Monday 11 September 2017

गुलाबदाणी (Aeginetia indica)


माहुली किल्ल्याच्या चढणीवर काही ठिकाणी झुडपाखालच्या अंधाऱ्या जागेत ही वनस्पती लपून बसली होती. तिचे नाव 'गुलाबदाणी'. हिंदीत तिला 'आँकुरी बाँकुरी' असे मजेशीर नाव आहे. शास्त्रीय नाव Aeginetia indica आहे. हे एक parasitic gregarious herb आहे. बांबूच्या बेटांत किंवा मोठ्या झाडांच्या खाली असलेल्या झुडपात ओलसर जागी ही वनस्पती उगवते. ती परजीवी असून  झाडांच्या पडलेल्या पानांपासून, पाचोळ्यातून, आजूबाजूच्या छोट्या गवताच्या मूळातून ती आपले अन्न शोधते. मुख्यत्वे भारत, बांगलादेश, श्रीलंका अशा देशांत ती आढळते, पण इतर आशिया खंडातील देशांतही ही वनस्पती सापडते. ही वनस्पती Orobanchaceae या कुळातील आहे.
फ्लोरा ऑफ चायना या संकेतस्थळावर तिच्या औषधी गुणधर्मांविषयी लिहिले आहे, 'या वनस्पतीची मूळे आणि फुले उष्णता आणि हानिकारक द्रव्ये (toxins) नष्ट करण्यासाठी मदत करतात.'


या वनस्पतीच्या एका दुर्मिळ जातीबद्दल फादर संतापाऊ यांनी आपल्या 'फ्लोरा ऑफ खंडाला' या ग्रंथात लिहिले आहे, ती वनस्पती Aeginetia indica alba या नावाने ओळखली जाते. तिची फुले पांढरी असतात. 
 आणखी एक गुलाबदाणीसारखीच दिसणारी वनस्पती आहे , परंतु ती पूर्णपणे वेगळ्या कुळातील आहे तिचे नाव Monotropa uniflora आहे. ती पूर्णपणे पांढरी असते.

पावसाळ्याच्या अखेरीस सप्टेंबरमध्ये ही वनस्पती उगवते. semi evergreen जंगलात आणि मुख्यत्वे  पानगळीच्या जंगलात आणि ती जास्त आढळते.
'गुलाबदाणी' च्या विविध भागांचे सुंदर रेखांकन फ्लोरा ऑफ चायना या संकेतस्थळावर आहे. या वनस्पतीचे परागीभवन (pollination) कसे होत असेल?, ही फुले नक्की दिवसाच्या कुठच्या प्रहराला फुलतात. बहुदा पहाटे किंवा त्याआधीही फुलत असावीत, कारण सकाळी ११च्या दरम्याने जेव्हा मी तिची फुलं बघितली तेव्हा ती अर्धवट मिटलेल्या अवस्थेत होती. फुले tubular आकाराची असतात, काही ठिकाणी फुलाच्या आतील सुंदर रचनेचे फोटो दिलेले आहेत ते फार सुंदर आहे. मी मात्र फुल अर्धवट मिटलेल्या अवस्थेत बघितले होते. 
या वनस्पती दोन, चार एकत्र उगवतात. जर फार मोठ्या जागेत अनुकूल अंधार असेल तर त्याहीपेक्षा जास्त संख्येने त्या एका जागी उगवू शकतात. 

courtesy:flora of china website



 

No comments:

Post a Comment