The best time to plant a tree?
Twenty years ago.
The second best time?
Today.
- Chinese proverb
आमच्या गावच्या घराच्या आसपास बरीचशी जमीन आहे. या शेतजमिनीत पूर्वी भात पिकत असे. आता तिथे शेती करायला कुणी नाही. अशा या पडीक जमिनीला सोबत मिळावी आणि तिच्यात हिरवे सोबती उभे राहावेत, ज्यांच्या अंगाखांद्यावर पशू-पक्षी बागडावेत म्हणून हा एक छोटासा वृक्षाप्रकल्प हाती घेण्याचे योजले आहे. मूळ कल्पना माझा भाऊ विवेकानंद याची. जे वृक्ष लावण्याचे ठरवले आहे त्या वृक्षांची ओळख आणि त्यांच्याविषयी, त्यांच्यानिमित्ताने लिहिले गेलेले हे छोटेसे डायरीवजा लेखन.
कदंब वृक्षाविषयी पहिल्यांदा ओळख करून दिली दुर्गा भागवत यांनी. त्यांच्या 'पैस'
पुस्तकामध्ये त्या लिहितात
'कृष्ण आला आणि यमुनेच्या तीरावरचे कदंबही वेगळेच झाले.
यमुनेच्या सुखाभावनेचे साक्षी हे हर्षोत्फुल कदंब झाले. कृष्ण यमुना
यांचे समान प्रतीक कदंबाचे झाड झाले. आता कदंब फारसे कुठे दिसत नाहीत, पण
यमुनातीरी मात्र कदंबाची झाडे अजून तशीच इमानाने फुलताफळताहेत. मी मथुरेला
गेले ते कदंब पाहण्यासाठीच. कृष्णाची कुंडले कदंबाचीच. याच झाडावर चढून
त्याने कालिया डोहात उडी घेतली. कदंबावरच त्याने गोपींची वस्त्रे टांगून
ठेवली. चीरहरणाचा तो कदंब अद्याप वृंदावनात आहे. पण आता यमुना
त्याच्यापासून दूर सरली आहे. ते झाड रोडावत तसेच तग धरून उभे आहे. कदंबाची
केशरीपिवळी फुले म्हणजे कृष्णाच्या आवडत्या पितांबराच्या रंगाची, त्याची नि
राधेची आवडती. कदंबाची सावली गाईगुरांना प्रिय. तिथेच कृष्णाची बासरी
निनादायची. '
कदंब वृक्ष म्हणजे कृष्णाचा वृक्ष. कृष्णाचे बालपण यमुनातीरी याच वृक्षाच्या विशाल छायेत गेले. पोपटी-हिरवी मोठी पाने आणि गोल चेंडूसारखी बारीक पिवळसर-लाल, पांढऱ्या केसरांनी बनलेली फुले हे कदंबाचे वैशिष्ट्य.
वृक्षाच्या शाखाही आढव्यातिढव्या कश्याही वाढणाऱ्या नाहीत, तर सरळ बुंध्यावर एकाला एक समोरासमोर रचनाबद्ध शैलीत असतात. पानेही समोरासमोर दोन दोन असतात.कदंबाला 'नीव' असेही म्हणतात. या वृक्षाचे आणखी दोन प्रकार डॉ. म. वि. आपटे यांच्या 'वनश्रीसृष्टी' या ग्रंथात दिले आहेत. ते आहेत 'हेदकदंब' आणि 'लघुकदंब'. लघुकदंब हा कदंब वृक्षापेक्षा थोडा लहान असतो. वि. म. आपटे यांनी लिहिले आहे की 'लघुकदंब' या वृक्षाला पावसाळ्यात फुले येतात. त्यामुळे मेघदूतात ज्या कदंब वृक्षाचा उल्लेख केला आहे तो लघुकदंब असावा.
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhTSjbsuVRs7WxrZrqtQK9PeofwYPL2nV335-nOxn0ifkMYlclkXEw8ihmv8c4iPFi8Mfjmfxc0vajeYHiB4b6GOUZ9uNNliBWyCHBRdrkrl0YqEWe8ZWn1OiVfskDQOzrU6DKh9nlGuBo/s320/Neolamarckia_Cadamba_Flower.jpg)
वृक्षाच्या शाखाही आढव्यातिढव्या कश्याही वाढणाऱ्या नाहीत, तर सरळ बुंध्यावर एकाला एक समोरासमोर रचनाबद्ध शैलीत असतात. पानेही समोरासमोर दोन दोन असतात.कदंबाला 'नीव' असेही म्हणतात. या वृक्षाचे आणखी दोन प्रकार डॉ. म. वि. आपटे यांच्या 'वनश्रीसृष्टी' या ग्रंथात दिले आहेत. ते आहेत 'हेदकदंब' आणि 'लघुकदंब'. लघुकदंब हा कदंब वृक्षापेक्षा थोडा लहान असतो. वि. म. आपटे यांनी लिहिले आहे की 'लघुकदंब' या वृक्षाला पावसाळ्यात फुले येतात. त्यामुळे मेघदूतात ज्या कदंब वृक्षाचा उल्लेख केला आहे तो लघुकदंब असावा.
त्यांनी मेघदूतातील कदंब वृक्षावरच्या ओळीही आपल्या पुस्तकात दिल्या आहेत.
नीचैराख्यं गिमधिवसेस्तत्रविश्रामहेतोः ।
त्वत्संपर्कात् पुलकितमिव प्रौढपुष्पै कदंबैः। मेघदूत १.२५
याचा अर्थ आहे, '(हे मेघा,) नीचैर्गिरीवर जरा थांब. तुझ्या येण्याने त्याला कदंबरूपी रोमांच येतील.
कदंब वृक्षाला नक्की फुले केव्हा येतात हे एक मोठे गूढच आहे. माझ्या भावाच्या पुण्यातील घराच्या खाली तीन कदंबाची तरुण झाडे आहेत. त्यांना फेब्रुवारीच्या महिन्यात फुले आलेली मी पहिली आहेत. श्री. द. महाजन यांनी त्यांच्या 'आपले वृक्ष' पुस्तकात कदंब फुलण्याचा काळ 'जुलै-ऑगस्ट' दिला आहे. मग कदंबाची झाडं फुलतात तरी कधी?
कदंब वृक्षाचं शास्त्रीय नाव Neolamarckia Cadamba
Syn : Anthocephalus chinensis; Anthocephalms Cadamba म्हणजेच ऍन्थोफॅलस कदंबा किंवा ऍन्थोफॅलस चायनेन्सिस
कदंब वृक्षाचा भाऊ लघुकदंब म्हणजेच 'कळम' याचे शास्त्रीय नाव आहे 'मित्रागायना पार्व्हीफोलीया'.
दुर्गाबाईंनी कदंब वृक्षाची ओळख तर करून दिली पण त्यांनी या झाडावर लिहिलेले 'कदंब' हे दुर्मिळ पुस्तक मात्र अजून वाचायला मिळाले नाही. या पुस्तकाच्या मी काही वर्षांपासून शोधात आहे. पहिला कदंब वृक्ष बघितला तो खजुराहोला. खजुराहोच्या मातंगेश्वर मंदिराजवळ उघड्यावरच एक मारुतीची मूर्ती आहे, त्याच्याबाजूला हा कदंब वृक्ष आहे.
अज्ञेय (सच्चिदानंद हीरानंद वात्स्यायन) या हिंदी कवीने कदंब वृक्षावर अतिशय सुंदर कविता केल्या आहेत.
टेर वंशी की
यमुना के पार
अपने-आप झुक आई
कदम की डार।
द्वार पर भर, गहर,
ठिठकी राधिका के नैन
झरे कँप कर
दो चमकते फूल।
फिर वही सूना अंधेरा
कदम सहमा
घुप कलिन्दी कूल!
अपने-आप झुक आई
कदम की डार।
द्वार पर भर, गहर,
ठिठकी राधिका के नैन
झरे कँप कर
दो चमकते फूल।
फिर वही सूना अंधेरा
कदम सहमा
घुप कलिन्दी कूल!
अलस कालिंदी
अलस कालिन्दी--
कि काँपी
टेर वंशी की
नदी के पार।
कौन दूभर भार
अपने-आप
झुक आई कदम की डार
धरा पर बरबस झरे दो फूल।
कि काँपी
टेर वंशी की
नदी के पार।
कौन दूभर भार
अपने-आप
झुक आई कदम की डार
धरा पर बरबस झरे दो फूल।
द्वार थोड़ा हिले--
झरे, झपके राधिका के नैन
अलक्षित टूट कर
दो गिरे तारक बूँद।
फिर-- उसी बहती नदी का
वही सूना कूल!--
पार-- धीरज-भरी
फिर वह रही वंशी टेर!
झरे, झपके राधिका के नैन
अलक्षित टूट कर
दो गिरे तारक बूँद।
फिर-- उसी बहती नदी का
वही सूना कूल!--
पार-- धीरज-भरी
फिर वह रही वंशी टेर!
भक्त कवी रसखान यांनी लिहिलं आहे 'जो खग
हौं तौ बसेरौ
करौं मिलि
कालिन्दी कूल कदंब की डारन।'
कालिन्दी कूल कदंब की डारन।'
No comments:
Post a Comment