Monday 29 January 2018

निरर्थकायन

कधीकधी काहीच वाचावेसे वाटत नाही. नुसते बसून राहावे असे वाटते. पण तसे बसून राहता येते का?
आज सकाळी welty चे पुस्तक वाचण्याचा प्रयत्न केला, एक पान वाचून झाले नसेल तर पुढच्या पानाच्या वरचे  शब्दच दिसेनात. मग ant , ghosts ऍण्ड whispering ट्रीज  पुस्तक घेतले. ते तर वाचावेसेच वाटेना. काहीच डोक्यात शिरेना. पूर्णपणे आकलनशक्ती भ्रष्ट झाल्यासारखेच हे आहे. अमिताव घोष चे इमाम अँड द इंडियन ही वाचवेना.
बाकी काय?

हा एकटेपणा म्हणजे मजाच आहे नुसती.

खरंच किती वैताग आहे का हा एकटेपणा, स्वतःचा चहा स्वतःच बनवून घ्यायचा, स्वतःच बसून प्यायचा, मग स्वतःच कप धुवून ठेवायचा,

कधी कधी एखादे दुर्मिळ, अतिशय मेहनतीने लिहिलेले, ज्ञानपिपासू  बनलेले एखादे पुस्तक कळताच मी ते इंटरनेटवर हुडकते, जर pdf मिळाले तर ठीक नाहीतर विकतची प्रत घ्यायचीही माझी तयारी असते. ते पुस्तक विक्रीसाठी available असले तर मला कोण आनंद होतो, पण क्षणातच मला स्वतःची करूणा वाटते, स्वतःच्या naivety बद्दल अपरंपार दुःख होते, हे पुस्तक pdf म्हणून कुठल्यातरी फोल्डर मध्ये टाकून, किंवा विकत घेऊन शेल्फ मध्ये विराजमान करून अर्धी लढाई जिंकल्याचे समाधान मला वाटते ते इतके शूद्र असते की मला माझीच कीव करावीशी वाटते. त्याचवेळी स्वतःच्याच भाबडेपणाबद्दल स्वतःचा स्वतःच मुका घेऊन आंजारावे-गोंजारावे असे वाटते. म्हणावेसे वाटते बाळ अजून खूप लहान आहेस तू !

बाहेर  बघते तर लख्ख सगळीकडे! मघाशी जे मळभ होते ते जाऊन आता सगळी हिरवी झाडं नुसती चकाकताहेत. तेव्हा वाटलं,
जी एंच्या भाषेत सांगायचं झालं तर एक रत्न सापडण्यासाठी हजारो मैल वैराण प्रदेश तुडवत जाण्याची तयारी हवी. जी. एंच्या कथा तर  रत्न मिळण्याचीही हमी देत नाहीत. इस्किलार मध्ये हेच दिसते की रत्नापेक्षा प्रवासात दिसलेले भेटलेले रंगीत साप, गारुडी, तेच काय ते खरे होते. रत्न सापडण्याची खात्री तिथे !

त्या डोंगराच्या टोकावर चालू पडावे. आता बस चालावे, चालत राहावे.

डोक्यातील विचार म्हणजे सगळ्याचे कडबोळे!
कडबोळेच आहे हे! पण कधी कधी चहाबरोबर कडबोळे सुद्धा चांगले लागते ना! खरं आहे!

paul brunton चे पुस्तक खिडकीकडे उभं राहून दोन मिनिटे harmony अनुभवली.

त्या बाथरूम मध्ये इतके सुरक्षित वाटले. जी. एंच्या पत्रांतील वाक्यांतून मला कोणता आधार मिळतो? 
स्पेस विषयीचे बोलणे !
मग पैस वाचले.. खरच ते पुस्तक म्हणजे एखादे तरल संगीत आहे. मला नाही वाटत या उंचीचे दुसरे  पुस्तक मराठीत असेल. अगदी कावाबाताच्या काव्यासारखे सूक्ष्म आणि संक्षिप्त शब्द यात आहे. प्रतिभेची परिसीमा!

एकाच  दिवशी तीन चित्रे दिसली
रेस्टॉरंट
रस्त्यावर ठेवलेले कामगाराचे प्रेत
रस्त्यावर पडून रडणारी रस्त्याकडेच संसार थाटलेली बाई, जवळ   पोर  आणि  भांडायला जुंपलेली

हा डोळ्याला काय ताप आहे म्हणायचा ... ?

Saturday 27 January 2018

Age of Reason


When there's a conversation, are the words, the mediators which convey real meaning. There are some undercurrents happening which are invisible which fill your mind. In a conversation when these do not happen the conversation however full of words remains hollow. Empty space in your mind is never filled and you are not satiated of the words.
Have you ever conversed in such a manner? That you did not care for what words were spoken but you could get the underlying meaning? The trails of some undercurrents were flowing between two minds which allowed you to connect to the person and you got the person,you got what he or she means but not necessarily you got the meaning of the words that were actually spoken? 

I am recently reading 'Age of Reason' in which the relation between two individuals is torn because of one event. 'Accidental Pregnancy'. They both want to get rid of it. Man and woman ask each other whether each wanted the child. The answer is 'No'. The answer from woman indicates 'no' but still the Man is not able to decipher this 'no'. This 'no' is combination of so many feelings that the man will never understand it fully, he will never be able to fully understand the thin undercurrents of real truth behind this 'NO'. He believes for time-being in that uttered word 'No' , but he knows its not 'No'. Its something else, and that something else also, he is not able to find. Although he becomes sure of one thing: that the relationship between them will not be the same anymore and whether both individuals will continue in the relation with the same commitment, interest. The Man is sure that the woman will hate him forever.

हे जे काही मी वाचलं त्यात इतके बारकावे आहेत की त्यांना समजणं त्या दोन व्यक्तींएवढंच कठीण आहे. नाते हे असे का असते? आणि असे नाते जे आपण स्वतः जोडले असेल तर ते तर महाकठीण काम. कशासाठी आपण असे नाते जोडतो? There are some age old myths about creating a relation. Myths and Fallacies, about security, affection, sense of fulfillment. Most of the time, we do not understand these individual terms ourselves. But we still want to create new relations in life in hope of giving and receiving these highly incomprehensible things.

Here's 'The relation-affected woman's monologue' which is not present in the book and its imagined..  
This is what goes on in the person's mind in the relationship.

I called up and said, 'I wanted to say few things' You have always said why don't you talk in a good plain tone when your brain is not bursting and you are calm about what exactly you feel and think' so here I am talking about it when I just impulsively felt, this is the right time to talk. But at the same time at the back of my mind, there is a small voice telling to myself 'you(to my own self) self-centered, selfish moron, you just did the wrong thing again, calling him in the middle of his important work hours' But for time-being, I am ignoring this little voice and continuing.

Well I feel suffocated by some unseen and explainable pressures. Is this pressure a burden? I am not able to fully understand it myself. But I feel the pressure because of my presence in the relation. Because I am 'there' present in the relation , there are certain things getting affected in the next person's life. The next person is obviously you because I live with you. I don't deny the sense of comfort of living with someone, sure at times there is sense of comfort to be next to someone and to see somebody returning home and you are no more alone but I do feel that this returning home is caused by my presence. If I was not present the person would not have been obliged to come home feeling stressed with every added minute passed in the traffic jams, and feeling 'Oh I should be home quick and early because she is not well or she is not in a good mood or she might feel good if I show up! Would you be stressed or feel the need to come home if I was not present?.
You just make yourself think that you want to come home because you yourself want to do that, you 'want' to come home early but you make believe yourself about it. The real reason of your 'wanting' to come home is 'my presence'. This is so subtle that you almost believe it is your wish to come home whereas actually it is me who is making you do that.

So I feel pressurized that my presence is making changes to your life. Since the time I came in your life lot of things changed for you as well as me. Some changes were not good. I am brutally honest about some things which I don't like and they belong to you, they came in my life for no other better reason but only because of you. Why I have to deal with those things which I don't like simply because of your presence in my life?  This pressure of trying to deal with things which I do not like become unbearable sometimes. The guilt of not being able to fit in. The guilt of bursting and blasting out about things I detest which harm the thin layer of serenity of this relation-bond between me and you. It is damaged long back. The burden of being with self is another thing but it the burden of being with someone is mixed with the burden of being with self, then its a disaster. When that pressure builds and slowly you start drowning, you just want to escape. The walls around you start closing in. And you feel everyone who are around you physically, virtually because of your presence are bringing this big pressing machine and you are about to be pressed inside the two huge flat surfaces of it. All these unseen, non-present people including you from whom I want to escape are just making me totally flat inside this machine. I just feel this house, these four walls are slowly coming towards me and there's just a space left so narrow that I can hardly breath it it. So at such times I do not want your presence. I feel I should escape, then you, your stuff, all that you have brought in my life will vanish and I will get the breathing space back.
That's why I want to build a house somewhere where I won't have any access to anyone. I will have access to anyone or anything whom I want to invite in my life. I am totally unsure whether such house can be built.

The pressure of living with someone while you are trying to live with your self is unfathomable. There are so many threads in it and it has such a complex weaving that you can never fully separate out the threads and look for there textures, colours and whether individually they strangle you or not.
If you had no problems living with your own self would you live better with someone else?
If you had no problem living with someone else would you live with your own self?
The guilt of living with one self. The guilt of living with someone else. The guilt that the other person is obliged to do certain things, is obliged to accept you at times for your wrongdoings, is obliged to ignore your shortcomings, is obliged to still try to make you happy(which never succeeds)

In anger , You have said 'I will live happily if you are not there in my life.' I am sure you will be more content to live with a furry soft toy than a real person. You have financial stability, you have security from the society that nobody will harm you on streets, in your private place. You have a freedom to choose what to eat, what to wear, You can also have a company of good friends at times. Then why choose a person to live with. What added to your life because of it. Constant thought have told me so far that my presence has added not much. There's nothing I am specifically doing, adding, to your life that makes your life better than it was before. Leave apart the good feeling of being with someone on a rainy day when you want to share a cup of tea with someone and that someone can be readily available if you have a partner in life.
A sure person who will accompany you, is bound to accompany you. And a sure person who is bound to call you in your busy hours and you have to pick up the phone and answer even if you are in the middle of some important work because you have given the right to that person, rather that person claims the right invisibly.  There are so many unsaid, invisible rules, invisible obligations, invisible burdens that come in your existence because of that other person?

The thin lines of personal freedom that should never be crossed are crossed. Then who's to blame?
 Anyways, I called you because I remembered you told me 'Why don't you talk when your are calm and in good mood about things you feel and why you always blast them out when you are angry and upset' and the expression is always I want to leave. Well I want to leave to. I feel like fleeing somewhere. Go absconding. Be anonymous. Who does not have that wish? 

Thursday 25 January 2018

रूम फॉर अननोन

बिनभरवशाचा माणूस
चार भिंतीतलं स्वातंत्र्य अनुभवून
एकदा मोठमोठयाने हाका मारू लागला
फ्रीडम, फ्रीडम, तू इथे आहेस का ?

तू कोण आहेस ?
आहेस तरी का ?
आणि असलास कुठे तर
आत्ता इथे येशील का ?

कुणीच उत्तर दिलं नाही
काही सूक्ष्म, अदृश्य कण
हलले असतील इतकंच 
तरीही तो वेड्यासारखा-नाही! वेड्याप्रमाणेच
बोलू लागला

फ्रिडम, फ्रिडम ! मला काही विचारायचं आहे
काही सांगायचं आहे
मी इथे आहे, या भिंतीच्या आत
खरंच मी स्वतंत्र आहे का?


ठासून भरलेलं मन मोकळं करायला
शोधून सुद्धा कोणी सापडत नाही
पाय आहेत मला पण

हि जमीन मात्र त्यांची नाही

या भिंतीआड बसून मी काय करू?
उद्योग? का करू?
नाही केलं काही तर चालणार नाही?
काहीच नसण्याचं स्वातंत्र्य मला का नाही ?

वेळच वेळ आहे माझ्याकडे
तो कुणाचा आहे ? तो जात का नाही एकदाचा?
माझा आहे तर मला तो का नाही संपवता येत
संपवून पुन्हा का नाही मिळवता येत

इथे गप्प बसून कसा राहू
मला तोंड आहे
कान आहेत, धडधड करणारे यंत्र आहे
ते सर्व मला का बंद करता येत नाहीत?

या चार भिंतीत कुणी बघत नाही म्हणून
मी आपणच उद्योग केले
धागे जोडले कोळ्यासारखे
म्हणून मी एक कोळी आहे असं कसं मानू


या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत जाळी विणली
पण शेवटी जाणवून की त्या निर्जीव भिंतीच फक्त

तोडायला गेलो,गुरफटलो
आणि आता जाळ्यात भक्ष्य मीच बनलो आहे

मी स्वतःला भक्ष्यही का मानू
मग या चार भिंतींचा रखवालदार
मानू का स्वतःला?
मी असं मानायला पाहिजेच कशाला?

एकदा भिंती तोडायला गेलो
झिजून, झिजून फक्त एक ओरखडा आणू  शकलो
मग जेवढा उरलो तेवढा आता मागे सरलो
थकलो , आणि बसलो

आता कुणी पाहिजे बोलायला
माझ्याबरोबर चालायला
म्हणून तुला विचारत आहे
तू आहेस का? आणि असलास कुठे तर येशील का?

-जानेवारी २०१८

Saturday 20 January 2018

सटरफटर कुतूहल

बॉब डिलनचं नोबेल लेक्चर आताच ऐकलं.  त्याच्या गाण्यांवर आणि एकंदरीत जीवनावर प्रभाव पडणाऱ्या तीन पुस्तकांबाबत तो बोलला आहे. त्याने या पुस्तकांबाबत जे सांगितलं ते त्याच्याच शब्दांत ऐकण्यासारखं आहे. ही तीन पुस्तकं आहेत.
१. Moby Dick  वेड्या माणसाने लिहिलेलं वेड्या शार्क पासून ते त्याला मारण्याची शर्थ करणाऱ्या , परिणामी स्वतःच्या नाशाची पर्वा न करणाऱ्या वेड्या अहाब पासून ते तेल, बोटी, मासेमारी यांची अचाट अकारणास्तव वाटणारी माहिती अतिशय उपयोगी ज्याला वाटेल अशा वाचकासाठीच फक्त लिहिलेलं असं हे पुस्तक. बॉब डिलन च्या लिस्ट मध्ये ते आलं यातूनच काय ते समजायचं.
२. All quite on western front : शेवटी तो म्हणतो हे पुस्तक मी बंद केलं आणि स्वतःशी म्हटलं आता या पुढे कधीही युद्धसाहित्य वाचणार नाही आणि त्याने पुन्हा कधीही वाचलं नाही.
३. Odyssey
अर्थ कशाला हवा? मी माझी गाणी लिहितो पण त्यांचा नक्की अर्थ काय ते मला माहित नाही. मला चांगलं वाटतं ते मी लिहितो. अर्थाचा मी विचार करत नाही. एका शेक्सपीयरच्या काळातील प्रिस्ट कवीच्या दोन ओळी त्याने  सांगितल्या. त्या अशा आहेत. 

तो म्हणतो आता या ओळींचा काय अर्थ आहे? काय माहित? पण हे वाचायला चांगले वाटते. 

खूपच चांगलं आहे त्याचं हे लेक्चर पुन्हा पुन्हा ऐकावंस वाटेल असं. 

नाउम चॉम्स्की याना  विचारलं की तुम्ही लिंग्विस्ट(भाषातज्ञ) आहात तरीही इतर अनेक गोष्टींचं सखोल ज्ञान तुम्हाला कसं आहे. त्यावर ते म्हणाले जे जाणणे  अत्यावश्यक आहे आणि सिग्निफिकन्ट आहे ते  जाणून घेण्याची इच्छा मला होतेच, ही इच्छा एखाद्या चार वर्षाच्या मुलाच्या कुतूहलतेपेक्षा वेगळी नाही.




  

Monday 8 January 2018

वेटिंग रूम

आपण सगळेच एका 'वेटिंग रूम' मध्ये बसलो आहोत
कशाची तरी वाट बघत
वेटिंग रूम मध्ये जागा नसली तरी
माणसं दार उघडून आत येतच आहेत
कधी कुणी वेटिंग रूम सोडूनही जातात
पण गर्दीत आपल्याला त्यांना भेटता सुद्धा येत नाही
अनोळखी बनून ती नजरेआड होतात

'वेटिंग रूम'  मध्ये एकदा आलं की
तिथले कायदे पाळावेच लागतात
सगळ्यात महत्वाचा कायदा
'वेटिंग' चा, वाट बघण्याचा

तो बिनदिक्कत पाळावाच लागतो
जो या कायद्याला विरोध दर्शवतो
त्याला 'वेटिंग रूम' त्रासदायक होते

पण एकदा दार उघडून आत आलं
की बाहेर जाण्याची मुभा नाही
फक्त एकच मुभा आहे
'वेट' करण्याची , वाट बघण्याची

-जानेवारी २०१८ 



शेवटचे दोन जिवंत क्षण

हे आहेत
आत्महत्त्या करणाऱ्याच्या आयुष्यातील
शेवटचे दोन जिवंत क्षण 

ते दोन क्षणच बोलले शेवटी
त्या आत्महत्त्या करणाऱ्या माणसाशी
आम्हीच आहोत आता
फक्त दोनच उरलो आहोत
बोलायला तुझ्याशी

एक क्षण म्हणाला  : 'जमिनीला 'टच' व्हायला '
दुसरा क्षण मधेच बोलला 'जमिनीला 'टच' व्हायला
की जमिनीचा 'टच' सुटायला ?'
'गप्प बस' पाहिल्याने दुसऱ्याला दटावले
आपण आता दोनच उरलोय
मला बोलू दे  या माणसाशी 

तर हे बघ आत्महत्त्या करणाऱ्या माणसा
जमिनीला 'टच' व्हायला
फक्त दोन क्षणांचा अवधी आहे
वर आकाशात कुठेही खुंटी नाही
जिला आता तू धरू शकतोस

आणि तरंगूही शकत नाहीस
फार काळ या स्थितीत
या 'हँगिंग स्टेट' मध्ये गोठून गेला आहे
तुझा निर्णय

आता काय करणार?
थोड्याच वेळात सर्व संपणार
चूक झाली का ?
आणि जर झाली चूक
तरी काय करणार?

त्या चुकीचे
प्रायश्चित्त घ्यायला
तू तर नसणार
ही एकच गोष्ट अशी
जिला माफी आणि
प्रायश्चित्त नाही उरणार 

 - जानेवारी २०१८

वाईट

 दूरवर पसरलेला अंधार बघून
 मी मनात म्हटले

अंधारात मिसळून अंधार व्हावे
म्हणजे कोणी दृष्टीस पडणार नाही
आणि आपण कुणाच्या दृष्टीस पडणार नाही
नाहीतरी मी वाईटच आहे

ते अंधाराने ऐकले
अंधाराला कान असतात हे तेव्हा कळले
अंधार म्हणाला
असं कसं म्हणतेस ?
दृष्टी हवीच
मी दृष्टिहीन, मला दिसत नाही
मला  हवी आहे दृष्टी
मी येतो
तेव्हा सगळेच नाहीसे होतात
इतका का मी वाईट आहे ?

-जानेवारी २०१८