Monday, 29 January 2018

निरर्थकायन

कधीकधी काहीच वाचावेसे वाटत नाही. नुसते बसून राहावे असे वाटते. पण तसे बसून राहता येते का?
आज सकाळी welty चे पुस्तक वाचण्याचा प्रयत्न केला, एक पान वाचून झाले नसेल तर पुढच्या पानाच्या वरचे  शब्दच दिसेनात. मग ant , ghosts ऍण्ड whispering ट्रीज  पुस्तक घेतले. ते तर वाचावेसेच वाटेना. काहीच डोक्यात शिरेना. पूर्णपणे आकलनशक्ती भ्रष्ट झाल्यासारखेच हे आहे. अमिताव घोष चे इमाम अँड द इंडियन ही वाचवेना.
बाकी काय?

हा एकटेपणा म्हणजे मजाच आहे नुसती.

खरंच किती वैताग आहे का हा एकटेपणा, स्वतःचा चहा स्वतःच बनवून घ्यायचा, स्वतःच बसून प्यायचा, मग स्वतःच कप धुवून ठेवायचा,

कधी कधी एखादे दुर्मिळ, अतिशय मेहनतीने लिहिलेले, ज्ञानपिपासू  बनलेले एखादे पुस्तक कळताच मी ते इंटरनेटवर हुडकते, जर pdf मिळाले तर ठीक नाहीतर विकतची प्रत घ्यायचीही माझी तयारी असते. ते पुस्तक विक्रीसाठी available असले तर मला कोण आनंद होतो, पण क्षणातच मला स्वतःची करूणा वाटते, स्वतःच्या naivety बद्दल अपरंपार दुःख होते, हे पुस्तक pdf म्हणून कुठल्यातरी फोल्डर मध्ये टाकून, किंवा विकत घेऊन शेल्फ मध्ये विराजमान करून अर्धी लढाई जिंकल्याचे समाधान मला वाटते ते इतके शूद्र असते की मला माझीच कीव करावीशी वाटते. त्याचवेळी स्वतःच्याच भाबडेपणाबद्दल स्वतःचा स्वतःच मुका घेऊन आंजारावे-गोंजारावे असे वाटते. म्हणावेसे वाटते बाळ अजून खूप लहान आहेस तू !

बाहेर  बघते तर लख्ख सगळीकडे! मघाशी जे मळभ होते ते जाऊन आता सगळी हिरवी झाडं नुसती चकाकताहेत. तेव्हा वाटलं,
जी एंच्या भाषेत सांगायचं झालं तर एक रत्न सापडण्यासाठी हजारो मैल वैराण प्रदेश तुडवत जाण्याची तयारी हवी. जी. एंच्या कथा तर  रत्न मिळण्याचीही हमी देत नाहीत. इस्किलार मध्ये हेच दिसते की रत्नापेक्षा प्रवासात दिसलेले भेटलेले रंगीत साप, गारुडी, तेच काय ते खरे होते. रत्न सापडण्याची खात्री तिथे !

त्या डोंगराच्या टोकावर चालू पडावे. आता बस चालावे, चालत राहावे.

डोक्यातील विचार म्हणजे सगळ्याचे कडबोळे!
कडबोळेच आहे हे! पण कधी कधी चहाबरोबर कडबोळे सुद्धा चांगले लागते ना! खरं आहे!

paul brunton चे पुस्तक खिडकीकडे उभं राहून दोन मिनिटे harmony अनुभवली.

त्या बाथरूम मध्ये इतके सुरक्षित वाटले. जी. एंच्या पत्रांतील वाक्यांतून मला कोणता आधार मिळतो? 
स्पेस विषयीचे बोलणे !
मग पैस वाचले.. खरच ते पुस्तक म्हणजे एखादे तरल संगीत आहे. मला नाही वाटत या उंचीचे दुसरे  पुस्तक मराठीत असेल. अगदी कावाबाताच्या काव्यासारखे सूक्ष्म आणि संक्षिप्त शब्द यात आहे. प्रतिभेची परिसीमा!

एकाच  दिवशी तीन चित्रे दिसली
रेस्टॉरंट
रस्त्यावर ठेवलेले कामगाराचे प्रेत
रस्त्यावर पडून रडणारी रस्त्याकडेच संसार थाटलेली बाई, जवळ   पोर  आणि  भांडायला जुंपलेली

हा डोळ्याला काय ताप आहे म्हणायचा ... ?

No comments:

Post a Comment