संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये सप्टेंबरच्या सुरवातीला ही वनस्पती दिसली. तिचे फुल गोकर्णाच्या फुलासारखे होते, त्यामुळे ती गोकर्णाच्या प्रजातीतील असावी असे वाटले. तो अंदाज बरोबर होता. ही Fabaceae (Pea family) कुळातील आणि Clitoria प्रजातीतील वनस्पती आहे. तिचे मराठी नाव आहे 'सुपली'. ही वनस्पती मुंबई आणि आजूबाजूच्या भागातच (प्रदेशनिष्ठ/Endemic) सापडते. शास्त्रीय नाव आहे 'Clitoria annua'(Clitoria annua J.Graham) तिचे आणखी एक शास्त्रीय नाव प्रचलित होते (Clitoria biflora), पानांच्या देठांच्या बगलेत फुले जोडीने येतात म्हणून biflora असे नाव पडले.
इंग्रजीमध्ये 'Bombay Bean' म्हणतात. ऑगस्ट ते ऑक्टोबर असा या वनस्पतीच्या फुलण्याचा मौसम आहे.
सुपलीचे फुल |
सुपलीचे झाड आणि पाने |
No comments:
Post a Comment