Monday 18 December 2017

पूर्णचंद्र तेजस्वी यांच्या निवडक कथा

अतिशय सुंदर कथांचे पुस्तक. पूर्णचंद्र तेजस्वी यांचे 'कार्व्हालो' हे पुस्तक वाचले होते, त्यातली त्यांची अतिशय साधी आणि तरीही अतिशय प्रभावी, परिणामकारक लेखन पद्धत खूप आवडली होती. म्हणून हे पुस्तक लायब्ररीतुन मागवले. खूपच सुंदर गोष्टी आहेत यातल्या. विशेषतः व्यक्तीचित्रणाला प्राधान्य देणारी, अतिशय माफक आणि अचूक शब्दांत मांडली गेलेली कथालेखनाची पद्धत खूप आवडली. 

या पुस्तकात आठ गोष्टी आहेत.

१. अखेर लिंगय्या परत आला
२. पाकक्रांती
३. डेअर डेव्हिल मुस्तफा
४. अबचुरचं पोस्टऑफिस
५. तबरची गोष्ट
६. कृष्णेगौडाची हत्तीण
७. गूढ माणसं
८. किरगूरच्या गतकाळ्या