मी राहते त्या परिसरात अनेक झाडे आहेत. रोज सकाळी फिरायला जाताना या झाडांचे निरीक्षण करण्याचा एक छंदच मला लागला. पण रोजच्या त्या रस्त्यावर एक असे छोटेसे झाड आहे की त्या झाडाजवळून मी कित्येक वेळेला जाऊनही त्याच्याकडे दुर्लक्ष झाले. पण कालच मी या झाडाकडे का कोण जाणे बघितले आणि ते मला खूप वेगळे वाटले. अरे अजूनपर्यंत अदृश्य होऊन आपले अस्तित्व लपवून हे कुठले झाड इथे उभे आहे. इतके रस्त्याला लागून असूनही या छोट्याशा झाडाकडे आपले दुर्लक्ष कसे झाले असा विचार मनात आला. बारकाईने बघितल्यावर दिसले की या छोट्याशा वृक्षाला अतिशय नाजूक, सुंदर पांढरी फुले फुलली आहेत. तसेच एका डहाळीवर तर फळे सुद्धा होती. या झाडाचे नाव तज्ञांना विचारले तेव्हा कळले की हा 'अजानवृक्ष' आहे. मराठीत दातरंग(दत्रंग) असेही म्हणतात.
श्री. द. महाजन यांच्या 'देशी वृक्ष' या पुस्तकात त्यांनी अजानवृक्षाबद्धल विस्तृत माहिती दिली आहे. एकंदरीत फारसा नजरेत न येणारा हा वृक्ष जवळून बघितला तर एक फारच वेगळे देखणेपण त्याच्या साध्या मूर्तीत आहे.
त्यांच्या पुस्तकात त्यांनी या वृक्षाबद्धल एक विशेष माहिती दिली आहे. या वृक्षाच्या काही पोटजाती आणि उपप्रकार आहेत असे मानले जाते. एकूणच झाडांचा आकार, आकृतिबंध, पानांची रचना यामध्ये अनियमितपणा असल्याने वनस्पतीचे नाव निश्चित करणे अवघड जाते. श्री. दं. नी अनेक ठिकाणी अनेक वृक्ष पाहिले आणि ते वेगवेगळे वाटण्याएवढी भिन्नता त्यांच्यात होती. हे या वृक्षाचे विशेष.
अजानवृक्षावर ज्ञानेश्वरीत, ज्ञानेश्वरांनी काय लिहिले असावे ते बघितले पाहिजे.
या वृक्षाची फांदी ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे लावली होती अशी आख्यायिका आहे. तिथे असा वृक्ष आहे असे म्हणतात. तसेच मराठी विश्वकोशात त्याचा पुढील उल्लेख आढळतो.

'श्रीज्ञानेश्वरांच्या हातातील काठी याच वृक्ष्याची असून समाधीच्या वेळी ती
त्यांनी बाजूस ठेवली व त्यापासून जवळच अजान वृक्ष पुढे वाढला, अशी
आख्यायिका आहे. या वनस्पतीची पाने व फळे मृत्युला जिंकण्यास समर्थ करतात,
असे श्रीएकनाथांनी वर्णन केले आहे. तसेच या पवित्र वृक्षाखाली बसून वाचन
केल्यास दिव्य ज्ञानाचा लाभ होतो असे समजतात. ज्ञानेश्वरी या ग्रंथात ‘अजान
वृक्ष’ असा उल्लेखही सापडतो. ‘अजान वृक्ष’ याचा अजान वृक्ष असा अपभ्रंश
असून सामान्य जनतेत वृक्षाप्रमाणे पसरलेल्या अज्ञानाचे रूपक त्या संज्ञेने
दर्शविले असावे, असेही मत व्यक्त केले आहे. तेच वर दिलेल्या
ज्ञानसंपादनाच्या कल्पनेशी जुळते.'
फळे |
फुले |
पाने |
अजानवृक्षाच्या फांद्या |
मराठी ज्ञानकोशातून पुढील माहिती मिळाली आहे :
(धत्रंग; हीं. चामरोर; क. अडक, बागरी; लॅ. एहरेशिया लेविस;
कुल–बोरॅजिनेसी). सु. १२ मी. उंच व एक मी. घेर असलेला हा लहान पानझडी
वृक्ष भारतात सर्वत्र व द. अंदमानात टेकड्यांवर ९३० मी. उंचीपर्यंत आढळतो.
साल फिकट करडी किंवा पाढुरकी असते; पाने साधी, मोठी, मध्यम चिवट, एकांतरित
(एकाआड एक) आणि अंडाकृती अथवा विविध आकृतींची असून थंडीत ती गळून पडतात.
फुले लहान, पांढरी व बिनदेठाची असून पानांच्या बगलेत किंवा बाजूच्या
वल्लरीवर जानेवारी–मार्च (किंवा एप्रिल) मध्ये येतात. अश्मगर्भी
(आठळीयुक्त) फळ प्रथम लाल काळे, मिरीएवढे, गोलसर व सुरकुतलेले असते. लाकूड
पिवळट किंवा करडे, चमकदार, मध्यम कठीण, सुबक व टिकाऊ असून कुंचल्यांच्या
पाठी, आगपेट्या, आगकाड्या, बुटाचे साचे (ठोकळे), घरबांधणी, शेतकीची अवजारे
इत्यादींस उपयुक्त असते. फळे व झाडांची अंतर्साल टंचाईच्या काळात खातात;
पाने गुरांना खाऊ घालतात.
No comments:
Post a Comment