Wednesday 14 October 2015

व्हॅन गॉग ची पत्रं:१

एक: हाग २९ सप्टॆंबर १८७२

(माझ्या) प्रिय थीओ

तुझ्या पत्रासाठी आभार. तु व्यवस्थित पोचल्याचे ऐकुन आनंद झाला.मला पहिले काही दिवस तुझी खुप आठवण आली.मी दुपारी घरी यायचो तेव्हा तु घरी नाहिस हे जाणवुन मला खुप विचित्र वाटत असे.आपण एकत्र खुप छान दिवस घालवले  आणि जेव्हा शक्य व्हायचे तेव्हा आपण काहितरी बघायला किवा चालत फिरायला जायचो.

किती भयंकर हवामान आहे तिथे. ओस्टरविकला जाताना चिंतेने किती  काळवंडुन जायला होत असेल तुला.(तेव्हा थीओ ओस्टरविक मधे माध्यमिक शिक्षण घेत होता जे घरापासुन ६ किलोमिटर अंतरावर होते. विन्संटला वाटले कि थीओ काळाजीने तिथे काळवंडुन जाईल कारण ते शरद ॠतुतील वाधळी वातावरण होते.)

काल इथे प्रदर्शनाच्या निमित्ताने ट्रॉटींग रेसेस होत्या पण फ़टाक्यांची रोषणाई खराब वातावरणामुळे पुढे ढकलली गेली.बघायला थांबला नाहिस  ते बरेच झाले.
हानेबीक्स आणी रूसेस कडून अभिवादन. (हानेबिक्स गॉग कुटुंबाचे दुरचे नातेवाइक होते. आणी रुसेस ह्या कुटुंबाबरोबर व्हॅन गॉग ’हाग’ या ठिकाणी आला होता.)

तुझाच प्रिय विन्संट