Sunday, 28 May 2017

वृक्षप्रकल्पातील हिरवा सोबती १३ : अंजनी

अंजनी  हा एक छोटा वृक्ष आहे. एखाद्या झुडपाप्रमाणे तो वाढतो. गर्द हिरव्या रंगाची छोटी (जांभळीच्या पानांसारखी) पाने असतात. तसा हा वृक्ष आपले अस्तित्व अजिबात दाखवत नाही. पण जेव्हा तो फुलतो तेव्हा मात्र त्याच्या फुलांचे सौंदर्य विलोभनीय असते. 
Memecylon umbellatum असे याचे शास्त्रीय नाव. याला इंग्रजीमध्ये 'Ironwood'. श्री लंकेतही हा वृक्ष सापडतो. तिथे त्याला Blue Mist  असे नाव आहे. खरोखरच याची फुले म्हणजे निळे-जांभळे तुषारच. 
 
फुलांच्या कळ्या

अंजनीची फुलं

फुलण्यासाठी तयार कळ्या 


अंजनीची फुलं

अंजनीची पानं आणि कच्ची फळं 
अंजनीची फळ, काही पिकलेली आहेत 




No comments:

Post a Comment