Thursday 22 February 2018

मी एक दिवा

मी एक दिवा
साधासाच, पितळी
काजळीने माखलेला
काळजीतही आहे

कोणी विचारलं, पुसलं
वात, तेल घातलं आणि
पेटवलं तर पेटेन

नाहीतर रिकामा
नुसतीच
वाट बघत बसेन

जेव्हा पेटतो तेव्हा
वाटतं काहीतरी घडतंय
माझ्या हातून

म्हणून तापत राहतो
अंग पोळलं तरी
एकटाच शांत राहतो

पण एकटेपणा सहन होत नाही
म्हणून तेल, वात
यांच्याशी बोलतो

ते बोलत नाहीत
तेही जळतात, ताप होतो
मग मीही जळतो, त्यांना जाळतो

मग कधीतरी
सारे शांत झाल्यासारखे वाटते
पण जळूनसुद्धा काही केल्या
आम्ही संपतच नाही

त्या जळालेल्या देहावर
कुणीसुद्धा फुंकर घालत नाही
माझ्या हातात असतं तर
त्यांचं आणि स्वतःचं
पेटणं पेटवणं बंदच केलं असतं

नको वाटतं, अंधारही मग
बरा वाटतो
पण मग ,

एकट्याला थंडपणाही सोसत नाही
पुन्हा तापण्याची
खुमखुमी येते

पुन्हा त्या पुसणाऱ्याची , तेलाची , वातीची
काहीतरी घडण्याची
वाट बघत बसतो

-२२-फेब्रुवारी-२०१८

Wednesday 7 February 2018

Universal consciousness

दृश्य मी बघितले 
दृश्य तू बघितलेस
दृश्य एक , पण काळ वेगळा
डोळे चार
आपण दोन
वेगवेगळ्या काळातील
पण तेच दिसले मला जे तुला दिसले
फक्त मी पहिले भविष्य , भविष्यात
तुला दिसले वर्तमान , वर्तमानात
पण माझे भविष्य , तुझे वर्तमान
आणि तुझे वर्तमान माझे भविष्य
माझ्या चित्रातल्या गर्भाला
तुझ्या चित्रात जन्म मिळाला
जे तुला दिसले , तेच  मला दिसले
ते काय आहे ?
युनिव्हर्सल कॉन्शसनेस ?


Honoré Daumier | The Third-Class Carriage


लोकल ट्रेन मधील थकलेली स्त्री 

लोकल ट्रेन मधील थकलेली स्त्री

Monday 5 February 2018

हे चित्र कुणाचं ?

एक टिंब चालतंय
त्यामागून दुसरं टिंब
त्यामागून तिसरं
अशी टिंबांची रेघ चाललीय
अशा अनेक रेघा
चालल्या आहेत
त्या मध्य टिंबाकडे
दाहीदिशांकडून
प्रतिक्षेत आहे
प्रत्येक टिंब
प्रत्येकाला व्हायचंय
सूर्यबिंब

-ऑक्टोबर २०१७

Fear, composure and posture

There's a tremendous fear inside. How to find it..what is it? You don't know exactly what the fear comprises of. Why there is fear. but the fear is there all the time. How to know? fear. the fear has lot of components: you are left alone on the road. till the end.  you don;t know where to go. there is fear of darkness when there is light, and there's fear of not ever getting out of darkness when there's darkness. the fear is constant. the fear is that you do not know. you do not know anything of which you know. not knowing is fear. you don't know whether you know. you don't see the end but you know there is end ultimately. fear of unknown. fear of known. both.  not able to comprehend. not able to see. not able to hear. not able to talk, not able to touch , not able to breathe. That is the fear. That all is fear. Limitation. Why we feel sad? sadness. what is is?
2 people are there. one perfectly normal person. and the other is perfectly shattered. shattered shattered! the shattered one cries. falls. to the ground. the normal is composed. says : wait i am there, smiles.. look here..look here. the other one falls, the normal one catches. wait. supports the shattered. makes the shattered sit. then coolly drinks the glass of lemonade. smiles. don't worry. I am there!

why i am always fascinated by things which are beyond my understanding? the things which i do not have a capacity to understand, comprehend. beyond my physical limits of the brain ? beyond my limits and things which I can not handle.  Why i want to peep through the hole of terror of the house of horror. All is within me, the terror , the horror.

the posture... is important...the posture...so important to make you feel good. the posture. I am aware of the posture. ? just now i felt at peace with myself sitting in this chair...no criticism for a second. because of the posture. I felt I am in harmony with the universe because of posture. you arrive at it just in a split of seconds..otherwise u r revolving..there's a slight motion attached.. but in a small spit of second u feel stable..one with the universe...that's when that motion merges with your own? u feel peace. brain stops the motion..all neurons in peace..quieted.

Saturday 3 February 2018

एक आगंतुक, एक अविचलित मृत्यु


हा एक आगंतुक. कुठून आला कोण जाणे? पण खोलीतील फरशीवर पडला होता. इथे का आला? मी थोडावेळ त्याच्याकडे बघितले. त्याला सतत गती होती. सतत हालचाल करत होता. दोन्ही बाजूनी त्याला पाय असल्यासारखी त्याच्या केसांची रचना होती. ही म्हातारी नाही. पण केस म्हातारी सारखे. त्या दोन्ही बाजूंच्या केसांच्या रचनेमूळे हा रिळा/चक्रासारखा सारखा पुढे पुढे जातो. मी त्याला एका प्लस्टिकच्या पेटीत बंद करून ठेवले. पण मग मला वाटले मी त्याला तुरुंगात टाकले आहे. म्हणून मी त्याला पेटीतून बाहेर काढायचे आणि सोडून द्यायचे असे ठरवले आहे, पण  जोपर्यंत त्याची ओळख पटत नाही तोपर्यंत त्याला पेटीत राहावे लागेल. त्याला कुठेतरी जायचे आहे. पण मग तो इथे का आला? 





हा देखील फरशीवर पडला होता. मला वाटलं मेला आहे. कचरा काढणाऱ्या बाईने त्याचा मृतदेह केरसुणीने अत्यंत वाईट पद्धतीने कचऱ्यात ढकलला असता, असं वाटून मी त्याला उचललं तर त्याने पंखांची पुसट हालचाल केली, 'हा जिवंत आहे' म्हणून मी त्याला तळव्यावर ठेवलं, एका सेकंदात एक अतिसूक्ष्म मुंगी माझ्या तळव्यावर गोंधळल्यासारखी फिरू लागली. ती त्या फुलपाखरांच्या देहातून बाहेर आली होती. ती बहुतेक त्याचा देह पोखरत होती. पण अचानक वातावरणात, पृष्ठभागात झालेला बदल तिला जाणवला असावा. त्या फुलपाखराला मी अशा ठिकाणी ठेवायचे ठरवले, जिथे त्याच्यावर कुणाचा पाय पडणार नाही, कुणी त्याला कचऱ्यात ढकलून देणार नाही. दोन गोष्टी मनात तरळून गेल्या: अशा फुलपाखरांचे पंख पकडून त्यांना पुस्तकात दाबून मारून टाकणारी चेटकीण, आणि एकदा मला असाच एक पाखा (मोठ्या फुलपाखरासाठी मालवणी शब्द) धडपडत असताना सापडला होता, त्याला मी बाहेर सोडणार तोच माझ्या मांजराने एकदम माझ्या हातावर उडी मारून धरलं आणि मी त्याला रट्टे मार मार मारले तरी त्याने त्याला खाल्ले. मी मांजराला जोरदार रट्टे लगावले. 'मांजार ता पाखो धरतालाच ता, तेचो धर्म आसा तो' 
तर हे आजचे फुलपाखरू मी  परत त्याला हाताच्या तळव्यावरून दुसरीकडे ठेवणार तोच माझ्या बोटांचा स्पर्श होताच परत पंखांची क्षीण फडफड करू लागले. मग मी त्याला एका ठिकाणी ठेवले, आणि म्हटले  'You can die here without disturbance. Nobody will disturb you anymore.'