आहेत, किंवा सहजासहजी नजरेस न पडणारे आहेत. आणि बहुतेक पक्षी दुर्गम भागातीलही आहेत. यांना भेटायचे असले तरी कसे भेटणार? निसर्गात एवढे काही बघण्यासारखे आहे, की एक एक बघायचे म्हटले तर शंभर जन्मही पुरे पडणार नाहीत. 
मग विचार केला या जन्मी या पन्नास पक्ष्यांना प्रत्यक्षात बघणे तर शक्य होईल न होईल, निदान त्यांना चित्रात, त्यांची माहिती शोधून, त्यांच्याबद्दल जाणून घेऊन तरी त्यांना भेटता येईल. बघूया कसे जमते ते. या लेखमालेच्या सुरवातीला विक्रम ग्रेवाल आपला अनुभव सांगतात. त्यांच्या सुमित सेन नावाच्या मित्राने अशा प्रकारचा एक सर्वे केला लोकांकडून जाणून घेण्यासाठी की त्यांना कुठचे पक्षी 'before you die' या category खाली बघायचे आहेत, तर लोकांनी दिलेल्या याद्या इतक्या भिन्न होत्या की त्यात एकमत होणे शक्यच नव्हते. बिक्रम ग्रेवालनी त्यांची यादी दिली आहे. माझी अशी यादी नाही, अनेक पक्षी मला बघावेसे वाटतात, पण 'before you die' या नावाखाली अजून तरी कोणीच नाही. 
बिक्रम ग्रेवाल  यांच्या यादीतील पक्षी मात्र विलक्षण आहेत. ज्या पक्ष्याने माझे एकदम लक्ष वेधून घेतले तो आहे 
उलमा. त्याच्यापासूनच सुरवात करत आहे. घुबड हा कुळातील पक्षी मला अतिशय आवडतात. गूढ, अगम्य, आणि सुंदर.. 

१. उलमा(Ulama) : Spot Bellied Eagle Owl (Bubo nipalensis):  हे एक मोठे शिकारी घुबड आहे. भारत आणि साऊथ ईस्ट एशिया (श्रीलंका, बोर्निओ) या ठिकाणी त्याचे वास्तव्य आहे. पण ते क्वचितच नजरेस पडते. पण त्याचा आवाज इतका भयावह आहे की श्रीलंकेतील लोकांनी त्याला सैतानपक्षी (Devil Bird) असे नाव दिले आहे. एखाद्या स्त्रीची किंवा लहान मुलाची भयंकर किंकाळी ऐकू यावी त्याप्रमाणे हे घुबड ओरडते, त्यामुळे जंगलाजवळ राहणारे लोक या आवाजाला फार घाबरत असत. या आवाजावरून शकुन-अपशकुनही पडले होते. खरोखरच काही पक्ष्यांबाबत असे सर्व का जोडले गेले आहे ते कळत नाही. पण शेवटी माणूस काय, पक्षी काय सर्व निर्सार्गाचा भाग, सर्व जोडलेले आहेत. कोण जाणे? या पक्ष्यांना अघटिताचे काही तीव्र ज्ञान कुठल्यातरी नैसर्गिक ऊर्जेने होतेही असेल, त्यामुळेच का त्यांना असा आवाज निसर्गाने दिला असेल. टिटवी हे आणखी एक असे उदाहरण. तर या उलमा घुबडाबद्दल एक आख्यायिका(Myth) श्रीलंकेत आहे. एका माणसाने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांच्याच लहान मुलाला मारून त्याचे जेवण बनवून (curry)  आपल्या पत्नीला खायला दिली. जेव्हा पत्नीला त्या अन्नात मुलाच्या बोटांचे तुकडे दिसले तेव्हा पत्नी सैरभैर होऊन जंगलात पळून गेली आणि तिने आत्महत्या केली. देवतांनी तिचे रूपांतर एक पक्ष्यात केले. हा पक्षी म्हणजेच उलमा घुबड. 
बिक्रम ग्रेवाल यांनीही या पक्ष्याच्या आवाजाबद्दल लिहिलं आहे  'Has a low deep, mournful hoot that carries for long distances and chilling the bones of those who hear it'
हा पक्षी दुर्मिळ नाही, मोठ्या संख्येने त्याचे वास्तव्य भारत आणि इतर आशियायी देशातील जंगलात त्याचे वास्तव्य आहे, पण तो नजरेस पडायला अतिशय कठीण आहे. घुबड कुळातील इतर पक्ष्यांप्रमाणेच तो निशाचर आहे आणि दिवसा दाट पानांत गुडूप होऊन तो बसलेला असतो. 

या पक्ष्याचे अतिशय अप्रतिम चित्र जोसेफ स्मित (Joseph Smit) या चित्रकाराने काढले आहे. ते विकिपीडिया वर उपलब्ध आहे. 
Spot Bellied Eagle Owl (Bubo nipalensis )  Courtesy:(Wikipedia N.A._Nazeer)






Wednesday, 7 March 2018

हे वाचायचे आहे कधीतरी

Cees Nooteboom या लेखकाचा परिसंवाद पाहत असताना, त्यानेच त्याचे एक पुस्तक सांगितले. Cees nooteboom आणि त्याची फोटोग्राफर पत्नी Simone Sassen यांनी एक प्रयोग केला होता , त्या दोघांनी जगभर फिरून कवी आणि लेखकांच्या थडग्यांना भेटी दिल्या. सामोआ samoa येथे रॉबर्ट लुइस स्टिव्हन्सन चे थडगे, ओसाका , जपानमध्ये कावाबाताचे थडगे. चिली मध्ये पाब्लो नेरुदाचे थडगे अशा अनेक थडग्यांना भेटी दिल्या. त्याच्या प्रकाशकाने ऐंशी पुरे ! असे म्हटले असे तो मजेने सांगतो. नाहीतर हे लोकं अशी थडगी बघतच राहिले असते. पुस्तकाचे नाव आहे : Cemetery Strolls with Writers - / Tumbas - Graves of poets and thinkers 

Nooteboom म्हणतो 'कब्रस्थानात तुम्ही बरंच काही शिकू शकता'

Nooteboom ला gravestones बघितल्यावर त्यातून काहीतरी अर्थ मिळवण्याची इच्छा होते. त्याला वाटते की हे gravestones त्या माणसांच्या मृत्यूबद्दल बरंच काही सांगू शकतात, त्यांना तो मृत्यू कसा आला असेल, मृत्यूला हे लोक कसे सामोरे गेले असतील याबद्दल ते सांगू शकतात. झुरिकच्या cemetery मध्ये  Nooteboom यांनी James Joyce आणि  Elias Canetti यांच्या gravestones ना भेट दिली होती. ते म्हणतात 'Joyce खुर्चीत आरामशीर, बसला आहे, एका पुतळ्यासारखा स्तब्ध, amiable and untroubled.'   Canetti यांच्या gravestone वर  Nooteboom ना Canetti ची frenetic signature दिसते. Nooteboom म्हणतात 'Canetti स्वतःच्या मरणाबद्दल अतिशय क्रुद्ध होते , आणि मला समजतं का ते , पण मला वाटते मृत्यूचा जो पर्याय : eternal life आहे त्यातही काही अर्थ आहे असं मला वाटत नाही. “We are simply a part of nature and in the end, in nature things die.”

हे पुस्तक वाचायला हवं. विशेषतः कावाबातासाठी.

दुसरं एक पुस्तक आहे ते माझ्याकडे आहे. मी ते रस्त्यावरील जुन्या पुस्तकांच्या दुकानात विकत घेतलं. त्याचं नाव आहे  'Story of the eye'. George Bataille या लेखकाचे हे पुस्तक आहे. हे पुस्तक मी का विकत घेतलं हे सांगणं अवघड आहे कारण या पुस्तकाबद्दल आणि या लेखकाबद्दल मला काहीच माहित नाही..
पण हे पुस्तक नक्की एकदिवस वाचून पूर्ण करणार आहे, तसं मी एकदा हे पुस्तक वाचण्याचा प्रयत्न केला होता, पण मला हे पुस्तक काय म्हणत आहे तेच कळेना, म्हणून मी ते ठेऊन दिलं. पण हे पुस्तक काहीतरी भयंकर दडवून आहे हे मात्र नक्की, त्यामुळे ते कधीतरी नक्कीच वाचायचं आहे. त्याच्या बद्दल एक वाचकाची प्रतिक्रिया मी युट्यूब वर पाहिली होती, तो अमेरिकन वाचक म्हणाला  'He is talking about a truth that's also a lie. His works are trying to analyze things which are inside the human condition which are impossible to analyze.  Its religious, humorous,erotic ,lucid, bizarre, surreal, terrifying . he was banished by surrealists. terrified Roland Barthe . His book is constantly and consistently challenging the idea of what it means to human ,  we are grossly limited by the self-imposed boundaries- by religious , society, beliefs . this book is not about erotic freedom. Human eroticism is ruinistic ..
Human eroticism :it is violent movement headed towards sun -- death--- death strenghens erotism and erotism strenghthsn death. he is not talking about the pleasures of death.' 
eroticism's trajectory : life :  and in its frenzy towards death.    Can a thing be joyful and terrifying at the same time?'
हे वरील सर्व त्या वाचकाचे म्हणणे आहे, माझे नाही, पण मला हे पुस्तक वाचायचे आहे.

I believe truth has only one face, that of a contradiction   - असं खुद्द George Batalie म्हणतो. त्याचं म्हणणं समजून घेतलं पाहिजे.  

Pierre Guyotat  या लेखकाचे वर्क्स पण वाचायचे आहेत.त्याच्याबद्दलही ऐकले आहे. कधी वाचणार कोण जाणे?

Italo Calvino - या लेखकाची मिळतील तेवढी पुस्तकं : तीही वाचायची आहेत.
त्याच्या  Invisible cities या पुस्तकात तो लिहितो : Traveling, you realize that the differences are lost. Each city takes to resembling all cities. Places exchange their form, order, distances, the shapeless dust-cloud invades the continent.
मला मनाने प्रवास करायला आवडतो. हव्या त्या प्रदेशात हवं तेव्हा जाता येतं.

Philosophy and Psychical Research हे जी. एंनी सांगितलेले पुस्तक. त्यांचे म्हणणे 'बऱ्याच दिवसात नवे आणि रेखीव असे काही देणारे असे पुस्तक मिळाले.' 'शिवेश ठाकूर' नावाच्या अमेरिकन विद्यापीठात फिलॉसॉफीचे अभ्यासक आणि मार्गदर्शक असलेल्या लेखकाचे हे पुस्तक.'

Micheal Ayrton या लेखकाने Michelangelo च्या Pieta या शिल्पाविषयी लेख लिहिला आहे तो वाचायचा आहे.त्याबद्दलही अतिशय उत्कृष्ट ओळख करून दिली आहे जी.ए. नी.

शेवटी एक असेही पुस्तक मला वाचायचे आहे जे कुणीही लिहिलेलेच नाही अजून. त्याची कथा बदलत राहील, मला हवी तशी. असे पुस्तक मिळेल का? ते पुस्तक बोलणारे असेल, ते मला वाचायचे आहे. या एका माणसाप्रमाणे: 'that person lives alone and talks to books like a person, he invites books and these books visit him from time to time. he argues with them and has a relationship with the book. how he has to talk to book as a person? what the book talks back, what personality the book has?'

हे सर्व..
वाचायचे आहे कधीतरी.

कंदील

कंदील कुठेतरी आहे
खोरणात पडून
तो शोधायचा आहे
गंजलेल्या कडीकुलुपाचे करकरणारे दार उघडून

दार जुने झाले, उंबरा जुना झाला,
वासेही आता कोरम झालेत
घरासमोरचे झाडही दमले आहे उभे राहून
वर्षांनुवर्षे झाली आहेत
पुराणपुरुष पुरून

वाटचाल खूप झाली
परत आलो आहे इथे फिरून
आणि अवाक आहे मी
माझी वाट बघत उभं आहे अजून
हे घरही स्वतः उरून

दार उघडताच आत येईल
तिरीप प्रकाशाची
भिंती सावरून बसतील
विसरून भीती अंधाराची

खुंट्या क्षणभर सजीव होतील
लटकवून घेण्यासाठी
जमीनही शहारेल
ओळखीच्या वाटणाऱ्या स्पर्शाने

पण आत येताच प्रश्नचिन्ह दिसले
अरे हे घर आपलेच का? आपलेच, का ?
कोंडलेल्या हवेने मग गुदमरायला झाले
देवखोलीत मग थरथरत हात जोडले

देवाचे गाऱ्हाणे कानात घुमले
घराची डागडुजी आहे
छप्पर परतायचे आहे
साफसफाई आहे
जुने टाकून नवे आणायचे आहे

वर्षानुवर्षे कुणी आलं नाही इथे
मीच एक परतलो आहे
कंदील मात्र शोधायचा आहे
कारण त्याच्या सोबतीनेच
आता रात्र घालवायची आहे

 
७-मार्च-२०१८

Tuesday, 6 March 2018

पॉण्ड हेरॉनची तपश्चर्या

बोरिवली नॅशनल पार्कमधील छोट्याश्या नदीप्रवाहाशेजारी चित्र काढत बसले होते. सकाळचे आठ-सव्वा आठ वाजले असतील. समोरची गर्द झाडं, त्यांचं पाण्यातलं प्रतिबिंब आणि त्याने हिरवंगार झालेलं पाणी. झाडांच्या गच्च गर्दीमुळे सूर्यप्रकाशही छाया आणि प्रकाशाच्या पाठशिवणीच्या खेळासारखा. पाण्यात काही दगड होते. आणि त्या दगडांच्या मधोमध एक पॉण्ड हेरॉन पक्षी ध्यानस्थ चर्या करून उभा होता. दगडांचा रंग आणि त्याचा रंग किती एकसारखा. पॉण्ड हेरॉन म्हणजे इंडियन पॉण्ड हेरॉन, बगळयांच्या कुळातील एक छोटा पक्षी. मराठीत त्याला 'ढोकरी' असे म्हणतात. तो उडताना त्याचे फैलावले पंख शुभ्र पांढरे दिसले तरी बसल्यावर जेव्हा तो पंख मिटून घेतो तेव्हा त्याचा रंग फिकट बदामी,मातकट दिसायला लागतो. हे त्याचे वैशिष्ट्य. उडताना दिसणारा आणि बसलेला यात खुपच फरक असतो. बहुदा उडत नसताना आणि उभं राहून शिकार करीत असताना दिसणारं त्याचं हे रूप त्याला camouflage साठी कमी येत असावं. त्याच्या या मातकट रंगाच्या पेहराव्यामूळे तो दगडांत एक्दम एकरूप होऊन जातो. इतका एकरूप की दुरून बघताना आपण नजर बाजूला केली तर परत दगडात हुडकायला खूप वेळ लागेल. या पक्षाकडे किती एकाग्रता असू शकते याचाही मला त्याला पाहताना अंदाज आला. मी त्याला साधारण सव्वा -आठ दरम्यान पहिल्यांदा पाहिलं. पहिली पाच  मिनिटे तो ताठ उभा होता. मग मग हळूहळू एक पाय अत्यंत सावकाशपणे दुमडून, दहा मिनिटे त्या एकाच स्थतीमध्ये स्थिर राहिला. हे  ८.२० पासून ते ८.४० पर्यंत. त्यानंतर कितीतरी वेळ निघून गेला तरी त्याची अजिबात कसलीच हालचाल झाली नाही. नजर बाजूला गेली तर तो दिसणारच नाही म्हणून मी एकटक त्याच्याकडेच बघण्याचा प्रयत्न करत होते. आजूबाजूच्या पाण्यात मासे बेडक्या, टुपुक-टुपुक हालचाल करत होत्या. त्यांचे तरंग पाण्यावर उठत होते.पण याची काही हालचाल नव्हती. धूर्त, ढोंगी साधूसारखी खडकावर त्याची तपश्चर्या चालली होती. 

त्याच्या जवळूनच एक फूट पेक्षा कमी लांबीचा साप पाण्यात डोके वर काढून संथपणे चालला होता. तो पार या टोकापासून त्या टोकापर्यंत नजरेआड झाला तरी हा आपला तिथेच होता. थोड्या वेळाने त्याची मान फक्त उंचावली थोडीशी. प्रवाहाच्या दुसऱ्या बाजूच्या एक झाडाच्या डहाळीवर एक खंड्या बसून अंग फडफडवत होता. आणि एकदम अचानक क्षणात झपकन पाण्यावर आला आणि काहीतरी पकडून घेऊनही गेला. पण हा आपला तसाच बसून. थोडीशी मान हलवून, पण पाय स्थिर.

माझे  कुतूहल आणखीनच वाढले. आता याला शिकार मिळेल का? पाणथळीच्या जागी आढळणाऱ्या प्रत्येक पक्ष्यांचे  शिकार पकडण्याचे तंत्र वेगवेगळे आहे. जसं छोटा पाणकावळा(little cormorant) पाण्यात बुडी मारून भक्ष्य शोधतो. ग्रे हेरॉन(राखी बगळा) संधीकाली, सूर्य मावळतीला गेला की शिकार करतो. तशी या पॉण्ड  हेरॉनची स्वतःची नेमकी पद्धत असली पाहिजे. त्यातूनही त्याच्या या पद्धतीतील जी एकाग्रता आणि एका जागी इतका वेळ निश्चल उभं राहायची चिकाटी आहे त्याची दाद दिली पाहिजे. खंड्या(किंगफिशर) तर तेवढ्या वेळात सूर मारून आपलं भक्ष्य घेऊनही गेला. इतक्या वेगवान पद्धतीने त्याने पाण्यावर झडप घातली की ते भक्ष्य जे काही होतं  ते क्षणभर थिजूनच गेलं  असावं. तसं या पॉण्ड हेरॉनचं नाही. इतका वेळ पाण्यात खोल बघून कसलं संशोधन करत होता कोण जाणे. शेवटी तब्बल वीस मिनिटांनी त्याने आपला पावित्रा बदलला आणि अचानक पंख उंचावून वर उडाला आणि दुसरीकडे निघून गेला. बहुदा ही जागा त्याला पसंत पडली नसावी. बराच वेळ झाला असल्याने मीही आपले बस्तान बांधले आणि निघाले.

हेरॉन वरची Theodore Roethke या कवीची ही कविता किती समर्पक आहे.


The Heron

The heron stands in water where the swamp
Has deepened to the blackness of a pool,
Or balances with one leg on a hump
Of marsh grass heaped above a musk-rat hole.

He walks the shallow with an antic grace.
The great feet break the ridges of the sand,
The long eye notes the minnow's hiding place.
His beak is quicker than a human hand.

Her jerks a frog across his bony lip,
Then points his heavy bill above the wood.
The wide wings flap but once to life him up.
A single ripple starts from where he stood.