Wednesday 16 March 2016

खग्रास सूर्यग्रहण आणि इंडोनेशिया

खग्रास सूर्यग्रहण ही फारच दुर्मिळ सेलेस्टियल इवेंट आहे. दुर्मिळ अश्यासाठी की जरी प्रत्यक्ष ठिकाणाहून तुम्हाला ते दिसण्याची जरी १०० % शक्यता असली तरी वातावरणाच्या बदलांवर त्याचे दिसणे अवलंबून असते. ऐनवेळेला ढग येऊन तुमच्या खग्रास सूर्यग्रहण बघण्यावर पाणी पडू शकते ( लिटरली). तुम्ही कितीही प्लॅन करा जर तुम्हाला ते दिसायचे  नसेल तर कितीही आटापिटा करूनही ते दिसणार नाही. (सूर्यग्रहणाच्या दिवशी सकाळी सगळं आकाश निरभ्र असेल आणि अगदी नेमक्या सूर्यग्रहणाच्यावेळी आकाशात ढग जमा होतील, रिशी याला Cosmic Humor म्हणतो ) ,   तर असे हे हुलकावण्या देणारे खग्रास सूर्यग्रहण यंदा इंडोनेशियाच्या काही भागात आणी पॅसिफ़िक  महासागरात दिसणार होते. खग्रास सूर्यग्रहणाच्या मागे (Eclipse Chasers)  फिरणारे आणि २-३ मिनिटांच्या या आकाशातल्या विलक्षण नाट्याला बघायला जगाच्या पाठीवर कुठेही जाणारे वेडे या जगात अनेक आहेत. तीन-तीन, चार-चार वर्ष आधी ते अश्या जागांची माहिती काढून बूकिंग करून ठेवतात म्हणे. आम्हीही यंदा या त्यांच्यात सामील व्हायचे ठरवले. ( रिशी हा त्यांच्यातलाच एक वेडा, त्याने १९९९ ला भारतात खग्रास व २००९ ला कंकणाकृती सूर्यग्रहण बघितले होते) मी २००९ चे  कंकणाकृती सूर्यग्रहणाचे प्रतिबिंब   पूण्याला आमच्या ऑफ़िसमध्ये असलेल्या छोट्या तळ्यात बघितले तेवढेच. पण रीशीने मला खग्रास सूर्यग्रहण हा काय अचाट प्रकार असतो हे सांगताच मलाही त्याबद्धल खूप उत्सुकता वाटली आणि आम्ही यंदाचे २०१६ चे खग्रास सूर्यग्रहण पाहायला इंडोनेशियाला जायचे ठरवले.

इंडोनेशियाच्या या खालील चित्रात दाखवलेल्या भागातून हे सूर्यग्रहण ९ मार्च २०१६ ला दिसणार होते.


त्याप्रमाणे आम्ही 'वेडा' (हो.  हे गावाचे नाव आहे, आणी खरंच वेडे लोकच तिथे जातात) , हल्माहेरा, इंडोनेशिया हे स्थान निश्चित केले. ५ मार्च ला दुपारी मुंबईहून निघून मुंबई ते चेन्नई, चेन्नई ते सिंगापूर, सिंगापूर ते जकार्ता असे ६ मार्चला सकाळी जकार्ताला पोहोचलो. ६ मार्च ला संध्याकाळी, जकार्ताहून  निघून , ७ मार्चला दुपारी 'वेडा' ला पोहोचलो.

७ मार्च २०१६
  
इंडोनेशिया हा खूपच मोठा देश आहे, लांबच लांब पसरलेला. अनेक बेटांनी बनलेला हा खूपच सुंदर देश आहे. हल्माहेरा हे त्यातले एक छोटेसे बेट, जे 'नॉर्थ मलुकू' या बेटांच्या समूहात येते. जकार्ता या राजधानीच्या शहरापासून ते फार उत्तर-पूर्वेकडे आहे. तिथे जाण्यासाठी 'तर्नाते' या बेटावर जावे लागते. जकार्ता वरून 'तर्नाते' ला जाण्यसाठी अनेक 'By Air' ऑप्शन्स आहेत. आम्ही जकार्ता ते 'मकास्सार' (हे गाव सुलावेसी बेटात येते) आणि  'मकास्सार' पासून  'तर्नाते' ह्या मार्गे 'तर्नाते' ला पोहोचलो.
'तर्नाते' वरून हल्माहेराला जाण्यासाठी स्पीडबोट आहेत. हल्माहेरामध्ये अनेक गावे आहेत, त्यातले सोफिफी बंदर हे 'वेडा' गावाच्या जवळ , म्हणून स्पीडबोटने सोफिफी बंदरपर्यंत येउन पुढे तीन तासांचा रस्ता (by road) 'वेडा' गावी पोहोचतो. हा प्रवास बराच hectic वाटत असला तरी अतिशय नेत्रसुखद आहे. 'तर्नाते' ते सोफिफी हा स्पीडबोट चा  प्रवास ४५ मिनिटांचा असून पॅसिफ़िक  महासागराच्या अथांग पाण्यातून जाताना आजूबाजूला अनेक छोटी बेटे दिसतात. त्यात 'पुलाव टिडोरे', 'पुलाव तर्नाते', 'पुलाव माकीयान' अशी बेटं त्यांच्यावरच्या उंच पर्वतांसहित दिसतात. ('पुलाव' म्हणजे बेट)

सोफिफी पासूनचा रस्त्याचा तीन  तासांचा प्रवास अतिशय नयनरम्य भागातून जातो. एका बाजूला बेटाची समुद्राकडची बाजू आणि दुसऱ्या बाजूला रेनफ़ॉरेस्टचा भाग. मध्ये मध्ये छोटी टुमदार घरांची गावं सुद्धा लागतात. वळणांवळणांचा, आणि उंच-सखल रस्ता एक लहानशी Amusement Ride च वाटावी.

'वेडा' गावातील 'वेडा रिसॉर्ट' इथे आम्ही थांबलो होतो. हा रिसॉर्ट समुद्राला लागुनच आहे. खरंतर आम्हाला या रिसॉर्टमध्ये किवा इतरत्र कुठेही booking मिळणं अशक्य होतं कारण Eclipse आणी इतर गोष्टींसाठी अनेक जागा सहा-सहा महिन्यांपासून booked होत्या. आणि आम्ही फार उशिरा खग्रास सूर्यग्रहण बघायला जाण्याचा निर्णय घेतला, कारण तिथलं weather हे tropical असल्याने त्याचा काही भरवसा नाही, त्यामुळे जाण्याबाबत बरीच साशंकता होती. त्यामुळे शेवटी कुठेच बुकिंग मिळेना, पण  'वेडा रिसॉर्ट' चे मालक 'रॉब सिंके' यांनी आम्हाला खूपच मदत केली आणि त्यांच्या community children school मध्ये आमच्या राहण्याची अतिशय चांगली सोय केली. रॉब सिंके आणि त्यांची बायको लिंडा हे दोघेजण म्हणजे अतिशय छान माणसं. त्यांच्याबद्धल मी पुढे लिहिणारच आहे. तूर्तास 'वेडा रिसॉर्ट' आणि महत्वाची event म्हणजे 'खग्रास सूर्यग्रहण' याबद्धल आधी लिहिते.

तर आम्ही अखेर वेडा रिसॉर्टला ७ मार्चला दुपारी पोहोचलो, रिसॉर्टच्या रेस्टॉरंटमध्ये आम्हाला रॉब सिंके आणि लिंडाने receive केले. हे रेस्टॉरंट काही नेहमीसारखे रेस्टॉरंट नाही, त्याला एक घरगुतीपण होतं. एक मोठं लांबलचक जेवणाचं टेबल, जवळपास २० माणसं बसण्याएवढं आणि त्याच्या बाजूला सोफा ज्यावर तुम्ही कितीही वेळ आराम करू शकता असं. सोफ्याजवळच्या टीपॉयवर स्नॅक्स भरून ठेवलेल्या काचेच्या बरण्या. केव्हाही उघडून खा) जवळच पुस्तकांचं कपाट. त्यात अनेक विषयांवरची पुस्तकं (विशेषतः Indonesian Birds, Ocean life या विषयांवरची).

थोडा वेळ तिथल्या सोफ्यावर विश्रांती घेऊन, आलेल्या इतर गेस्टशी गप्पागोष्टी करून नंतर आम्ही जेवण घेतले. इंडोनेशियन cuisine भारताप्रमाणेच बरेचसे मसालेदार असते. पण या रिसॉर्टमध्ये येणारी बहुतांशी लोकं युरोपिअन/अमेरिकन असल्याने, जेवण इंडोनेशियन असले तरी कमी मसालेदार होते आणी त्याला एक Continental touch होता. अनेक खाद्यप्रकारांच्या डिशेश टेबलावर मांडलेल्या असत. तुम्हाला पाहिजे ते वाढून घ्या. सूप, सॅलेड्स, भाज्यांचे इंडोनेशियन preparations, भातांचे प्रकार, नुडल्स चे प्रकार.

बाकीचे प्रवासी 'वेडा  रिसॉर्ट' मध्ये वेगवेगळ्या करणासाठी आले होते.  रिसॉर्ट मध्ये फक्त ८ बंगले आहेत आणि जवळपास सगळे मिळून वीसेक गेस्टस होते. अनेक लोकं डायविंग (deep water diving) करायला आले होते. आम्ही आणी आणखी ६-७ माणसं सूर्यग्रहण पाहायला आली होती. दोघेजणं Turtle Conservatory Project साठी आले होते.

८ मार्च २०१६

स्नोर्केलिंग:   
सुर्याग्रहाणासाठी चांगली जागा शोधायची होती. त्यासाठी थोडं इकडे तिकडे फिरलो. शेवटी रिसॉर्टच्याच Pebble Beach वर बसून सुर्याग्रहाण बघायचे ठरवले.

९ मार्च २०१६ - D-Day

सकाळी आकाश खूप Clear होतं. त्यामुळे आम्ही खुश झालो. पण ८.२० च्या सुमारास ब्रेकफास्ट करून जेव्हा Pebble Beach वर पोहोचलो तेव्हा आकाशाचा  सीन चांगलाच बदलला होता. Fingers Cross करून आम्ही वाट पाहू लागलो. ढग उपरोधिकपणे आम्हाला हसत जवळ जवळ येत होते. त्यांच्यामारी! आता काही दिसणार आहे कि नाही म्हणत म्हणत ८.३७ ला first contact झाला. त्यावेळेला ढगांनी आमच्यावर मेहेरबानी करून आम्हाला बघायला जागा दिली.
९  ला second contact ला हि ढग आमच्यावर मेहेरबान होते. हळूहळू चंद्राची सावली सरकत सरकत सूर्याला झाकू लागली, जसजसं सावलीचं प्रमाण वाढत होतं तसतसा अंधार वाढत चालला होता, वातावरणाला संध्याकाळचं रूप आलं होतं. आकाशात संध्याकाळच्या संधीप्रकाशात फिरणारे (बहुदा Nocturnal Birds,   पाकोळ्या ) पक्षी घिरट्या घालू लागले.  चंद्राच्या सावलीने सूर्य पूर्ण झाकण्या आधी diamond ring दिसते.  आणि काही सेकंदातच सुर्य पूर्णपणे झाकला गेला. आणि अचानक सूर्य असलेल्या आकाशात आणि जमिनीवरही खूप अंधार झाला. पक्षी ओरडू लागले, रातकिड्यांनी लगेच गायला सुरवात केली. त्यानंतर काही सेकंदातच हे नाट्य दिसणे बंद झाले कारण ढगांनी सुर्यग्रहण पूर्णपणे झाकले गेले. पुढचा जवळपास ३ मिनिटांचा Totality चा काळ ढगांमुळे दिसू शकला नाही.
त्यानंतर बऱ्याच वेळाने ढग थोडेसे बाजूला झाले तेव्हा ग्रहण सुटत होतं. पुन्हा third contact ला ढग आले. आणि काही दिसू शकलं नाही. शेवटचा fourth contact मात्रं दिसला.
अश्याप्रकारे ढगांच्या मेहेरबानीने totality दिसली परंतु ती पूर्ण ६ मिनिटे अनुभवता आली नाही. खरंतर ६ मिनिटे जरी ती अनुभवता आली असती तरीही ती कमीच वाटली असती. अश्याप्रकारे खग्रास सूर्यग्रहण संपन्न झाले. मी पहिल्यांदाच हा अनुभव घेतल्याने मला ही इवेंट आवडली, पण रिशीची थोडी निराशा झाली, कारण त्याला ६ मिनिटांची totality (with spotless sky) , आणि corona , shadow Bands हे सर्व अनुभवायचं होतं. पण खग्रास सूर्यग्रहण (Totality चे काही सेकंद) दिसलं हेही नसे थोडके. Especially हे ऐकल्यावर कि इंडोनीशियाच्या काही गावांत जिथे Full coverage होतं तिथे पूर्ण ग्रहणकाळ आकाश ढगांनी आच्छादलेलं  होतं.

संध्याकाळी, स्थनिक मुलांनी इंडोनेशियाचे परंपरागत नृत्य आणि काही गाणी सादर केली. नेहमीच्या सजवून, नटवून सादर केलेल्या नृत्यांपेक्षा हे RAW, non ornamented, कुठल्याही प्रकारचे decoration नसलेला performance त्यातल्या सहजीकतेमुळे आवडला. 

चाकालेले नृत्य  (Cakalele: pronounced as cha-ka-leh-leh)

हे नृत्य म्हणजे एक प्रकारचे युध्द नृत्य (War Dance) आहे. हे नृत्य मुख्यत्वे नॉर्थ मलुकू प्रदेशात सादर केले जाते. हे नृत्य पुरुष करतात पण स्त्रियांचाही यात सहभाग असतो. पुरुषांच्या हातात दोन प्रकारची आयुधं असतात. एक लांब सूरीसारखं (machete) आणि दुसरं ढालीसारखं(salawaku) आयुध असतं.(नृत्यातली युधं लाकडाची असतात ).ती आयुधं एकमेकाला टेकवून  Dancers त्याच्यामागे उभे राहतात. थाळी सारखे वाद्य वाजवले जाते तसे Dancers ती आयुधं घेऊन हातांच्या पायांच्या वेगवेगळ्या पोझेस करून नाचतात. स्त्रिया त्यांच्या आजूबाजूला हातवारे करत नाचतात. हा dance बराच chaotic आहे. याच्यात synchronization फारच कमी आहे. मध्ये मध्ये एकजण विशिष्ट शब्द उच्चारतो तसे सगळेजण 'है' असे जोराने ओरडतात.  

इंडोनेशियन गाणी



 
१० मार्च २०१६

जवळच्याच रेनफ़ॉरेस्ट मधले पक्षी निरीक्षण


११ मार्च २०१६
इथून परत निघालो.

आणखी बरंच काही या खालच्या सदरात लिहिलं आहे.

इंडोनेशिया ट्रिप मध्ये भेटलेली काही माणसे

इंडोनेशिया चे फळे/भाज्या खाद्यप्रकार

इंडोनेशियाचे काही पक्षी

No comments:

Post a Comment