टारझन हिलच्या तळ्याच्या बाजूने तळ्याजवळच्या झुडुपात ही वनस्पती ऑगस्ट मध्ये सापडली होती. हिचे नाव आहे 'गोलगोंडा'. इंग्रजीत 'Pin Cushion Plant' म्हणतात.शास्त्रीय नाव आहे 'Neuracanthus sphaerostachyus' ही Acanthaceae (Acanthus family) कुळातील वनस्पती आहे. sphaerostachyus हे नाव तिच्या फुलाच्या वर्तुळाकृती (स्पाइरल) रचनेमूळे तिला मिळाले आहे.
या वनस्पतीचे औषधी गुणधर्म बघितले पाहिजेत कारण फ्लॉवरऑफइंडिया या संकेतस्थळावर या वनस्पतीपासून प्राण्यांसाठी(बहुदा गुरांसाठी असावं) काढा करण्यात येतो असे नोंदवलेले आहे.
टारझन हिलच्या तळ्याजवळील गोलगोंडा ऑगस्ट २०१७ |
संजय गांधी नॅशनल पार्क , शिलोंडा येथील गोलगोंडा( ऑक्टोबर २०१६) |
No comments:
Post a Comment