'अनबिअरेबल लाईटनेस ऑफ बीइंग' हे पुस्तक मी दोन दिवसात वाचलं. कारण ते लायब्ररीचं होतं आणि एक नेहमी 'इन सर्क्यूलेशन' असणारे पुस्तक 'अव्हेलेबल' झाल्याने मी हावरेपणाने चटकन त्या पुस्तकाची रिक्वेस्ट टाकली.
त्यामुळे दोन दिवसात मला युद्धपातळीवर हे पुस्तक वाचावं लागलं. खरं तर जर दोन दिवसांची डेडलाईन ठेवली नसती तर हे पुस्तक पूर्ण करणं जवळजवळ अशक्य होतं. पुस्तक छोटंसंच. तीनशे पानांचं. वाचत गेलं तर सलग वाचत जावं अशी शब्दांची ओघवती रचना. (Czech भाषेतून अनुवादित असलं तरीही) पण वाचून पदरात फारच कमी पडावं अशीच त्याची मांडणी आहे. हे पुस्तक वाचताना आपल्याला खूप काही कळतंय आणि एकदम काहीच कळत नाहीये अशी माझी स्थिती झाली. हे पुस्तक वाचता असताना, घरात, काहीतरी फालतू कारणावरून मनस्ताप देणारं भांडणही झालं. भांडण झालं कडाक्याचं, तरीही वरणभाताचं गरमगरम जेवण बनवून ते जेवून जीव शांतही केला. भांडण मिटलं. आणि पुस्तक सॅकमध्ये घालून समुद्रही गाठला. समुद्रावर जाताना जी 'ओला' बुक केली होती त्यातला ड्राइव्हर फक्त स्वतःसाठी गाडी चालवत होता आणि आमच्यावर गाडी चालवून कृपा करत होता. सूर्य बुडताना बघणे चुकू नये म्हणून लवकर निघालो तर हे महाशय गाडी 'सुशेगात' चालवत होते. बरोबरीला त्याच्या 'फुल डाउनलोड प्लॅन' असलेल्या 'हायएन्ड फोन' वरून 'युट्यूब' वर लावलेली टुकार, कधीही न ऐकलेली पंजाबी आणि कसल्या कसल्या अगम्य शब्दांची रॅप गाणी होती.
समुद्रावर पोहोचेपर्यंत सूर्य बुडून गेला होता. अंधार पसरत चालला होता. अंधार वाटच बघत होता बहुतेक. वाळू, लाटां, अंधारात भिरभिरणारी काळी छोटी पाखरं, लोकांची गर्दी, वाळूत धावणारे कुत्रे, लोकांचे हसण्या-खिदळण्याचे आवाज, दूरच्या बीचसाईड हॉटेलमधल्या पार्टीचे ढणढणत असलेले स्पीकर्स आणि अथांग पसरलेला समुद्र या सगळ्यात सॅकमधले 'अनबिअरेबल लाईटनेस ऑफ बीइंग' तसेच राहिले.
'क्षितीजापर्यंत जे पाणी दिसतंय ते किती खोल असेल?' , 'खूप खोल, इथून दहा पावलांवरच खोल आहे ते'.

समुद्रावरून येतानाही भेटलेल्या रिक्षावाल्याने भन्नाट वेगात घरी परत आणून सोडले. 'अरे धीरे चलाओ' म्हटलं की 'अभी आपके स्पीडसेही चलाता हू' असे म्हणे, वेग कमी करे आणि पुन्हा थोड्या वेळाने तोच भन्नाट स्पीड.
'अनबिअरेबल लाईटनेस ऑफ बीइंग' मधील 'इटर्नल रिटर्न' , 'कॅरेनिन' , 'किश', 'चेकोस्लोव्हाकीया', 'कम्युनिझम', 'प्राग स्प्रिंग', 'बेथोव्हेन' मात्र पुन्हा डोक्यातून वर आले घरी पोचताच, म्हणून ते पुस्तक उघडले वाचायला. ते दुसऱ्या दिवसापर्यंत वाचत राहिले अधून मधून. अस्वस्थता डोकावतच होती. शेवटी दुसऱ्या दिवशी, संध्याकाळ झाली, खोलीत काळोख पसरला तरी अंधुक होणाऱ्या ओळी वाचत राहिले.
या पुस्तकामधे गोष्ट अशी नाही. पण चार मुख्य पात्रांची आयुष्यं त्यात चितारली आहेत. ही आयुष्यं त्यांनी साठच्या दशकातील चेकोस्लोव्हाकिया, त्यातील प्राग शहर, काही गावं, स्वित्झरलँडमधील जिनिव्हा आणि झुरीक येथे घालवली आहेत. या पात्रांपैकी पहिला 'टॉमस' हा ब्रेन सर्जन आहे. तो प्राग मध्ये राहतो आणि अतिशय नामवंत डॉक्टर असतो. हा काळ, १९६८ मधील 'प्राग स्प्रिंग' या ऐहसिक घटनेचा, चेकोस्लोव्हाकिया मधील राजकारणाच्या आणि राज्यव्यवस्थेच्या एकंदरीत उलथापालथीचा. टॉमस हा 'राजकारण' या विषयांबाबत निर्विकारपणे स्वतःचे (individualistic) मत बाळगणारा असतो. म्हणजे ना तो अधिकारात असलेल्या व्यवस्थेच्या बाजूने असतो ना तो त्यांच्या विरुद्ध असलेल्या बंडखोर पक्षांच्या बाजूचा असतो. त्याचे वैयक्तिक आयुष्य त्याने 'नो स्ट्रिंग्स अटॅच्ड ' असेच ठेवलेले असते. पत्नीशी फारकत घेतल्यानंतर ती त्याच्या मुलाला भेटण्यावर बंधनं घालते तसेच लग्न न टिकवू शकल्याने त्याचे आईवडील त्याच्या पत्नीचीच बाजू घेतात आणि त्याला दोष देऊन त्याच्याशी बोलणे बंद करतात या सगळ्यामूळे कंटाळून तो आपल्या या सर्व नात्यांना रामराम ठोकतो आणि एक स्वच्छंद, (थोडेसे उतशृंखल) आयुष्य जगायला सुरवात करतो. अनेक स्त्रियांशी संबध ठेवतो पण कुणाशीही भावनिक जवळीक करत नाही. 'सबिना' ही अशीच त्याची एक चित्रकार मैत्रीण. ती खास असते कारण तीही त्याच्यासारखीच 'नो स्ट्रिंग्स अटॅच्ड' जगणारी असते. परंतु जेव्हा टॉमसला 'तेरेझा' ही एक छोट्या गावातली, हॉस्पिटलच्या कँटीनमध्ये काम करणारी वेट्रेस भेटते तेव्हा मात्र तो तिच्याशी भावनिक रित्या गुंतत जातो. या त्याच्या मनातील भावनांचे सखोल चित्रण लेखकाने केले आहे. या आधी टॉमसने कधीही कुठल्याही स्त्रीला आपल्या घरी राहण्यापासून, आपल्या बिछान्यावर एकत्र निद्रा घेण्यापासून परावृत्त केलेले असते. त्याचे अनेक स्त्रियांशी संबंध असतात पण कुठल्याच स्त्रीला तो आपल्या घरी राहण्यास घेऊन येत नाही. त्याला तो बिछान्यात एकटा असेल तरच झोप येत असते, पण तेरझा त्याला भेटायला प्रागला येते, आणि अचानक आजारी पडते, तेव्हा हॉस्पिटलमध्ये तो तिची सेवा करतो. त्याला तेरेझाबद्धल काहीतरी वेगळे जाणवते. नंतर जेव्हा ती आपली 'जड बॅग' घेऊन त्याच्या घरी दाखल होते तेव्हाही तो तिला घरात राहण्यापासून परावृत्त करू शकत नाही. त्याला तेरेझा बद्धल वाटतं की हे एका बास्केट मधून नदीच्या प्रवाहात सोडलेलं एक अनाथ मूल आहे ज्याची सर्व प्रकारे काळजी घेतली पाहिजे. तेरझाची असुरक्षिता (Fragile,Vulnerability) त्याला तिच्याबद्धल खोल भावना उत्पन्न करायला मदत करते.
तेरेझा ही एका छोट्याशा गावात राहणारी आणि वेट्रेसचं काम करणारी मुलगी. तिच्या आईच्या विक्षिप्त, असभ्य वर्तनाने आणि तेरेझाशी सततच्या विचित्र वागणुकीमुळे तेरेझा आपल्या आईला कंटाळलेली असते. आईबरोबरचे वास्तव्य म्हणजे तिच्या मनातला 'कॉन्सन्ट्रेशन कॅम्प'च असतो. शेवटी टॉमस भेटल्यावर ती कायमची टॉमसकडे राहायला येते. तिचंही मन अतिशय गुंतागुंतीचं आहे. शरीर आणि सेक्ससंबधी घृणा, कमालीची अतिसंवेदनशिलता यामुळे तिला सतत दुःस्वप्ने पडत राहतात. तिच्याशी लग्न केल्यानंतरही टॉमसचे इतर स्त्रियांशी संबंध असतात. टॉमसचे बाहेरख्याली जगणं ती नाकारूही शकत नाही आणि स्वीकारूही शकत नाही.
सबिना ही चित्रकार. अत्यंत कडक नियम, बंधनं, पारंपरिक कल्पना यांचा पुरस्कार करणाऱ्या घरात ती वाढलेली असते. त्यामुळे या सगळ्यापेक्षा वेगळं असं काहीसं रिबेल, स्वछंद आयुष्य ती जगत असते. सगळ्या गोष्टींमध्ये नको असलेल्यापासून सुटका, विश्वासघात करणे याला ती प्राधान्य देते. तिचं म्हणणंच असतं:
"From tender youth we are told by father and teacher that betrayal is the most heinous offense imaginable. But what is betrayal?…Betrayal means breaking ranks and breaking off into the unknown. Sabina knew of nothing more magnificent than going off into the unknown."
तिच्या मते मालकी, आश्वासनं, भावनिक गुंतवणूक ह्या सगळ्या बोजड गोष्टी आहेत. त्यांचा दर्जा 'किश(kitsch)' म्हणजेच सुंदरतेचा अभाव असलेल्या , poor taste (because of excessive garishness or sentimentality) असलेल्या गोष्टी आहेत. सबिना आपल्या कलेत किश(kitsch)चा अंतर्भाव कधीही असू नये याची खबरदारी घेत असते, त्याचबरोबर आयुष्यातही किश(kitsch)चा अंतर्भाव असू नये असेच तिचे ठाम मत असते. त्यासाठी ती कुठलंही टोक गाठायला तयार असते. यासाठीच ती आपला प्रियकर फ्रान्झ याला सोडून निघून जाते. सामाजिक नियम, डोमेस्टिकेशन सोडते, देशही सोडते. कुणीही तिच्यावर हुकूमत गाजवणे तिला मंजूर नसल्याने ती तसं न होऊ नये यासाठी 'Betrayal(विश्वासघात)' चा अवलंब करत असते.
फ्रान्झ हा एक उच्च बौद्धिक क्षमतेचा विवाहित प्रोफेसर असतो. सबिनाशी त्याचे असलेले संबंध त्याला उघडपणे कधीच स्वीकारता येत नाहीत. राहत असलेल्या शहरात तिच्याशी संबध ठेवायला तो कचरत असतो म्हणूनच व्याख्यानाच्या टूर्स करून तो सबिनाला आपल्याबरोबर घेऊन जात असतो. अद्याप स्वतःच्या शहरात (बायकोबरोबर राहत असलेल्या) मात्र त्याला सबिनाशी संबध ठेवणे शक्य झाले नसते. तो शेवटी हि गोष्ट बायकोपाशी कबुल करतो. पण जेव्हा त्याची ही भावनिक गुंतवणूक (सबिनाला बोजड वाटणारी) सबीनाला कळते तेव्हा ती त्याच्यापासून दूर निघून जाते. सबिना गेल्यावर तो एका विद्यार्थिनीशी संबध ठेवतो पण तरीही कायमस्वरूपी सबिनाचीच मनाने भक्ती करत राहतो. फ्रान्झ हे ही एक गुंतागुंतीचे पात्र. तेरेझा प्रमाणेच जडत्वात राहणारे. तो डाव्या विचारसरणीचा पुरस्कर्ता असतो. त्याला राजकारण, प्रोसेशन्स, मार्चेस (मोर्चेबाजी) यात रस असतो. शेवटी बँकॉक येथे त्याचा हकनाक बळी जातो. त्याच्या मृत्यूनंतर त्याला घटस्फोट न दिलेली त्याची बायको त्याचा मृतदेह ताब्यात घेते.
या पुस्तकात गोष्ट अशी नाहीच, हे संकल्पनांचे(Ideas)चे पुस्तक आहे. या संकल्पनांचा पाया तत्वज्ञानावर आधारलेला आहे. यात खूप खोलवरचे चित्रण असलेल्या पात्रांतून लेखक काय शोधतो आहे? तर जगण्याचे संदर्भ. जगण्याची परिमाणं. माणूस जगण्यात 'लाईटनेस' चा अवलंब करतो किंवा वेट(हेवीनेस) चा.
'लाईटनेस' म्हणजे हलकं-कुठेही कशाच्याही संपर्कात न येणारं. अलिप्त, विरक्त, निर्विकार.
'हेवीनेस/वेट' म्हणजे जडत्व. जे संपर्कात येतं. जे मिसळून जातं. ज्याला अलिप्तता ठाऊक नाही.
'लाईटनेस' आणि 'वेट(हेवीनेस) यातलं कुठलं चांगलं म्हणायचं? ते अद्याप ठाऊक नाही.
या पुस्तकात लेखकाने या दोन संकल्पना आणि त्यांच्यावर आधारलेलं या चार व्यक्तींचं जीवन रेखाटलं आहे.
टॉमस, सबिना - लाईटनेस (थोड्या फार फरकाने) आता त्यांना लाईटनेस चे उदाहरण म्हणायचे का ? हा प्रश्नच आहे.
तेरेझा, फ्रान्झ - वेट/हेवीनेस , यांना मात्र वेट /हेवीनेसचीच उदाहरणं म्हणता येईल.
लाईटनेस म्हणजे कशाशीही चिकटून न राहणे. जीवनात ही संकल्पना अवलंबता येते का? आणि तशी अवलंबताना माणसाचे काय होते? त्याला तसे खरेच जगता येत असेल का? हे प्रश्न पुस्तक वाचताना सतत पडत राहतात. लेखकाला 'लाईटनेस' चे आकर्षण आहे. पण त्याने पुस्तकाचे नाव दिले आहे 'अनबिअरेबल लाईटनेस ऑफ बीइंग'
म्हणजे हा 'बीइंग' चा 'लाईटनेस' अनबिअरेबल आहे. असहनीय आहे. का? त्याचे उत्तर मात्र लेखक देत नाही. कारण ते उत्तर कोणीही दुसऱ्याला देऊ शकत नाही. तशी उत्तरं लेखकाच्या पात्रांना म्हणजे टॉमस, सबिना, तेरेझा, फ्रान्झ यानांही सापडत नाहीत. शोध जरूर घेतात. टॉमस, तेरेझा, फ्रान्झ यांचा शोध तोडला जातो, संपतो, तो त्यांच्या मृत्यूमूळे. पण सबिना, ती 'लाईटनेस' चे आत्यंतिक टोक गाठण्याचा प्रयत्न करते, पण तिला तरी काही सापडते का ? तर बहुदा नाही. तिच्या 'लाईटनेस'चा अवलंब करून जगण्याला तरी 'लाईटनेस' म्हणायचे का?
खरा 'लाईटनेस' म्हणजे काय? ती स्थिती कोणती? आणि ती कशी साधायची हेच माहित नाही. याचे ज्ञान कोणीही देऊ शकत नाही, म्हणून अंधारात चाचपडत जे जे 'लाईटनेस' च्या नावाखाली अवलंबता येईल ते ती अवलंबत जाते. पण अखेर तिलाही तसे जगणे साध्य होते का?
हे पुस्तक फार क्लिष्ट आहे. कारण याच्यामध्ये मोकळे सोडून दिलेले अनेक धागे दोरे आहेत. घरंगळणारी रीळं आहेत. अर्थ जसा लावावा तसे फिरणारे शब्द आणि संकल्पना आहेत. त्यामुळे हे पुस्तक वाचता येईल पण समजता येईल की नाही हे सांगणे कठीण. वरवरची गोष्ट कळते. तिच्यात सुसूत्रता आहे. ती शेवटापर्यंत देखील पोचते, पण तरीही गोष्टीच्या खालून वाहणारा प्रवाह लांबच लांब पोहोचतो. त्या अथांग समुद्राच्या दूरवर दिसणाऱ्या क्षितिजावरल्या पाण्यासारखा. आणि दहा पावलांवरच तो खोल होत जातो. क्षितिजापर्यंत तर खूपच खोल. ही लेखकाचीच अवस्था आहे. आणि एकंदरीत माणसाचीच अवस्था. लेखक म्हणतो 'लाईटनेस आणि वेट या मधील कुठचं चांगलं? कुठचं सकारात्मक आणि कुठचं नकारात्मक? कोण जाणे? पण ज्या ज्या काही सकारत्मक-नकारात्मक जोड्या आहेत (Good-Evil, Black-White, Softness-Coarseness etc etc) त्यातले लाईटनेस आणि वेट हे सगळ्यात गूढ आणि अनाकलनीय संयोजन (कॉम्बिनेशन) आहे.
मी स्वतः अत्यंत 'जडत्वात' राहणारी व्यक्ती आहे. माझ्या जवळपास घडणाऱ्या गोष्टींशी माझा नकळत आंतरिक संबंध निर्माण होतो. मी इगोने पछाडलेली. टोकाची भावनिक. माझ्याजवळ एखादी छान दिसणारी प्लास्टिकची पिशवी जरी काही काळ राहिली तरी मी त्याच्याशी संबध जोडून मोकळी होते. मला ती टाकणे जिवावर येते. त्याच्यात माझ्या भावना गुंततात. मला एक कागदाची स्ट्रीप आठवते 'या चित्राला हात लावू नये' असे लिहिलेली. ती कागदाची स्ट्रीप मी माझ्या पुण्यातील घरी असताना काढलेल्या ओल्या चित्रावर(ते खराब होऊ नये म्हणून) अडकवून ठेवली होती. ती स्ट्रीप मला त्यानंतर दोन वर्षांनंतर कुठेतरी सापडली तर मी ती अजून कचऱ्याच्या डब्यात टाकू शकले नाही कारण मला त्या स्ट्रीपला बघून त्या घरातले माझे वास्तव्य आठवते. आता याला कुठच्या टोकाचे 'जडत्व' म्हणावे? मी 'जडत्व' या गोष्टीपासून पळत असते. भौतिक गोष्टींपासून सुटका बरीच केली आहे पण हे 'जडत्व' भौतिक नाहीच हे मला जाणवू लागले आहे. खरे 'जडत्व' मनात आहे, त्याचे काय करायचे? 'गोष्टींची हाव/इच्छा' म्हणजे जडत्व नव्हे. मला तशी हाव नाही, इच्छा नाही. पण सगळे असून, त्यात असूनही, सगळ्याबाबतीत लागणारी एक जी निर्विकार वृत्ती लागेल ती माझ्यात नाही. तशी निर्विकार वृत्ती बाळगून जगणे म्हणजे खरे जगणे? की सगळ्याचा आस्वाद घेत, त्यात आकंठ बुडत राहणे, आणि त्याशिवाय दुःखी होणे, झुरणे म्हणजे जगणे? या दोन टोकांमधली मधली ओढाताण मात्र जीवघेणी आहे. जे एका टोकाला असतात त्यांचे बरे असते पण जे या दोन टोकांमध्ये अधांतरी असतात त्याची प्रचंड फरफट होते. आणि असेही नाही की जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्ही सतत एका टोकावर असाल. तुमची स्थिती कायम बदलत असते.
या पुस्तकातून मनात घरंगळलेला काही ऐवज :

रिपीटेशन अँड स्ट्रेट लाईन
माणूस सरळ लाईन मध्ये चालतो. त्याला वर्तुळाकार फिरून परत जागेवर येणे रुचत नाही. त्याला ते पटत नाही. रिपीटेशन आवडत नाही.
या पुस्तकात एक प्रसंग आहे. कॅरेनिन आणि तेरेझा यांचे कॅरेनिनसाठी दोन रोल(खाणे) विकत घेऊन येणे आणि घरी आल्यानंतर कॅरेनिनकडून खोटाखोटा रोल हिसकावून घेण्याचा आव आणणे आणि त्याने तो मिळवण्यासाठी खटपट करण्याचा खेळ खेळणे. शेवटी कॅरेनिनला कॅन्सर होतो आणि त्याचा पाय कापावा लागतो. कॅरेनिन जेव्हा अखेरचे क्षण मोजत असतो, तेव्हा त्याला दिलेला रोल खाताना आणि दुसरा रोल तेरेझा आणि टॉमसने (लुटुपुटुचंच)हिसकावून घेतल्यावर कॅरेनिन तो परत मिळवतो आणि तोंडात धरून त्यांच्याकडे विजयी मुद्रेने पाहतो तेव्हा तेरेझा आणि टॉमस खुश होतात. 'म्हणजे याने जगण्याची आशा सोडून दिली नाहीये तर! असे त्यांना वाटते. तेव्हा टॉमस तेरेझाला म्हणतो 'त्याला रोज रोज तू तोच रोल देत होतीस आणि तोही आनंदून तो रोल तोंडात घेई. दुसरा रोल आपण त्याच्याकडून काढून घेतल्यासारखे करु, मग तो स्वतः तो रोल खटपट करून(फक्त त्याच्या दृष्टीने, आपल्यासाठी ती 'कॅरेनिन' ला खेळता यावं म्हणून केलेली खोटी-खोटी खटपट) तो रोल मिळवत असे आणि विजयी मुद्रेने तोंडात घेऊन आपल्याकडे बघत असे. कॅरेनिन तेवढ्यावर खुश होता पण तसं तू माणसाशी केलंस तर तो दुसऱ्या दिवशी कंटाळेल आणि सांगेल मी तुझ्या या त्याच त्याच रोल ने, आणि रोलच्या त्याच त्याच खेळाने बोर झालो आहे.
जी. एंच्या पिंगळवेळ या पुस्तकाच्या सुरवातीच्या पानावर एक वाक्य आहे Strindberg चे
Shallow people demand variety- but I have been writing the same story throughout mu life, every time trying to cut nearer the aching nerve.
जी. एंच्या पुस्तकातही तेच तेच रेपीटेटिव्ह थिम्स येतात. किंबहुना वैयक्तिकरित्या आपण जे शोधत असतो ते रिपीटेटिव्ह असतं. रिपीटेटीव्हली काही गोष्टींचा पाठपुरावा आपण करत असतो, म्हणून आपण सोडून इतरांत मात्र आपल्याला नॉनरिपीटेटिव्ह नाविण्य हवं असतं. हे माणसाचं खरं दुखणं. प्राण्यांचं तसं नाही. 'रुटीन' हेच त्यांचे आयुष्य. 'नाविण्य' त्यांना ठाऊकच नाही.
कुत्रा आणि माणूस
"True human goodness, in all its purity and freedom, can come to the
fore only when its recipient has no power. Mankind's true moral test,
its fundamental test (which lies deeply buried from view), consists in
its attitude towards those who are at its mercy: animals. And in this
respect mankind has suffered a fundamental débcle, a débcle so
fundamental that all others stem from it."
हेवीनेस (जडत्वाने जगणे) आणि जड बॅग, जड कथेचं ' ऍना कॅरेनिना'पुस्तक
तेरेझा जेव्हा टॉमस ला भेटायला प्रागला येते तेव्हा ती ' ऍना कॅरेनिना' (लिओ टॉलस्टॉयचं) हे पुस्तक बगलेत घेऊन आलेली असते. तिच्याशी भावनिकरित्या गुंतला असला तरीही टॉमस आपले स्वछंदी आयुष्य सोडू इच्छित नाही. त्याला ते 'ड्रिफ्टिंग'/lightness ने परिपूर्ण आयुष्यच हवं असतं. स्वतःला तेरेझाच्या भावनिक विळख्यातून सुटका मिळावी म्हणून तो एक कुत्रा घेण्यास राजी होतो. जेणेकरून तेरेझाच्या भावनिक गरजांचा डोंगर त्यांच्या एकट्यावर कोसळणार नाही, ती female dog असते. टॉमस या कुत्रीचे 'कॅरेनिन' असे पुरुषी नाव ठेवतो. या आशेने की 'कॅरेनिन' तेरेझाशी भावनिक नाते जोडेल. बहुतेकदा कुत्र्यांमध्ये विरुद्ध लिंगी मालकाशी जास्त जवळिकीचे नाते असते असे म्हटले जाते. (पुरुषी नावामुळे 'कॅरेनिन' हिच्यामध्ये पुरुषी गुण उत्पन्न होतील ) आणि खरोखरीच तसे होते. 'कॅरेनिन' तेरेझाशी जवळीक साधते. तेरेझाचे पुस्तक बगलेत घेणे आणि 'कॅरेनिन' शी खोलवरचे नाते जोडणे (कॅरेनिनला बगलेत घेणे) सलग्न आहे. कुणाशीही जवळीक नको असलेल्या टॉमसला प्रत्येक गोष्टीशी जवळीक साधणाऱ्या आणि जडत्वात राहणाऱ्या तेरेझापासून 'कॅरेनिन' मुळेच स्पेस मिळते.
तेरेझाची स्वप्नं
तेरेझची स्वप्नं हा पुस्तकाचा एक तरल भाग आहे. तिला दुःस्वप्न पडतात. शरीर आणि शारीर गोष्टींबाबत तिच्यामध्ये असलेली, खोलवर दडलेली घृणा तिच्या स्वप्नांतून वेगवेगळी रूपं घेऊन येत राहते. टॉमसचे तेरेझासमावेत इतर अनेक नग्न स्त्रियांना मार्च करण्याची आज्ञा देणे आणि त्यातील न रुचलेल्या स्त्रियांना गोळी घालून मार्च करत असलेल्या प्लॅटफॉर्मच्या बाजूच्या स्विमिंग पूलमध्ये पाडणे असं एक स्वप्न.
कॅरेनिन गिव्हज बर्थ टु रोल्स अँड या बी
दुसरं स्वप्न 'कॅरेनिन' दोन खाण्याचे रोल्स आणि एक माशी याना जन्म देते. समजायला कठीण अशी ही स्वप्न. पण तिच्या आणि एकंदरीत 'जडत्व' घेऊन जगणाऱ्या व्यक्तींच्या मनात खोलवर रुतलेल्या संकल्पनांचे रूपच हि स्वप्नं असावीत.
बोवलर हॅट : बोवलर हॅट घातलेली नग्न स्त्री स्वतःचे रूप आरशात बघत असते हे नक्की कशाचे प्रतीक आहे. मिलन कुंदेरा याना अशी रुपकं घेऊन काय मांडायचे आहे याचा विचार करण्यासाठी हे पुस्तक मला पुन्हा वाचावे लागेल बहुतेक.
Ess muss sein, or "It mu st be." आणि बेथोव्हेन
बीथोवेनचे संगीत आणि त्याने वापरलेली फ्रेज 'Ess muss sein, "It mu st be." या पुस्तकातील पात्रांच्या (विशेषतः टॉमसच्या) आयुष्याशी अतिशय संलग्न आहे.
Ess muss sein, or "It mu st be."
Tereza also introduces Tomas to Beethoven and the profound heaviness of
his music. In add ition, the novel Tereza reads when she first arrives
and after which the couple name their dog is Anna Karenina. This
novel, with its tragic tale of love, suffering and suicide both
foreshadows the kind of love Tereza offers Tomas, and hints constantly
at the threat of suicide.
किश (kitsch)
किश म्हणजे कलेतील वाईट टेस्ट. कमी दर्जाची कला आणि तिचे संवर्धन करणे, तिची निर्मिती करणे म्हणजे किश. सबिना आयुष्यभर 'किश' पासून दूर पळण्याचा प्रयत्न करते. तिच्यामते जे जे दुय्यम- कमी प्रतीचे ते ते किश. आणि ती 'किश' ही संकल्पना फक्त कलाच नाही तर आयुष्यातही अमलात आणण्याचा प्रयत्न करते. त्यासाठी ती नाती तोडते, देश सोडते. किश म्हणजे नेमके काय याचा अर्थ कादंबरीपुरता लागू शकला तरी आयुष्यातील 'किश' ज्याचे त्याने ठरवायचे.
बुक अँड ब्रदरहूड
तेरेझाचे आयुष्य इतक्या छोट्या खेड्यात गेलेलं असतं आणि ती फार चांगलं आयुष्य जगलेली नसते. तिची विक्षिप्त आणि अश्शील वागणारी आई यापासून सुटकारा मिळवण्यासाठी ती दुसरं जग शोधते ते पुस्तकांत. या पुस्तकांच्या वाचनाने ती स्वतःचं छोटं, कोतं आयुष्य विसरण्याचा प्रयत्न करते. यामुळेच जी लोकं पुस्तकं वाचतात त्यांच्याशी ती तिचे बंधुत्वाचे नाते जोडत असते. कुणीही पुस्तक वाचताना दिसलं की तिला त्या माणसाच्या चांगुलपणाची खात्री ती स्वतःला पटवून देत असते.
मिलन कुंदेरा हा लेखक प्राग, चेकोस्लोव्हाकियामध्ये १९२९ साली जन्मला. तरुणपणी तो कम्युनिस्ट विचारांचा होता, परंतु १९६८ साली झालेल्या प्राग स्पिंग या घटनेदरम्यान त्याने कम्युनिस्टविरोधी विचारांचा पुरस्कार केला. प्राग स्प्रिंग ही त्या देशातील एक ऐतिहासिक घटना होती. यामध्ये 'the promise of Socialism with a human face' हे प्राग स्प्रिंगच्या घटनेचे ब्रीद होते. अलेक्झांडर दुबेक यांनी तत्कालीन व्यवस्थेचं अध्यक्षपद स्वीकारलं. पण ही घटना शेजारच्या रशियाला काळातच त्यांनी प्रागमध्ये टँक्स, लष्करशाहीचा अवलंब केला आणि चेकोस्लोव्हाकियामध्ये रशियन ट्रूप्सनी कब्जा केला. यानंतर कुंदेरा यांच्याही स्वतःच्या विचार, वक्तव्यावर बंधनं घालण्यात आली होती, त्यामुळेच त्यांनी पुढे देश सोडून पॅरिस येथे वास्तव्य केले.
या पुस्तकातील टॉमस या व्यक्तिरेखेतील काही भाग कुंदेरा यांनी स्वतःच्या आयुष्यातून घेतला आहे. टॉमसला आपल्या एका लेखासाठी तत्कालीन राजव्यवस्थेची मागण्याचा प्रस्थाव येतो, तो न स्वीकारल्याने आणि विरोधक पक्षांच्या बाजूनेही सहमती न दर्शवल्याने टॉमसला आपली प्रतिष्ठित सर्जनची नोकरी गमवावी लागते आणि त्याला खिडक्या साफ करण्याचे काम पत्करावे लागते.
पुस्तक झेक(Czech) भाषेतून इंगजीत Michael Henry Heim यांनी अनुवादित केलं आहे. या पुस्तकावर आधारित एक चित्रपटही दरम्यान आला होता. पण हा चित्रपट कुंदेरा यांच्या पुस्तकापेक्षा इतका वेगळ्या पद्धतीने मांडला गेला, आणि मूळ संकल्पनांशी इतका फारकत घेणारा ठरला की पदरी पडलेल्या निराशेने कुंदेरा यांनी आपल्या कुठल्याही पुस्तकावरून चित्रपट काढण्याला सक्त मनाई केली.
No comments:
Post a Comment