दिवा एकटाच शांत तेवत असतो. मीच तो लावलेला असतो. मी मधे मधे जाऊन बघते. त्याला बघून मनाला बरं वाटतं. मग केव्हातरी माझी कामात तंद्री लागते. बऱ्याच वेळानंतर मला त्याची आठवण होते. जाऊन बघते तर दिवा विझलेला असतो. आता मला त्याचे तेवत असतानाचे रूप प्रकर्षाने आठवते. त्याच्या अबोल सोबतीबद्दल कृतज्ञता वाटते आणि आता तो नाही म्हणून खंतही.
No comments:
Post a Comment