Wednesday, 31 May 2017

वृक्षप्रकल्पातील हिरवा सोबती १४ : मोई

या वृक्षाला पक्ष्यांचा सखा म्हणता येईल. या वृक्षाला एप्रिल-मे मध्ये फळे येतात. तेव्हा हि फळे खाण्यासाठी या वृक्षावर पक्ष्यांची झुंबड उडते. मैना, पंचरंगी पोपट, हळद्या, वटवट्या असे अनेक पक्षी फळे खायला येतात. या वृक्षाची फुले कशी असतात ते मी पाहू शकले नाही. पण आंतरजालावर काही फोटो दिसले.

मोईची फुलं
या वृक्षाचे शास्त्रीय नाव Lannea coromandelica/Odina Wodier असे आहे.मराठीत मोई किंवा शिमटी असे म्हणतात. 

श्री. द. महाजन यांच्या 'आपले वृक्ष' या पुस्तकात मोई वृक्षावर फार सुरेख वर्णन असलेला संस्कृत श्लोक दिला आहे.

जिंगिणी  झिंझिणी ज्ञेया मोदकी गुडमंजरी ।
पार्वतेया सुनिर्घोषा तथा मदनमंजरी ।।

डोंगराळ भागात आढळणारा, आनंद देणारा आणि छोट्या फुलांचे फुलोरे(मंजरी)  येणारा असा हा मोई वृक्ष. 
हा बहुपयोगी वृक्ष श्री. द. महाजन यांच्या मते वनीकरणासाठी एक आदर्श वृक्ष आहे. तसेच त्यांनी बहिणाबाईंच्या कवितेतील या वृक्षाबद्धलच्या उल्लेखाबद्धलही लिहिले आहे. बहिणाबाईंच्या कवितेत 'मोई' आणि 'सालई' हे दोन वृक्ष जवळ-जवळ असतात, त्यामुळे त्या बहिणी-बहिणीच आहेत. हा वृक्ष 'आंबा' कुळातील आहे. 

एप्रिल ते जून या काळात हा वृक्ष पूर्णपणे निष्पर्ण होऊन, त्याला फुलांच्या मंजिऱ्या येतात. या मंजिऱ्यावर हिरवी, तांबूस फळे घोसांनी येतात. ही टपोरी फळे खाण्यासाठी मग पक्ष्यांची ये-जा चालू होते. मैना, ब्राह्मणी मैना, White headed starling, हळद्या या पक्ष्यांचे हे अत्यंत आवडते खाद्य आहे. 





असा हा वृक्ष अगदी जरूर लावावा असा आहे.






No comments:

Post a Comment